Lokmat Sakhi >Gardening > घरातल्या छोट्याशा कुंडीतही रुजतात सुंदर पालेभाज्या, यंदाच्या पावसाळ्यात खा ताजीताजी पालेभाजी घरच्या बागेतली!

घरातल्या छोट्याशा कुंडीतही रुजतात सुंदर पालेभाज्या, यंदाच्या पावसाळ्यात खा ताजीताजी पालेभाजी घरच्या बागेतली!

पावसाळ्यात पालेभाज्या कमी मिळतात, पण घरातल्या छोट्या जागेत-छोट्या कुंडीतही पालेभाजी उत्तम वाढू शकते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2024 05:04 PM2024-06-21T17:04:18+5:302024-06-21T17:07:43+5:30

पावसाळ्यात पालेभाज्या कमी मिळतात, पण घरातल्या छोट्या जागेत-छोट्या कुंडीतही पालेभाजी उत्तम वाढू शकते.

leafy vegetables you can grow in the rainy season, eat fresh leafy vegetables from your home garden this monsoon! | घरातल्या छोट्याशा कुंडीतही रुजतात सुंदर पालेभाज्या, यंदाच्या पावसाळ्यात खा ताजीताजी पालेभाजी घरच्या बागेतली!

घरातल्या छोट्याशा कुंडीतही रुजतात सुंदर पालेभाज्या, यंदाच्या पावसाळ्यात खा ताजीताजी पालेभाजी घरच्या बागेतली!

Highlightsउपलब्ध जागेप्रमाणे एकाच प्रकारची किंवा वेगवेगळ्या भाज्या लावता येतील.

अंजना देवस्थळे (लेखिका हॉर्टिकल्चरिस्ट आहेत.)


पावसाळ्यात हिरवळ दाटे चोहिकडे जरी असली तरी हिरव्या भाज्यांचा मात्र तुटवडाच असतो. रानातल्या पालेभाज्या, कुर्डू,फोडोशी,कोरल, भरांगी या दिवसात खूप मिळतात पण आपल्याला जर मेथी,पालक, कोथिंबीर हवी असेल तर मग अवघड होतं. त्याचं कारण असं की या पालेभाज्या नाजूक असल्यामुळे अती पाणी सहन करू शकत नाहीत. शेतात पाणी जरा जास्त झालं की सगळी भाजी संपलीच! पण आपण आपल्या लहानशा सुरक्षित बागेत या भाज्या हमखास लावू शकतो. ते कसं, बघूया..

पालेभाज्या कशा लावायच्या?

पाले भाज्यांचा कार्यक्रम अगदी झटपट होतो. अवघ्या ३० दिवसात आपलं शेत काढणी साठी तयार होतं. त्यासाठी खूप खोल कुंड्या न घेता पसरट कुंड्या घ्याव्या. नेहेमीप्रमाणे कुंडीला खाली मोठं छिद्र असावं. त्यात चांगलं कुजलेलं शेणखत आणि माती घालावी. उपलब्ध जागेप्रमाणे एकाच प्रकारची किंवा वेगवेगळ्या भाज्या लावता येतील.

बिया?

आपल्या घरी मेथी, मोहोरी, धणे, बाळंत शेपा असतातच. ते बियाणे म्हणून वापरता येतील. पालक, आंबट चुका,अंबाडी,माठ लावायचे असतील तर बिया विकत घेता येतील.

काही प्रक्रिया करावी लागते का?

बिया जरा भिजवून पेरल्या की लवकर रुजतात. आठ तासांपेक्षा जास्त वेळ भिजवायचे नाही. धणे जरासे चिरडून पेरावे लागतात. लाटणं हलकंसं फिरवलं तरी चालतं. कुटायचे नाहीत.




किती दिवस लागतात बिया रुजायला?

धणे पेरल्या पेरल्या कोथिंबिरीचे स्वप्नं बघू नका. कारण ते रुजायला कितीही दिवस घेऊ शकते. अगदी पंधरा दिवस पण. त्या उलट राई पेरून सरसों का साग लगेच हाती लागेल. मेथीपण तशीच दुसऱ्या दिवशी रुजते.

किती वेळा काढता येते भाजी?

मेथी, शेपू सारख्य भाज्या एकदाच उपटून काढता येतात. 
पालक, अंबाडी,माठ एकदा पेरले की त्याची पानं, देठ खुडून काढता येतात. तीन ते चार महिने दर आठवडा दहा दिवसात जुड्या काढता येतात. माठ लावल्यास अगदी जून होवून त्याचे देठसुद्धा भाजीत वापरता येतात.

https://www.instagram.com/anjana_dewasthale/
 

Web Title: leafy vegetables you can grow in the rainy season, eat fresh leafy vegetables from your home garden this monsoon!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.