माेगऱ्याचा सुगंध जसा मोहक असतो, तसाच मधुकामिनीचा सुगंध मंद- धुंद असतो.. एवढंसं ते फूल पण अख्ख्या अंगणात सुवास पसरवतं.. उन्हाळ्यात अंगणात किंवा बाल्कनीमध्ये खुर्ची टाकून रिलॅक्स, हवेशीर बसल्यावर जर वाऱ्याच्या झुळूकेसोबत मधुकामिनीचा मंद सुवास आला, तर तो आनंदच वेगळा.. हा आनंद घ्यायचा असेल तर येत्या सिझनसाठी (terrace garden tips) तुमच्या मधुकामिनीला आतापासूनच तयार करा. तिची थोडी काळजी, काय हवं- नको ते विचारा आणि मग बघा कशी फुलांनी बहरून जाईल तुमच्या अंगणातली मधुकामिनी... मिनिकामिनी, मुरय्या अशा नावानेही हे फूल ओळखलं जातं.
मधुकामिनीला वर्षातून अनेक महिने फुलं येतात. एप्रिल ते नोव्हेंबर हा तिचा फुलण्याचा कालावधी. पण त्यातही कडक उन्हाळा म्हणजेच मार्चचा मध्य ते जून या काळात मधुकामिनीला भरभरून फुलं येतात. नोव्हेंबरपर्यंत कमी अधिक फुलं येत राहतात. पण जशी कडाक्याची थंडी सुरू होते, तसं मधुकामिनीला फुलं येणं बंद होतं.. उंच आणि कमी उंचीचे असे मधुकामिनीचे दोन प्रकार. यातील कमी उंचीचे रोपटे आपण ८ ते १० इंच किंवा १२ इंच कुंडीतही लावू शकतो.
अशी घ्यावी लागते मधुकामिनीची काळजी
How to take care of madhukamini plant?
- मधुकामिनीच्या कुंडीत अर्धी माती, अर्धी वाळू आणि थोडंसं खत टाका.
- ४ ते ५ तास या झाडाला ऊन मिळालं पाहिजे, अशा ठिकाणी कुंडी ठेवा.
- या रोपट्याला खूप पाणी टाकू नका. पण कुंडीतली माती कायम ओलसर असेल, याची काळजी घ्या.
- फेब्रुवारीनंतर मधुकामिनीचा सिझन सुरू होतो. त्यामुळे फेब्रुवारीत त्याला खत नक्की द्या...
- फेब्रुवारीत या झाडाची छाटणी करा, यामुळेही फुलं येण्यावर खूप चांगला परिणाम होतो.
मधुकामिनीला खत कसं द्याल..
१. नायट्रोजन आणि पोटॅशियम या दोन खतांची मधुकामिनीला गरज असते. त्यामुळे ही दोन खते सिझनपुर्वी या झाडांना नक्की द्या.
२. चहा झाल्यानंतर उकळलेल्या चहा पावडरचं पाणी आणि केळ्यांची सालं रात्रभर भिजत घातलेलं पाणी या दोन्ही गोष्टी मधुकामिनीसाठी उत्तम खत ठरतात.
३. गांडूळ खत हे देखील या झाडासाठी उत्तम खत आहे.