Lokmat Sakhi >Gardening > सुट्टी निमित्त घराबाहेर असताना घरच्या झाडांना पाणी कोण घालणार अशी चिंता सतावते ? घ्या १ सोपी ट्रिक, झाड राहतील फ्रेश...

सुट्टी निमित्त घराबाहेर असताना घरच्या झाडांना पाणी कोण घालणार अशी चिंता सतावते ? घ्या १ सोपी ट्रिक, झाड राहतील फ्रेश...

How to Make a Drip Irrigator from a Plastic Bottle : काहीवेळा सुट्टी निमित्ताने घरातील सगळेचजण एकत्रित बाहेर पडले तर झाडांना पाणी कोण घालणार हा प्रश्न पडतो, यासाठीच हा सोपा उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2023 12:32 PM2023-10-31T12:32:34+5:302023-10-31T12:50:36+5:30

How to Make a Drip Irrigator from a Plastic Bottle : काहीवेळा सुट्टी निमित्ताने घरातील सगळेचजण एकत्रित बाहेर पडले तर झाडांना पाणी कोण घालणार हा प्रश्न पडतो, यासाठीच हा सोपा उपाय...

Making A Plastic Bottle Irrigator For Plants, Plant watering tool made of plastic bottles | सुट्टी निमित्त घराबाहेर असताना घरच्या झाडांना पाणी कोण घालणार अशी चिंता सतावते ? घ्या १ सोपी ट्रिक, झाड राहतील फ्रेश...

सुट्टी निमित्त घराबाहेर असताना घरच्या झाडांना पाणी कोण घालणार अशी चिंता सतावते ? घ्या १ सोपी ट्रिक, झाड राहतील फ्रेश...

'पाणी' हे जीवन आहे. पाण्याशिवाय या पृथ्वीवरील कोणताही सजीव जिवंत राहू शकत नाही. कुठलाही सजीव जीव मग तो मनुष्य, प्राणी किंवा झाड असू दे, सगळ्यांना पाण्याची तितकीच गरज असते. पाणी नसेल तर आपले जीवन शून्य आहे. ज्याप्रमाणे आपण रोज पाणी पितो त्याचप्रमाणे झाडांना देखील दररोज पाणी घालावे लागते. झाडांना दररोज पाणी घातल्याने झाड ताजीतवानी, फ्रेश दिसतात. जर का आपण एक - दोन दिवस जरी झाडांना पाणी घातले नाही तर ही झाड कोमेजून जातात(Plant watering tool made of plastic bottles).

बरेचदा आपण आपल्या घराच्या बाल्कनीत किंवा गॅलेरीत (How to recycle plastic bottles to water your plants) मोठ्या हौसेने झाड लावतो. या झाडांची आपण अगदी मुलांप्रमाणेच काळजी घेतो. या झाडांना वेळच्यावेळी योग्य प्रमाणांत खत, पाणी, सूर्यप्रकाश मिळाला तर ही झाड बहरुन येतात. सूर्यप्रकाश व पाणी या दोन झाडांच्या वाढीसाठी असणाऱ्या महत्वाच्या गोष्टी आहेत. सध्या सणावाराचे दिवस सुरू आहेत, यानिमित्ताने आपण काहीवेळा सुट्टी घेऊन बाहेर फिरायला निघतो. अशावेळी आपल्याला चिंता लागून राहते ती (How to make Gardening Water Can with waste material) झाडांना पाणी कोण घालणार ? परिवारातील सगळेचजण एकत्रित फिरायला निघाले की या झाडांकडे कोण लक्ष देणार असे होते. अशावेळी फिरायला बाहेर पडताना आपला अर्धा जीव त्या झाडांच्या काळजीने बेजार होतो. तसेच काहीवेळा आपण परत येईपर्यंत या झाडांना पाणी न मिळाल्याने काहीवेळा ती कोमेजून जातात. अशावेळी नेमके काय करावे हे सुचत नाही. यंदाच्या दिवाळीच्या सुट्टीत (How to Make a Plant Waterer from a Plastic Bottle, Handy Gardening Hacks) जर आपण देखील बाहेर फिरायला जाणार असाल तर घरी असलेल्या झाडांना पाणी देण्याची एक सोपी ट्रिक लक्षात घेऊयात. जेणेकरुन, आपण परत येईपर्यंत झाडांना व्यवस्थित पाणी मिळून ती आहेत तशीच फ्रेश राहतील(Making a Self Watering Pot from a Plastic Bottle).

झाडांना पाणी घालण्याची एक सोपी ट्रिक... 

जर आपण सुट्टीच्या दिवसांत २ ते ३ दिवस कुठे बाहेर जाणार असाल अशावेळी आपल्या घरातील झाडांना पाणी कोण घालणार अशी चिंता सतावते. त्याचबरोबर झाडांना बरेच दिवस पाणी नाही मिळाले तर झाड कोमेजून जातात. यावर एक सोपा उपाय म्हणून आपण एक साधी - सोपी ट्रिक वापरु शकतो. 

शहाळे पिऊन झाल्यानंतर फेकून देता? अजिबात फेकू नका, पाहा भन्नाट आयडिया, करा घरात डेकोरेशन...

१. एक मोठी प्लॅस्टिकची रिकामी बॉटल घ्यावी. शक्यतो बॉटल थोडी मोठी घ्यावी जेणेकरुन त्यात जास्तीत जास्त पाणी राहू शकेल. 

२. आता या बॉटलच बूच गच्च लावून बंद करून घ्यावे. या बाटलीच्या बुचाला बरोबर मधोमध एक लहान छिद्र पाडून घ्यावे. 

३. या बुचाला पाडलेल्या लहान छिद्रांत एक एअर बड्स घालून घ्यावा. 

प्राजक्ताच्या फुलांचा अंगणात पडेल सडा, वापरा फक्त ३ नैसर्गिक खतं ! प्राजक्ताचं झाड घराजवळ असणे आनंददायी !

जास्वंदीच्या झाडावर फुलंच उमलत नाहीत ? ४ सोपे उपाय, लालचुटुक फुलांनी बहरुन जाईल झाड...

४. आता ही बॉटल कुंडीतल्या मातीत उलटी उभी करून ठेवता येण्यासाठी म्हणून त्या बॉटलला दोन्ही बाजुंनी दोन लाकडी काट्या चिकटपट्टीच्या साहाय्याने चिटकवून घ्याव्यात. 

५. त्यानंतर ही बाटली पाण्याने पूर्ण भरून घ्यावी. आता बाटलीचे बूच गच्च लावून घ्यावे. 

६. पाण्याने बाटली भरुन घेतल्यानंतर ही बाटली कुंडीतल्या मातीत, बाटलीला लावलेल्या काटीच्या मदतीने उलटी करुन ठेवावी. असे केल्याने बाटलीच्या बुचाला पाडलेल्या लहान छिद्रांतून थेंब थेंब पाणी पडत राहते. हे पाणी कुंडीतल्या मातीत मुरुन झाडांच्या मुळांपर्यंत पोहोचते. 

या एका झटपट होणाऱ्या सोप्या ट्रिकचा वापर करून आपण झाडांना किमान पुढेचे ४ ते ५ दिवस नक्कीच पाणी देऊ शकतो. यामुळे जर आपण सुट्टीच्या निमित्ताने घरातील सगळेचजण बाहेर जाणार असाल तर झाडांना पाणी कोण घालणार ही चिंता आता सोडा. या एका सोप्या ट्रिकचा वापर करून आपण झाडांना पाणी घालू शकतो.

Web Title: Making A Plastic Bottle Irrigator For Plants, Plant watering tool made of plastic bottles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.