Join us  

गुलाबाची रोपं विकत आणताना लक्षात ठेवा ३ गोष्टी, तरच तुमच्या बागेत टप्पोरे-सुंदर गुलाब उमलतील..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2022 3:10 PM

Tips For Rose Plant: गुलाबाचं रोपटं तर छान फुललं आहे, पण त्याला हवी तशी फुलंच येत नसतील, तर या काही गोष्टी तपासून बघा...

ठळक मुद्देगुलाबाचं रोपटं तुम्ही कोणत्या ऋतुमध्ये आणून रुजवता आहात, हे देखील रोपट्याच्या वाढीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे.

लाल, पांढरा, पिवळा, केशरी, गुलाबी अशा अनेक रंगात गुलाबाची फुलं मिळतात. आपल्या बागेत उमललेली छान टपोरी फुललेली गुलाबाची फुलं (rose flower) पाहिली की मन फ्रेश होऊन जातं. पण बऱ्याचदा गुलाबाच्या रोपट्याची चांगली वाढ होऊनही एकतर त्याला चांगली फुलच येत नाहीत किंवा मग कळ्या येतात आणि त्या न उमलत्या तशाच खुडून जातात. काही गुलाब तर वर्ष होत आलं, तरी फुलंच देत नाहीत. असं होऊ नये, म्हणून गुलाबाची रोपटी खरेदी करताना किंवा मग ते लावताना या काही गोष्टी व्यवस्थित तपासून घ्या.(how to take care of rose flower)

 

गुलाबाचं रोपटं खरेदी करताना आणि लावताना....१. रोपटं कशा पद्धतीने लावलं आहेनर्सरीत गेल्यावर जेव्हा गुलाबाची रोपटी घ्याल, तेव्हा त्याचा स्टेम जॉईंट किंवा ग्राफ्टिंग जॉईंट मातीमध्ये कशाप्रकारे रुजलेला आहे, ते बघा. वरवर खोचण्यात आलेलं किंवा हलवलं की लगेचच हलणारं रोपटं घेऊ नका. अशा झाडांची नीट वाढ होत नाही. जमिनीत घट्टपणे अडकलेलं कलम घ्यावं.

 

२. नुकतंच लावलेलं रोपटं नकोनर्सरीतून गुलाबाचं रोपटं विकत घेताना ते अगदी नुकतंच लावलेलं असेल, तर घेऊ नका.

साेशल मिडियात तुफान व्हायरल ३ बहिणींची गुजराथी थाली...पाहा फक्त ८० रुपयांत भरपेट जेवण

रोपट्याची थोडी वाढ झालेली पाहिजे, शिवाय ते १०- १२ महिने तरी जुनं असलं पाहिजे. जितकं परिपक्व रोपटं असेल, तितकं ते अधिक लवकर फुल देतं. शिवाय फुलांचं प्रमाणही जास्त असतं. 

 

३. गुलाबाचं रोपटं घेण्याची योग्य वेळगुलाबाचं रोपटं तुम्ही कोणत्या ऋतुमध्ये आणून रुजवता आहात, हे देखील रोपट्याच्या वाढीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे.

घरच्याघरी हेअर स्ट्रेटनर वापरत असाल तर ३ गोष्टी कायम लक्षात ठेवा.. नाहीतर केसांचं होईल नुकसान 

उन्हाळ्यात आणि ऐन पावसाळ्यात गुलाबाची खरेदी नको. पावसाळा सरत आलेला असताना म्हणजेच सध्याच्या सिझनमध्ये आणि हिवाळ्यात लावलेली गुलाबाची रोपं अधिक छान वाढतात- फुलतात.

 

टॅग्स :बागकाम टिप्सइनडोअर प्लाण्ट्स