बाल्कनी किंवा गार्डनमध्ये गुलाबाची बहरलेली फुलं खूपच छान दिसतात. ही फुलं संपूर्ण घराची सुंदरता वाढवण्याचे काम करतात (Natural Fertilizer For Rose Plant). लोक आपल्या बाल्कनीमध्ये किंवा गार्डनमध्ये गुलाब लावतात. जेणेकरून त्यांचे घर गुलाबाच्या फुलाच्या सुगंधानं दरवळेल. पण वेळेअभावी या रोपाची काळजी घेऊ शकत नसाल तर काही सोप्या टिप्स वापरून तुम्ही रोप बहरलेलं ठेवू शकता. (Bottle Gourd Peel For Rose Plant Fertilizer Without Chemical)
गुलाबाच्या फुलांनी गार्डन नेहमी बहरेलं राहावं यासाठी दुधीच्या सालींचा वापर करा. या सालींपासून तयार झालेले फर्टिलायजर फुलांसाठी उत्तम ठरते. हे खत कोणत्याही टॉनिकपेक्षा कमी नाही (Ref). हे खत घरी तयार करणं खूपच सोपं आहे दुधीच्या सालीपासून हे खत तयार करण्याच्या सोप्या स्टेप्स पाहूया. या सालींची पावडर बनवूनही तुम्ही रोपात घालू शकता.
गुडघ्यांमध्ये तीव्र वेदना-पाय खूप दुखतात? ग्लासभर दुधात ४ पदार्थ घालून प्या; दुखणं होईल कमी
गुलाबाच्या रोपासाठी दुधीच्या सालीचं खत कसं बनवायचं?
गुलाबााच्या रोपासाठी नैसर्गिक फर्टिलायजर बनवण्यासाठी तुम्हाला जास्त सामानाची गरज लागणार नाही. फक्त दुधीची सालं लागतील, अन्नाचं पाणी, मीठ हे साहित्य लागेल. या पदार्थांच्या मदतीनं तुम्ही लिक्विड फर्टिलायजर तयार करू शकतात. हे खत अनेकदृष्ट्या रोपासाठी फायदेशीर ठरतं. यातील जिंक आणि व्हिटामीन बी-१२ मातीला पोषण देतात. याचा नियमित वापर केल्यानं रोपाची वाढ चांगली होते आणि भरपूर फुलं येतात.
दुधीच्या सालीचे खत कसे तयार करावे?
दुधीच्या सालीचं खत बनवण्याासठी सगळ्यात आधी याची सालं एका बाऊलमध्ये एकत्र करा. त्यात १ लिटर पाणी घालून २ ते ३ दिवस घराच्या कोणत्याही कोपऱ्यात ठेवा. नंतर दुधीच्या साली जारमध्ये घालून वाटून घ्या. नंतर एका बाऊलमध्ये १ लिटर पाणी जसं तांदूळ, डाळी, गव्हाचं पाणी वापरू शकता. या पाण्यात दुधीच्या सालीची पेस्ट घाला. यात दोन छोटे चमचे मीठ घालून एक पातळ मिश्रण तयार करा. तयार फर्टिलायजर तुम्ही गुलाबाच्या रोपांत घालू शकता.
या फर्टिलायजरचा वापर गुलाबाच्या रोपात सकाळी किंवा संध्याकाळी कोणतीही एक वेळ ठरवून करा. खत घालण्याआधी गुलाबाची माती थोडी खोदून घ्या. नंतर त्यात मातीपासून तयार झालेलं फर्टिलायजर घाला. हे खत घातल्यानंर त्यात १ ते २ चमचे मीठ घाला.