Lokmat Sakhi >Gardening > कोथिंबीर आणली की लगेच वाळून जाते? कुंडीत कोथिंबीर पिकवण्याची सोपी पद्धत, मिळेल हिरवीगार कोथिंबीर...

कोथिंबीर आणली की लगेच वाळून जाते? कुंडीत कोथिंबीर पिकवण्याची सोपी पद्धत, मिळेल हिरवीगार कोथिंबीर...

know how to grow Coriander in Home garden : कोथिंबीर लावण्याची योग्य पद्धत आणि ती वाढवण्यासाठी नेमकं काय करावं लागतं याविषयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2023 04:36 PM2023-11-22T16:36:33+5:302023-11-22T16:37:54+5:30

know how to grow Coriander in Home garden : कोथिंबीर लावण्याची योग्य पद्धत आणि ती वाढवण्यासाठी नेमकं काय करावं लागतं याविषयी

know how to grow Coriander in Home garden : Does coriander dry up immediately after bringing it? Easy way to grow coriander in pot, get green coriander... | कोथिंबीर आणली की लगेच वाळून जाते? कुंडीत कोथिंबीर पिकवण्याची सोपी पद्धत, मिळेल हिरवीगार कोथिंबीर...

कोथिंबीर आणली की लगेच वाळून जाते? कुंडीत कोथिंबीर पिकवण्याची सोपी पद्धत, मिळेल हिरवीगार कोथिंबीर...

कोथिंबीर आहारात असणे अतिशय फायदेशीर असते. यातील कॅल्शियम आणि इतर घटक आरोग्यासाठी उपयुक्त असतात. त्यामुळे रोजच्या आहारात कोथिंबीरीचा आवर्जून समावेश करायला हवा. इतकेच नाही तर कोथिंबीरीमुळे पदार्थ छान दिसतो आणि त्याला एकप्रकारचा छान स्वादही येतो. यासाठी आपण बाजारातून ताजी हिरवीगार कोथिंबीर आणतो. पण ही कोथिंबीर २-३ दिवस चांगली राहते आणि मग लगेच वाळून जाते. तसंच या कोथिंबीरीची किंमतही खूप जास्त असते. अशावेळी ताजी कोथिंबीर मिळावी यासाठी एक उत्तम उपाय म्हणजे घरच्या घरी कुंडीत कोथिंबीर पिकवणे (know how to grow Coriander in Home garden). 

होम गार्डनमध्ये इतर रोपांसोबतच अगदी लहान कुंडी नाही पण थोड्या मोठ्या आकाराच्या कुंडीत किंवा टबमध्ये हिरवीगार कोथिंबीर अतिशय छान येऊ शकते. विशेष म्हणजे आपल्याला पाहिजे तेव्हा ही ताजी कोथिंबीर तोडून आपण पदार्थावर घालू शकतो. कोथिंबीर येण्यासाठी आवश्यक असणारे धणे घरात सहज उपलब्ध असल्याने त्यासाठी खूप जास्त खर्च येतो असेही नाही. पण ही कोथिंबीर लावण्याची योग्य पद्धत आणि ती वाढवण्यासाठी नेमकं काय करावं लागतं याविषयी समजून घ्यायला हवं. म्हणजे आपले कष्ट मार्गी लागतील आणि आपल्याला घरातल्या कुंडीत ताजी ताजी हिरवीगार कोथिंबीर मिळेल.

(Image : Google)
(Image : Google)

१. एक मोठ्या आकाराची कुंडी घेऊन त्यामध्ये चांगली चिकट असलेली माती मोकळी करुन ठेवावी.

२. धणे घेऊन ते बत्त्याने किंवा वरवंट्याने वाटून त्याचे अर्धे भाग होतील असे भरडावेत.

३. हे भरडलेले धणे मातीत एका ओळीत घालावेत आणि त्यावरुन पुन्हा माती घालावी. 

४. साधारण २ ते ३ इंचाचे होईपर्यंत ही कुंडी किंवा टब थोडा सावलीत ठेवला तरी चालतो. यासाठी ८ ते १० दिवस लागू शकतात.

५. कोथिंबीरीचे रोप अगदीच नाजूक असल्याने त्याला पाणी घालताना विशेष काळजी घ्यावी लागते. एकदम नेहमीसारखे पाणी न घालता अगदी हळूवारपणे चिखल होणार नाही आणि रोप त्यात बुडणार नाही याची काळजी घेऊन पाणी घालावे. 


६. मग ही कुंडी सूर्यप्रकाशात ठेवायला हवी. त्यामुळे कोथिंबीरीची वेगाने वाढ होण्यास मदत होते.

७. या रोपांना येणारी फुलं वेळच्या वेळी काढून टाकायला हवीत, त्यामुळे कोथिंबीर हिरवीगार राहण्यास मदत होते.

८. पुढच्या ४ ते ५ दिवसांत चांगली हिरवीगार भरपूर कोथिंबीर तयार होते आणि आपण ही ताजी कोथिंबीर स्वयंपाकात वापरु शकतो. 
 

Web Title: know how to grow Coriander in Home garden : Does coriander dry up immediately after bringing it? Easy way to grow coriander in pot, get green coriander...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.