गुलाबाचं रोप घरात लावणं अनेकांना आवडते. (Gardening Tips) पण योग्य काळजी न घेतल्यामुळे गुलाबाचे झाड व्यवस्थित वाढत नाही. मार्केटमध्ये गुलाबाच्या रोपं सहज मिळतात ज्यांची किंमतही फार जास्त असते. (Home Gardening Ideas) काही सोप्या ट्रिक्स तुमचं काम सोपं करू शकतात. ज्यासाठी तुम्हाला जास्त खर्चही करावा लागणार नाही. गुलाबाचे रोप वाढवण्याची सोपी ट्रिक पाहूया. (Natural Fertilizer For Rose Plant) फळांची सालं, कॉफी, ताक, दूध असे रोजच्या वापरातले पदार्थ उत्तम खत म्हणून काम करतात.
गुलाबाला भरपूर फुलं येण्यासाठी घरगुती खत (Homemade Fertilizer For Rose Plant)
माय ऑर्गेनिक गार्डनच्या रिपोर्टनुसार केळीच्या सालीचा वापर करून तुम्ही गुलाबासाठी खत म्हणून करू शकता. याशिवाय दूध पावडरमध्ये पाणी मिसळून या पाण्याचा स्प्रे पंधरा दिवसातून एकदा झाडावर करा. दूधात कॅल्शियम असल्यामुळे रोपाची चांगली वाढ होईल आणि फुलंही येतील. गुलाबाच्या झाडात तुम्ही फिश टँकचं पाणी घालू शकता. फिश टँकच्या पाण्यात नायट्रोजन, फॉस्फरेस, पोटॅशियम, अमोनिया आणि मायक्रोऑर्गनिझम्स असतात. ज्यामुळे मातीला पोषण मिळते आणि झाडं पटापट वाढतात. फक्त मीठाचे पाणी मातीत घालणं टाळा. (रात्री लवकर झोपच येत नाही? खोलीत 'ही' ५ रोपं ठेवा, रात्रभर लागेल गाढ-शांत झोप)
१० रूपयांत गुलाबासाठी लिक्विड कसं तयार करायचं? (Fertilizer For Rose Plant In 10 Rupee's )
गुलाबाच्या झाडाला पाण्याबरोबरच इतर लिक्विड्सची आवश्यकताही असते. तुम्ही घरच्याघरी १० मिनिटांत लिक्विड तयार करू शकता. हे लिक्विड तयार करण्यासाठी १ पाकीट इनो घ्या. पाण्यात इनो घालून मिक्स करा. त्यानंतर अर्धा चमचा मीठ घाला. आठवड्यातून एकदा हे लिक्विडचा रोपावर आणि मातीत स्प्रे करा. (छोट्याशा कुंडीतही लावू शकता केसर; घरीच कमी जागेत केशर लावण्याची सोपी ट्रिक, मिळेल शुद्ध केसर)
रोपात घरगुती लिक्विड घालण्याचे फायदे (Benefits of Organic Fertilizers)
हे द्रावण जेव्हा तुम्ही झाडांमध्ये घालाल तेव्हा फुलं छान फुललेली दिसून येतील आणि झाडं बहरलेलं राहील. गुलाबाच्या झाडाला जेव्हा किडे लागतात तेव्हा ते टाळण्यासाठी तुम्ही या द्रावणाचा पुन्हा वापर करू शकता. बदलत्या वातावरणात रोपांसाठी इनो वापरणं फायदेशीर ठरू शकतं. आठवड्यातून एकदा खत घालायला विसरू नका. या ट्रिक्सनी गुलाबाचे रोप बहरलेलं दिसेल.
रोपाच्या वाढीसाठी कॉफीसुद्धा फायदेशीर
प्लांट्स केअर टु डे च्या अहवालानुसार कॉफीची पावडर किंवा बीया मातीत मिसळ्याने नायट्रोजन मिळते आणि रोपांची भराभर वाढ होते. पाण्यात मिसळून हे लिक्विड पावडर मातीत मिसळा. २ ते ३ दिवसांनी कॉफीच्या पाण्याचा स्प्रे झाडांवर करा. याशिवाय तुम्ही ताकात पाणी मिसळूनही पंधरा दिवसातून एकदा या पाण्याचा स्प्रे रोपावर करू शकता.