Lokmat Sakhi >Gardening > पाण्यासोबतच महिन्यातून रोपांना न चुकता घाला 'हे' १ ग्लास पाणी, येईल रंगबिरंगी फुलांचा बहर

पाण्यासोबतच महिन्यातून रोपांना न चुकता घाला 'हे' १ ग्लास पाणी, येईल रंगबिरंगी फुलांचा बहर

Know how to make flowers bloom year around : घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने खत तयार करण्याची पद्धत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2024 10:05 AM2024-02-26T10:05:04+5:302024-02-26T10:10:01+5:30

Know how to make flowers bloom year around : घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने खत तयार करण्याची पद्धत...

Know how to make flowers bloom year around : Along with water, add 1 glass of water to the plants every month without fail, colorful flowers will bloom | पाण्यासोबतच महिन्यातून रोपांना न चुकता घाला 'हे' १ ग्लास पाणी, येईल रंगबिरंगी फुलांचा बहर

पाण्यासोबतच महिन्यातून रोपांना न चुकता घाला 'हे' १ ग्लास पाणी, येईल रंगबिरंगी फुलांचा बहर

आपल्या होम गार्डनमधील रोपांना चांगला बहर यावा अशी आपली इच्छा असते. पण काही ना काही कारणाने ही रोपं सुकून जातात किंवा एकाएकी रोपाला येणाऱ्या फुलांची संख्या कमी होते. रोपं हिरवीगार असावीत आणि त्यांना भरपूर फुलं यावीत अशी आपली इच्छा असते. मनापासून जपलेल्या बागेतील फुलांना छान बहर आलेला असेल तर आपल्यालाही छान वाटते. रोजच्या रोज पाणी घालण्याशिवाय आपल्याला रोपांकडे लक्ष द्यायला पुरेसा वेळ होतोच असे नाही. पण रोपं सुकायला लागली किंवा त्याला किड लागली की आपण बाजारात जाऊन त्यांच्यासाठी खतं किंवा किटकनाशके आणतो. हे सगळे महाग असल्याने त्यासाठी भरपूर पैसे मोजावे लागतात. त्यापेक्षा घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने घरात सहज उपलब्ध असणाऱ्या पदार्थांपासून खास खत तयार केल्यास रोपांना आणि फुलांना चांगला बहर येण्यास मदत होते, पाहूयात हे खत कसं तयार करायचे (Know how to make flowers bloom year around).    

१. एका भांड्यात बटाट्याचे तुकडे घ्या. 

२. त्यात अर्धा चमचा यीस्ट पावडर आणि ब्राऊन शुगर घाला.

३. यामध्ये २ चमचे व्हाईट व्हिनेगर घाला. 

(Image : Google)
(Image : Google)

४. आता या सगळ्यात साधारण १ लीटर पाणी घालून ते चांगले २४ तास मुरू द्या.

५. आता हे पाणी आपण नेहमी रोपांना ज्याप्रमाणे पाणी घालतो त्याप्रमाणे पाणी घाला. 

 ६. हे पाणी सतत घातले तरी रोपं सुकून जाण्याची शक्यता असते त्यामुळे सतत वापरु नका. 

७. हे पाणी घातल्यानंतर किमान २४ तास साधे पाणी घालू नका. 

८. हे पाणी खताप्रमाणे काम करत असल्याने रोपातील माती थोडी खोदून मग हे पाणी घालायला हवे. 


 

Web Title: Know how to make flowers bloom year around : Along with water, add 1 glass of water to the plants every month without fail, colorful flowers will bloom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.