सुवासिक पुदिना चटणी, आमटी अशा पदार्थांमध्ये घातला तर त्या पदार्थाची चव जास्त खुलून येते. एखाद्या पदार्थाची चव खुलविण्यासाठी पुदिना जसा उपयुक्त ठरतो, तसाच तो त्या पदार्थाची पौष्टिकता वाढविण्यासाठीही फायदेशीर असतो. पुदिन्यामध्ये असणारे घटक पचनक्रिया अधिक चांगली होण्यासाठी मदत करतात. त्यामुळे ज्यांना नेहमीच अपचन होते त्यांनी तर नेहमीच पुदिना खावा. पुदिन्यामध्ये असणारे ॲण्टीऑक्सिडंट्स त्वचेचं तारुण्य टिकवून ठेवण्यासाठीही मदत करतात. ताण कमी करणे, मेंदूचे कार्य सुधारणे, मुखदुर्गंधी दूर करणे असेही पुदिना नियमितपणे खाण्याचे फायदे आहेत (most simple method for growing pudina or mint plant). त्यामुळे या एका अतिशय सोप्या पद्धतीने गॅलरीमध्ये पुदिन्याचं रोप लावा आणि ताजा ताजा पुदिना नेहमीच खा...(how to grow pudina plant without soil and pot?)
पुदिन्याचं रोप कसं लावावं?
आता कोणतंही रोप लावायचं म्हटलं तरी माती, कुंडी या दोन गोष्टी तर पाहिजेतच असं आपल्याला वाटतं.. पण पुदिन्याचं रोप लावण्याची जी भन्नाट ट्रिक आपण पाहणार आहोत त्यासाठी ना मातीची गरज आहे ना कुंडीची..
काजूच्या बोंडूचं भरीत- ऐश्वर्या नारकरांनी सांगितली कोकणातली पारंपरिक रेसिपी, व्हिडिओ व्हायरल
तुम्हाला पुदिन्याची एक काडी, छोटासा स्पंजचा तुकडा आणि एक रिकामी बाटली एवढंच सामान लागणार आहे.
सगळ्यात आधी तर पुदिन्याच्य काडीला जर जास्त पानं असतील तर ती कापून घ्या. यानंतर बाटलीसुद्धा मधोमध कापा.
बाटलीच्या समाेरच्या निमुळत्या भागात स्पंज खोचा आणि त्या स्पंजमध्ये पुदिन्याची काडी खोचा. आता बाटलीचा जो दुसरा भाग आहे त्यामध्ये थोडं पाणी भरा आणि ज्या भागात पुदिन्याची काडी खोचली आहे तो भाग अशा पद्धतीने बसवा की पुदिन्याचं देठ बाटलीमधल्या पाण्यामध्ये जाईल.
उशीचे कव्हर धुतले तरी उशीवरचे डाग तसेच राहतात? बघा न धुता उशी स्वच्छ करण्याची ट्रिक
आता ही बाटली जिथे चांगला सुर्यप्रकाश येतो, त्या ठिकाणी ठेवून द्या. दर ३ ते ४ दिवसांनी बाटलीतलं पाणी बदलून टाका. हळूहळू पुदिना छान वाढत जाईल. हा उपाय करून तुम्ही तुमच्या घरापुरता पुदिना नक्कीच उगवू शकता. करून पाहा..