Lokmat Sakhi >Gardening > घरात प्रसन्न वातावरण, स्वच्छ हवा हवी? भरपूर ऑक्सिजन देणारी ही 6 रोपं घरात हवीच..

घरात प्रसन्न वातावरण, स्वच्छ हवा हवी? भरपूर ऑक्सिजन देणारी ही 6 रोपं घरात हवीच..

आपण घराच्या बाल्कनीत किंवा गॅलरीत मोगरा, गुलाब, शेवंती यांसारखी रोपं लावतो. पण घराची शोभा वाढविण्यासाठी आणि घरातील हवा स्वच्छ ठेवण्यासाठी काही रोपं लावली तर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2021 11:39 AM2021-11-17T11:39:02+5:302021-11-17T11:57:49+5:30

आपण घराच्या बाल्कनीत किंवा गॅलरीत मोगरा, गुलाब, शेवंती यांसारखी रोपं लावतो. पण घराची शोभा वाढविण्यासाठी आणि घरातील हवा स्वच्छ ठेवण्यासाठी काही रोपं लावली तर...

Need a pleasant atmosphere in the house, clean air? These 6 plants that provide a lot of oxygen are needed in the house.. | घरात प्रसन्न वातावरण, स्वच्छ हवा हवी? भरपूर ऑक्सिजन देणारी ही 6 रोपं घरात हवीच..

घरात प्रसन्न वातावरण, स्वच्छ हवा हवी? भरपूर ऑक्सिजन देणारी ही 6 रोपं घरात हवीच..

Highlightsगॅलरी आणि बाल्कनीसोबत घरातही लावा ही रोपे, हवा शुद्ध होण्यास मदत घरात ऑक्सिजनची पातळी चांगली राहण्यासाठी या रोपांची होईल मदत, घरही होईल सुशोभित

कोरोनामुळे आपल्याला मागच्या वर्षभरात ऑक्सिजनचे खरे महत्त्व लक्षात आले. ऑक्सिजनअभावी रुग्णांची होणारी ससेहोलपट आणि त्यामुळे होणारे मृत्यू आपल्यातील अनेकांनी डोळ्यांनी पाहीले. एरवी आपण हवेतून ऑक्सिजन घेतो पण ते आपल्या लक्षातही येत नाही. आपण घरच्या घरी या ऑक्सिजनची निर्मिती करु शकलो तर? वाचून काहीसे आश्चर्य वाटू शकते, पण उत्तम आरोग्यासाठी आवश्यक असलेली शुद्ध हवा आणि ऑक्सिजन आता तुम्हाला घरच्या घरी तयार करता येऊ शकतो. तो कसा, तर तुम्ही घराच्या बाल्कनीत, लिव्हींग रुममध्ये आणि अगदी बेडरुममध्येही ऑक्सिजन देणारी रोपे लावू शकता. विशेष म्हणजे रोपांमुळे घराची शोभा तर वाढेलच आणि तुम्हाला ऑक्सिजनही मिळेल. त्यामुळे एकाच कामामुळे तुमचा दुहेरी लाभ होणार आहे. आता अशी कोणती रोपे आहेत ज्यामुळे तुम्हाला ऑक्सिजन मिळू शकतो, पाहूयात...

(Image : Google)
(Image : Google)

 १. स्पायडर प्लांट - घरात ज्याठिकाणी सर्वाधिक उजेड येतो अशा ठिकाणी हे रोप ठेवल्यास त्याची वाढ चांगली होते. मात्र थेट सूर्यप्रकाश पडणे उपयोगाचे नाही. या रोपाला जास्त पाण्याची आवश्यकता नसते त्यामुळे तुम्ही हे झाड लिव्हींग रुम किंवा बेडरुममध्येही सहज ठेऊ शकता. वातावरणातील कार्बन मोनॉक्साइडची तीव्रता कमी करुन ऑक्सिजनची पातळी वाढविण्यासाठी हे रोप उत्तम आहे. 

२. बेबी रबर प्लांट - हवेमध्ये असणारे विषाणू किंवा रसायने यांचे प्रमाण कमी होण्यासाठी या रोपाचा अतिशय चांगला उपयोग होतो. हवा शु्द्ध करुन वातावरण चांगले ठेवण्यासाठी ही वनस्पती उपयुक्त असून. हवेतील ऑक्सिजनची पातळी वाढविण्यासाठी प्रामुख्याने या वनस्पतीचा उपयोग होतो. त्यामुळे तुम्ही घरातील जास्त वेळ बेडरुममध्ये घालवत असाल तर याठिकाणी ही वनस्पती लावणे फायद्याचे ठरते. 

३. पीस लिली - बाथरुम, ड्राय बाल्कनी, किचनमध्ये सिंकपाशी बऱ्यापैकी ओलावा असतो. काही वेळा या भागांची स्वच्छता न झाल्यास त्याठिकाणी बुरशी, काहीशी ओल येण्याची शक्यता असते. या वनस्पतीमुळे हवेतील ओलावा शोषला जातो आणि भोवतालचा भाग कोरडा होण्यास मदत होते. अशाप्रकारे शांतपणे आपले काम करत असल्याने या वनस्पतीच्या नावातच पीस हा शब्द असावा. 

(Image : Google)
(Image : Google)

४. कोरफड - कोरफड चेहरा, केस यांसारख्या सौंदर्याशी निगडीत गोष्टींसाठी वापरली जाणारी वनस्पती आपल्या घरात असायलाच हवी. या उपयोगांबरोबरच कोरफडीमुळे घरातील हवा स्वच्छ होण्यास मदत होते. फर्निचर किंवा इतर ठिकाणी असलेले केमिकल नष्ट करण्याचे काम कोरफडीव्दारे नकळत केले जाते.   

५. तुळस - तुळशीला ज्याप्रमाणे धार्मिक महत्त्व आहे त्याचप्रमाणे शास्त्रीयदृष्ट्याही तुळस अतिशय महत्त्वाची वनस्पती आहे. हवेतील कार्बनडायऑक्साइडचे प्रमाण कमी करुन ऑक्सिजनची पातळी वाढविण्यासाठी तुळस अतिशय उपयुक्त ठरते. त्यामुळे तुमच्याकडे एकाहून जास्त ठिकाणी तुळशीची रोपे असतील तरीही चांगले. 

६. स्नेक प्लांट - हे रोप रात्रीही ऑक्सिजनची निर्मिती करते. हवेतील विविध प्रकारच्या गॅसेसपासून संरक्षण करण्याचे काम या रोपाद्वारे होते. त्यामुळे घरातील लिव्हींग रुम, बे़डरुम याठिकाणी तुम्ही हे रोप आवर्जून ठेऊ शकता. या रोपाला आठवड्यातून एकदाच पाणी दिले तरीही पुरते. परंतु घरातील शुद्ध आणि स्वच्छ हवेसाठी हे रोप घरात असायला हवे. 

Web Title: Need a pleasant atmosphere in the house, clean air? These 6 plants that provide a lot of oxygen are needed in the house..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.