Lokmat Sakhi >Gardening > कुंडीतल्या रोपांना फुलंच फुलं येण्यासाठी लसणाचा असा करा वापर, बाग फुलेल मस्त रंगबिरंगी...

कुंडीतल्या रोपांना फुलंच फुलं येण्यासाठी लसणाचा असा करा वापर, बाग फुलेल मस्त रंगबिरंगी...

Know how to use garlic for for plants for getting good nutrients : लसूण आरोग्यासाठी ज्याप्रमाणे फायदेशीर असतो त्याचप्रमाणे तो रोपांसाठीही उपयुक्त ठरतो.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2024 12:24 PM2024-01-28T12:24:27+5:302024-01-28T12:26:02+5:30

Know how to use garlic for for plants for getting good nutrients : लसूण आरोग्यासाठी ज्याप्रमाणे फायदेशीर असतो त्याचप्रमाणे तो रोपांसाठीही उपयुक्त ठरतो.

Know how to use garlic for for plants for getting good nutrients : Use garlic like this to make the potted plants bloom, the garden will be colorful... | कुंडीतल्या रोपांना फुलंच फुलं येण्यासाठी लसणाचा असा करा वापर, बाग फुलेल मस्त रंगबिरंगी...

कुंडीतल्या रोपांना फुलंच फुलं येण्यासाठी लसणाचा असा करा वापर, बाग फुलेल मस्त रंगबिरंगी...

आपण घराच्या गॅलरीत किंवा खिडकीच्या ग्रीलमध्ये लावलेली ७-८ रोपं छान बहरावीत आणि त्यांना मस्त भरपूर फुलं यावीत असं आपल्याला वाटत असतं. पण काही ना काही कारणानी आपण उत्साहात लावलेली हिरवीगार रोपं वाळून, सुकून जातात. एकाएकी त्यांना फुलं येईनाशी होतात किंवा या रोपांवर कीड पडते. पण असं होऊ नये आणि आपण कौतुकाने लावलेली रोपं छान फुलावीत यासाठ नेमकं काय करावं हे आपल्याला कळत नाही. रोपांना भरपूर रंगबिरंगी फुलं यावीत, रोपं मस्त हिरवीगार राहावीत यासाठी आपण त्यांना नियमित पाणी तर घालतोच. पण वेळोवेळी या रोपांची कापणी करणे, त्यांच्यावर कीटकनाशके फवारणे, त्यांना योग्य ती खतं घालणे हेही तितकेच महत्त्वाचे असते (Know how to use garlic for for plants for getting good nutrients). 

या सगळ्यासाठी आपल्याकडे पुरेसा वेळ आणि पैसा असायला हवा. त्याशिवाय आपल्या होम गार्डनची काळजी घेणे शक्य होत नाही. विकतच्या महागड्या गोष्टी वापरण्यापेक्षा घरच्या घरी काही सोपे उपाय केल्यास आपली घरातली बाग मस्त फुलू शकते. आपण स्वयंपाकात वापरत असलेला लसूण आरोग्यासाठी ज्याप्रमाणे फायदेशीर असतो त्याचप्रमाणे तो रोपांसाठीही उपयुक्त ठरतो. लसणामध्ये नायट्रोजन आणि पोटॅशियम हे २ महत्त्वाचे घटक असतात.  या दोन्ही घटकांचा रोपांना भरपूर फुलं येण्यासाठी अतिशय चांगला फायदा होतो. या लसणाचा रोपांच्या वाढीसाठी आणि त्यांना पोषण मिळून भरपूर फुलं येण्यासाठी कसा वापर करायचा पाहूया...

(Image : Google)
(Image : Google)

१. लसणाच्या पाकळ्या वेगळ्या करुन त्यामध्ये साधारण अर्धा लिटर पाणी घाला. 

२. यामध्ये २ चमचे व्हाईट व्हिनेगर घालून हे मिश्रण चांगले एकजीव करा. 

३. हे मिश्रण रात्रभर तसेच ठेवा म्हणजे लसूण आणि व्हिनेगर पाण्यात चांगले फरमेंट होण्यास मदत होईल.

४. हे पाणी सकाळी उठून रोपांना घाला, यामुळे रोपांना चांगले पोषण मिळण्यास मदत होईल. 

५. यामुळे रोपांची पानं तर हिरवीगार होतीलच पण रोपांना भरपूर फुलं येण्यास मदत होईल. 

 

 

Web Title: Know how to use garlic for for plants for getting good nutrients : Use garlic like this to make the potted plants bloom, the garden will be colorful...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.