आपण बरेचदा रोपांच्या कुंड्यांमध्ये किंवा झाडांच्या मुळाशी मुंग्या लागलेल्या पाहिले असेलच. या रोपांच्या मुळांशी असलेल्या मुंग्या रोपांचे अनेक प्रकारे नुकसान करतात. या मुंग्या रोपांवर तसेच रोपांच्या पानांवर चढून किंवा मुळांना इजा पोहचवून रोपांची नासधूस करतात. रोपांना एकदा मुंग्या लागल्या की त्या जाता जात नाहीत. रोपांवर सतत येणाऱ्या या मुंग्यांची (How do you keep ants away from plants) संख्या वाढली तर या मुंग्या रोपांच्या वाढीपासून आरोग्यापर्यंत अनेक गोष्टींची नासधूस करतात. अशावेळी रोपांवर चिकटलेल्या मुंग्या कायमच्या दूर होऊन रोपांचे संरक्षण करण्यासाठी आपण बाजारांतून वेगवेगळ्या प्रकारची खते, औषधे, किटकनाशक विकत आणतो(Make natural pesticides at home to keep your plants ant-free).
या किटकनाशकांमध्ये हानिकारक रसायनांचा वापर फार मोठ्या प्रमाणावर केलेला असतो. यामुळे रोपांचे आरोग्य तर धोक्यात येतेच सोबतच त्यांच्या वाढीवर आणि फळं - फुलं येण्याच्या नैसर्गिक प्रक्रियेत अडथळा (How to Get Rid of Ants in Garden Without Killing Plants) निर्माण होतो. अशा परिस्थितीत, मुग्यांपासून (A Home Remedy for Ants) रोपांचा बचाव करण्यासाठी आपण काही घरगुती नैसर्गिक पदार्थांचा नक्कीच वापर करु शकतो. या घरगुती उपायांमुळे रोपांचा मुग्यांपासून बचाव करण्यासोबतच त्यांच्यावर हानिकारक किटकनाशक फवारण्याची गरजच भासणार नाही(How To Protect Home Garden Plants From Ants With Kitchen Ingredients).
मुग्यांपासून रोपांचे संरक्षण करण्याचे सोपे घरगुती उपाय...
१. हिरव्या मिरच्यांचा स्प्रे :- रोपांच्या कुंड्यातील मुंग्यांना कायमचे दूर करण्यासाठी किचनमधील रोजच्या वापरातील हिरव्या मिरच्यांचा खूप उपयोग होतो. यासाठी हिरव्या मिरच्या बारीक करून त्या पाण्यात उकळा. आता हे द्रावण गाळून एका बाटलीत भरुन घ्या. त्यानंतर हे द्रावण मुंग्या असलेल्या भागावर स्प्रे करा. त्याचा वास आणि तिखटपणा यामुळे मुंग्या कायमच्या रोपांपासून दूर पळून जातील.
कावळे-कबुतर कुंडीतील रोपांची नासधूस करतात? करा एक भन्नाट घरगुती युक्ती, रोपं राहतील सुरक्षित...
२. लसूण पाकळ्या :- किचनमधील हिरव्या मिरच्यांप्रमाणेच आपण लसूण पाकळ्या व त्यांची सालं या दोघांचा वापर करु शकता. लसूणची पाकळी आणि सालं यांचे एकत्रित द्रावण रोपांवर एखाद्या किटकनाशकांप्रमाणेच काम करते. यासाठी लसणाच्या पाकळ्या आणि त्यांची सालं एकत्रित हलकेच ठेचून बारीक करुन घ्यावेत. त्यानंतर या लसूण पाकळ्या आणि सालं पाण्यांत घालून ते पाणी उकळवून घ्यावे. पाणी उकळवून थंड झाल्यानंतर हे एका स्प्रे बाटलीत भरुन ठेवावे. जेव्हा रोपांच्या कुंडीत मुंग्या येतील तेव्हा त्यांच्यावर हे द्रावण स्प्रे करावे. या उपायामुळे, लसणाच्या उग्र आणि तिखट वासाच्या मदतीने मुंग्या कमी होण्यास मदत होते.
कुंडीतल्या रोपांची माती बदलण्याची वेळ झाली कसं ओळखाल? लक्षात ठेवा २ गोष्टी-पाहा योग्य पद्धत...
३. दालचिनी पावडर :- जर रोपांच्या कुंडीत सतत येणाऱ्या मुंग्यांपासून कायमची सुटका करून घ्यायची असल्यास दालचिनी पावडर उपयोगी ठरेल. यासाठी दालचिनीची पावडर तयार करून ही पावडर पाण्यांत मिसळून ते पाणी एका स्प्रे बॉटलमध्ये भरुन स्टोअर करून ठेवा. दालचिनीचे पाणी रोपांच्या कुंड्यांमध्ये किंवा रोपांच्या आसपासच्या सगळ्याच भागात स्प्रे करून घ्यावे. मुंग्यांना दालचिनी पावडरचा उग्र आणि तिखट वास पसंत नसतो, यामुळेच मुंग्यांचे प्रमाण कमी होण्यास मदत मिळते.
४. कॉफीचे पाणी :- जर या मुंग्या जास्त प्रमाणात असतील आणि त्यांच्यापासून कायमची सुटका मिळवायची असेल तर कॉफीच्या पाण्याचा वापर करावा. खरतरं, कॉफीमध्ये असलेले कॅफिन मुंग्यांना दूर ठेवण्यास मदत करते. यासाठी कॉफी पावडर पाण्यात घालून ते पाणी व्यवस्थित गरम करा आणि मुंग्या असलेल्या भागावर हे उकळते पाणी ओता, किंवा कुंड्यांच्या आसपासच्या भागात देखील आपण हे पाणी ओतू शकता. यामुळे रोपांना मुंग्या चिकटून बसणार नाहीत.