आजकाल घरांमध्ये मनी प्लांट ठेवण्याची क्रेझ वाढत चालली आहे (Money Plant). जर आपल्याला बागकामाची आवड असेल तर, तुमच्या बाल्कनीमध्ये मनी प्लांट नक्कीच असेल (Gardening Tips). मनी प्लांटची व्यवस्थित काळजी घेतली तर, वर्षानुवर्ष उत्तम राहते. यामुळे घरातही सकारात्मक वातावरण निर्माण होते (Plant Care). पण मनी प्लांटची योग्य काळजी न घेतल्यास पानं पिवळी पडतात. किंवा वेल वाढत नाही.
मनी प्लांट वाढवण्यासाठी नेमकी झाडाची कशी काळजी घ्यावी? बदलत्या हवामानानुसार मनी प्लांटची वाढीतही बदल होते. आपण त्या ऋतूनुसार मातीत खत घालतो. पण खत घालूनही मनी प्लांट वाढत नसेल तर, कॉफीचा वापर करून पाहा. काही दिवसात मनी प्लांटची योग्य वाढ होईल(No worries if Money Plant leaves are Turning Yellow).
मनी प्लांटची वाढ कशी होईल?
- मनी प्लांटची योग्य वाढ होत नसेल तर, नवीन कुंडीत मनी प्लांट लावा. मातीत बदलत्यानुसार खत घालून मिक्स करा. सुरुवातीला मनी प्लांटला खूप कमी पाणी घाला. कारण मनी प्लांटची मुळं कुजू शकतात.
- मनी प्लांट आपण पाण्यातही लावू शकता. पाण्यात मनी प्लांट लावल्याने पानांची भरपूर वाढ होईल आणि पानंही हिरवीगार राहतील. मनी प्लांटमधलं पाणी दर आठवड्याला बदलत राहा. यामुळे मनी प्लांटची योग्य वाढ होईल.
अभ्यास करत नाहीत म्हणून मुलांना ट्युशन लावता? ४ सोप्या टिप्स; शिकवणीची गरजच पडणार नाही
- मनी प्लांटची योग्य वाढ व्हावी म्हणून, आपण त्यात भाज्यांचे पाणी घालू शकता. यामुळे उत्तम वाढ आणि हिरव्या पानांसाठी नैसर्गिक खत मिळेल.
- आपण मातीत खत म्हणून कॉफी पावडर किंवा चहाची पानंही घालू शकता. मनी प्लांट साठी हे सर्वोत्तम घरगुती खतांपैकी एक आहे. हे मनी प्लांटला नायट्रोजन प्रदान करतात. ज्यामुळे मनी प्लांट लवकर खराब होत नाहीत.
तमन्ना भाटिया म्हणते, वाईट दिवस-वाईट माणसं अनेक गोष्टी शिकवतात, आपण मात्र विसरु नये की..
मनी प्लांटमध्ये कॉफीचा वापर कसा करावा?
- चहापत्तीऐवजी आपण कॉफीचा देखील वापर करू शकता. यासाठी भांड्यात एक लिटर पाणी घ्या. त्यात एक चमचा कॉफी पावडर मिसळा. तयार पाणी कुंडीतल्या मातीत मिसळा. हे पाणी आपण कुंडीत १५ दिवसातून एकदा घालू शकता. यामुळे मनी प्लांट वेगाने वाढेल.