Join us  

झाडाला फुलंच लागत नाही? १० रूपयांच्या शेंगदाण्यांचे करा खत; फुलंच फुले येतील-किडही लागणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2023 3:47 PM

Peanut Fertilizer for Plants (Homemade Fertilizer) : शेंगदाण्यांचा वापर करून तुम्ही  झाडांसाठी नैसर्गिक खत तयार करू शकता.

वातावरणात होणाऱ्या बदलांचा परिणाम फुल झाडांवरही होतो. अनेकदा घरातील फुलांची झाडं कोमेजतात. (Best Fertilizer for Groundnut) खत पाणी घातल्याने रोपाला पानं येतात पण फुलं लवकर येत नाहीत. झाडांना फुलं येण्यासाठी तुम्ही घरगुती खतांचा वापर करू शकता. शेंगदाणे अनेक पदार्थांमध्ये वापरले जातात. (Gardening Tips) प्रत्येकाच्याच स्वयंपाकघरात शेंगदाणे असतात. शेंगदाण्यांचा वापर करून तुम्ही  झाडांसाठी नैसर्गिक खत तयार करू शकता. (Groundnut Cake Natural Fertilizer) ही खतं झाडांना घातल्याने फुलांची वेगाने वाढ होईल आणि घरातलं वातावरणही सकारात्मक चांगले राहील.  (Peanut Cake Fertilizer)

ज्याप्रमाणे युरीया टाकल्यानंतर लगेच झाडांमध्ये बदल दिसून येतो. त्याप्रमाणे हे शेंगदाण्याचे खत तयार रोपांमध्ये घातल्यानंतरही चांगली वाढ होईल. हे खत ऑर्गेनिक असून खूप पॉवरफूल आहे.  शेंगदाण्याचे तेल मोठ्या प्रमाणात खाल्ले जाते. शेंगदाण्याचे तेल बनवताना शेंगदाणे मशिनमध्ये घालून तेल काढून घेतले जाते आणि उरलेला भाग फेकून दिला जातो. पण तोच उरलेला भाग झाडांसाठी महत्वाचा असतो कारण त्यात अनेक आवश्यक न्युट्रिएंट्स असतात ज्यामुळे रोपांची ओव्हरऑल ग्रोथ होते.

रोपांसाठी शेंगदाण्यांचे खत कसे बनवावे? (How to  make peanut fertilizer for plants)

हे खत बनवण्याासाठी ग्राऊंडनट केक पावडर घ्या आणि एका भांड्यात काढून बारीक करून घ्या. ऑनलाईन तुम्हाला सहज हे उत्पादन मिळेल. याची पावडर मातीमध्ये मिसळा आणि माती एकजीव करा. जर तुमच्याकडे जास्तवेळ नसेल तर तुम्ही शेंगदाण्यांची पावडर घेऊन थेट कुंडीत सर्व बाजूंनी घालू शकता. 

दुसरा उपाय असा की एका मोठ्या बादलीत ग्राऊंडनट केक पावडर घालून त्यात ३ ते ४ लिटर पाणी घाला. पाणी घालून २ दिवसांसाठी भिजवायला ठेवा. अशा ठिकाणी ठेवा ज्या ठिकाणी सुर्यप्रकाश जास्त येणार नाही. पाण्यात ठेवल्यामुळे हे दाणे व्यवस्थित फुलतील. २ दिवसांनी  तुम्हाला दिसून येईल की शेंगदाण्यांच्या पावडरचा जाड थर वर आला आहे.

इतरांचा मनी प्लांट भरभर वाढतो, तुमचा वाढत नाही? किचनमधला ‘हा’ पदार्थ वापरा, मनी प्लांट होईल हिरवागार

हे खत स्ट्राँग असल्यामुळे थेट रोपांना देऊ नका. एका पाण्याच्या बॉटलमध्ये पाव ग्लास हे खत घाला आणि त्यात पाणी मिसळून  झाडांना घाला. सकाळी आणि संध्याकाळच्यावेळी हे खत झाडांमध्ये घाला.  २० दिवसांतून एकदा हे खत झाडांना द्या. झाडांना फुलं यायाला सुरूवात होईल तेव्हा हे खत घालणं बंद करा.

टॅग्स :बागकाम टिप्सइनडोअर प्लाण्ट्स