Join us  

फळं आणि भाज्यांच्या साली फेकून देता? कुंडीतल्या रोपांसाठी 'असा' करा वापर; बाग बहरेल फुलाफळांनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2024 7:43 PM

Never trash these Fruit Peels| Fruit Peels as Plant Fertilizers : कुंडीतल्या झाडांची वाढ खुंटली असेल तर, एकदा सालींचा वापर करून पाहा..

रोजच्या आहारात आपण भाज्या आणि फळांचा वापर करतो (Fertilizers). फळे आणि भाज्या आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. पण अनेक भाज्या आणि फळांच्या साली आपण फेकून देतो (Gardening Tips). याचा वापर आपण करत नाही.

काही फळ आणि भाज्यांच्या साली कचऱ्याच्या डब्यात टाकून देतो. पण फळे आणि भाज्यांच्या साली टाकून देण्यापेक्षा आपण याचा वापर गार्डनिंगसाठी नक्कीच करून पाहू शकता. झाडांच्या वाढीसाठी आपण खतांचा वापर करतो. पण रासायनिक खतांचा वापर करण्यापेक्षा आपण घरातच खत तयार करू शकता. ते ही फक्त फळ आणि भाज्यांच्या सालींचा वापर करून हे खत तयार होऊ शकते. 

थुलथुलीत पोट होईल सपाट - बॅड कोलेस्टेरॉलही येईल नियंत्रणात; फक्त रोज चमचाभर 'ही' चटणी खा

घरगुती खत तयार करण्यासाठी फळ आणि भाज्यांच्या खताचा वापर नेमका कसा करावा? यामुळे झाडांची योग्य वाढ होईल का? झाडांची लागवड होण्यासाठी घरगुती खत तयार कसे करावे? पाहा(Never trash these Fruit Peels| Fruit Peels as Plant Fertilizers).

घरगुती खत तयार करण्यासाठी टिप्स

- घरगुती खत तयार करण्यासाठी १ जुने भांडे घ्या. त्यात रोजचा कचरा गोळा करा. जसे की, हिरव्या भाज्यांच्या काड्या, फळांची साली, उरलेली चहापत्ती, उरलेलं अन्न हे सर्व आपण त्यात टाकू शकता.

फराळ खाल्ले नी वजन वाढले? करा ५ सोप्या गोष्टी; पचनक्रिया होईल सुरळीत - वजन घटेल

- कचरा कुजायला लागल्यानंतर त्यात २-४ चमचे दही घाला. भांडे भरल्यानंतर वेळोवेळी कचरा फिरवत राहा. काहींसाठी रोपासाठी खास तयार खत होईल. हे खत बाजारापेक्षा स्वच्छ आणि दर्जेदार असेल. ज्यामुळे आपल्याला मार्केटमधून खत विकत घेण्याची गरज नाही.

- तयार खत कुंडीतल्या मातीत घालून मिसळा. आणि मातीत याचे पाणी मिक्स करा. या घरगुती नैसर्गिक खतामुळे कुंडीतल्या रोपाची वाढ व्यवस्थित होईल. शिवाय विशेष महागड्या खताची गरज नाही. 

टॅग्स :बागकाम टिप्ससोशल मीडियासोशल व्हायरल