Join us  

संध्याकाळी बागेत खूपच चिलटं, डास होतात? बघा १ सोपा उपाय- किडे होतील गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2024 1:50 PM

Gardening Tips: तुमच्या छोट्याशा बागेतल्या झाडांजवळ खूपच चिलटं, डास दिसत असतील तर हा एक साेपा उपाय करून पाहा. (home remedies to get rid of mosquitoes in garden)

ठळक मुद्देडास- चिलटं तर जातीलच पण त्यासोबत बागेत इतरही काही किडे असतील तर ते ही निघून जातील. 

उन्हाळ्याच्या दिवसांत सगळीकडेच खूप उकाडा जाणवतो. संध्याकाळी तर घराच्या सगळ्या भिंती तापलेल्या असल्याने घरातही अगदी गरम वाटतं. त्यामुळे संध्याकाळच्या वेळी थोडं हवेशीर बसायचं म्हणून आपण आपल्या घरात जिथे झाडं आहेत किंवा छोटी रोपं आहेत त्या आपल्या छोट्याशा बागेत जाऊन बसतो. पण तिथे बसलं की त्यावेळी नेमकं तिथे झाडांच्या आजुबाजुला अनेक छोटी छोटी चिलटं, डास घोंगावताना दिसतात. डास एवढे चावतात की मग नाईलाजाने तिथून उठून जावं लागतं. असं पुन्हा होऊ नये म्हणून आता हा एक उपाय पाहून ठेवा.(organic homemade Spray for mosquitoes and flies in garden)

बागेत खूप डास- चिलटं झाले असल्यास उपाय

 

बागेत खूप डास- चिलटं झाले असतील तर त्यांना पळवून लावण्यासाठी काय उपाय करावा, याची माहिती uniqfarming या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे. यामध्ये अगदी घरगुती पदार्थ वापरून कशा पद्धतीने डास पळविणारं सोल्यूशन तयार करायचं आहे हे सांगितलं आहे.

हा उपाय करण्यासाठी साधारण अर्धा लीटर पाणी घ्या. त्या पाण्यात मिरच्यांची ८ ते १० देठं, ८ ते १० लसूण पाकळ्या घाला. आणि हे पाणी चांगलं उकळून घ्या. त्यानंतर या पाण्यात एखादा चमचा हळद टाका आणि थंड झाल्यावर हे पाणी एका बाटलीत भरून ठेवा.

 

आपण तयार केलेलं पाणी जेवढं असेल तेवढंच त्यात दुसरं साधं पाणी घाला आणि हे मिश्रण जिथे डास, चिलटं जास्त प्रमाणात दिसतात, त्या जागेवर शिंपडा.

गुढीसोबत सुंदर फोटो काढण्यासाठी सेलिब्रिटींकडून घ्या आयडिया- सोशल मिडियावर मिळतील जबरदस्त लाईक्स

डास- चिलटं तर जातीलच पण त्यासोबत बागेत इतरही काही किडे असतील तर ते ही निघून जातील. 

 

टॅग्स :बागकाम टिप्सहोम रेमेडीगच्चीतली बाग