आपल्यापैकी बहुतेक सगळ्यांच्या घरात किंवा गार्डनमध्ये मनी प्लांट असते. मनी प्लांट आपल्या घराची व गार्डनची शोभा वाढवते. हिरवीगार मनी प्लांट दिसायला इतकी सुंदर असते की तिच्याकडे बघून आपले मन प्रसन्न होते. मनी प्लांट आपण दोन प्रकारे लावू शकतो. कुंडीत माती घेऊन मातीत किंवा फक्त एका बाटलीत पाणी घेऊन त्यात देखील आपण ही मनी प्लांट लावू शकतो. मनी प्लांट कुठेही, कशीही लावली तरीही ती बहरून छान हिरवीगार होऊन स्वतःची स्वतः वाढत जाते. मनी प्लांटचा वेल हा आपण कित्येकदा कुंडीतून वर वर वाढत जाऊन भिंतींवर पसरलेला पाहिला असेलच(Make Your Own Moss Pole for Indoor Climbing Plants).
मनी प्लांट्सची योग्य पद्धतीने छान वाढ होण्यासाठी काहीजण शेवाळा पासून तयार झालेल्या महागड्या मॉस स्टिक्सचा वापर करतात. ही मॉस स्टिक शेवाळापासून तयार केली असल्यामुळे त्यात पाणी शोषून घेण्याची क्षमता असते. मनी प्लांट्सचा वाढत जाणारा वेल जर या मॉस स्टिकला गुंडाळून ठेवला तर या मॉस स्टिकमधून ( how to make the best moss sticks for your climbing plants) मनी प्लांट्ला आवश्यक अन्न आणि पाणी मिळते. याचबरोबर या वाढत जाणाऱ्या मनी प्लांटच्या वेलीला आधार देण्यासाठी देखील या मॉस स्टिकचा वापर केला जातो. बाजारात उपलब्ध असलेल्या शेवाळाच्या मॉस स्टिक्स सगळ्यांनाच विकत घेणे शक्य होत नाही, कारण चांगल्या दर्जाच्या आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या मॉस स्टिक्स थोड्या महाग असतात. अशावेळी आपण घरच्याघरी काही टाकाऊ वस्तूंचा वापर करुन झटपट सोप्या पद्धतीने मनी प्लांट्ससाठी मॉस स्टिक्स तयार करु शकतो(Make your own Moss Sticks of any size at home for Money Plants).
मनी प्लांटसाठी मॉस स्टिक कशी तयार करावी ?
मनी प्लांटसाठी मॉस स्टिक हा एक उत्तम पर्याय आहे. जर आपल्या मनी प्लांट्सची छान वाढ होऊन ती छान हिरवीगार व्हावी यासाठी आपण या मॉस स्टिकचा वापर करु शकतो. याचबरोबर या वाढत जाणाऱ्या मनी प्लांट्सला काठी किंवा भिंतींचा आधार देण्यापेक्षा या मॉसला गुंडाळून ठेवल्यास मनी प्लांट्सची वाढ अतिशय चांगल्या प्रकारे होते.
विड्याच्या पानांचा वेल होईल हिरवागार, वाढेल भरभर - करा फक्त ५ गोष्टी, तब्येतीत खा विडा...
मनी प्लांट्ससाठी मॉस स्टिक तयार करण्याचे साहित्य :-
१. जुने गोणपाट
२. लाकडाची काठी
३. पातळ दोरी
४. नारळाच्या काथ्या
५. सुके गवत
मॉस स्टिक कशी तयार करावी ?
१. मॉस स्टिक तयार करण्यासाठी गोणपाटच्या कापडाचे दोन सामान भागात कापून घ्यावे.
२. त्यानंतर त्यापैकी एक गोणपाटाचे कापड अंथरुन त्यावर सुके गवत पसरवून घ्यावे.
३. आता या कापडाच्या बरोबर मधोमध एक लाकडी काठी ठेवावी आणि या काठीभोवती हे गोणपाटाचे कापड गोलाकार आकारात गुंडाळून घ्यावेत. आता हे कापड सुतळीने बांधून घ्यावे. मनी प्लांट्ससाठी मॉस स्टिक तयार आहे.
गुलाबाच्या पानांचा रंग बदलला ? करा ३ सोपे उपाय, पाने होतील हिरवीगार...
ज्यूटच्या दोरीपासून मॉस स्टिक बनवा...
एक लाकडाची काठी घेऊन त्याला नारळाचा काथ्या दोरीच्या मदतीने घट्ट बांधून घ्यावा. त्यानंतर त्यावर गोणपाटाचे कापड गुंडाळून घ्यावे आणि दोरीने घट्ट बांधून घ्यावे. अशाप्रकारे आपण उरलेल्या टाकाऊ वस्तूंपासून घरच्या घरी मनी प्लांट्ससाठी मॉस स्टिक तयार करु शकतो.