Lokmat Sakhi >Gardening > प्रिती झिंटाने फुलवली आहे घर की खेती! म्हणाली, कोरोना काळात हाच तर आहे माझा...

प्रिती झिंटाने फुलवली आहे घर की खेती! म्हणाली, कोरोना काळात हाच तर आहे माझा...

Preity Zinta's orange kheti: बॉलीवूडची डिंपल गर्ल प्रिती झिंटा (bollywood actress) हिने तिच्या बंगल्यात एक सुंदर किचन गार्डन फुलवलं आहे.. सध्या या गार्डनमधल्या झाडांना खूपच छान संत्री आलेल्या असून प्रिती म्हणते.......

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2022 03:47 PM2022-01-18T15:47:02+5:302022-01-18T15:48:51+5:30

Preity Zinta's orange kheti: बॉलीवूडची डिंपल गर्ल प्रिती झिंटा (bollywood actress) हिने तिच्या बंगल्यात एक सुंदर किचन गार्डन फुलवलं आहे.. सध्या या गार्डनमधल्या झाडांना खूपच छान संत्री आलेल्या असून प्रिती म्हणते.......

Preity Zinta's orange kheti, said gardening keeps me strong during the tough time of this covid pandemic | प्रिती झिंटाने फुलवली आहे घर की खेती! म्हणाली, कोरोना काळात हाच तर आहे माझा...

प्रिती झिंटाने फुलवली आहे घर की खेती! म्हणाली, कोरोना काळात हाच तर आहे माझा...

Highlightsसध्या कोविडकाळात स्वत:ला घरात गुंतवून ठेवण्याचा, मन रमविण्याचा उत्तम उपाय म्हणजे गार्डनिंग आहे असं प्रितीला वाटत आहे..

प्रिती झिंटा म्हणजे बॉलीवूडची एक बबली चबली अभिनेत्री. तिचं हसणं, तिचा उत्साह आणि तिच्या गालावरची गोड खळी या सगळ्या गोष्टींवर तर तिचे चाहते नेहमीच फिदा असतात. आपल्याला माहितीच आहे की सध्या प्रिती कॅलिफॉर्निया येथे स्थायिक झाली असून पती Gene Goodenough याच्यासोबत संसारात ती चांगलीच रमली आहे. तिने नुकतेच सरोगसीद्वारे दोन मुलांना जन्मही दिला आहे. मुलांचं संगोपन करण्याव्यतिरिक्त ती सध्या काय स्पेशल करत आहे, याची माहिती तिने नुकतीच एक पोस्ट शेअर करून दिली असून तिची ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे...

 

प्रिती झिंटा इंस्टाग्राम, ट्विटर अशा सोशल मिडिया (social media) साईट्सवर बरीच ॲक्टीव्ह असते. तिने नुकताच तिचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला असून या व्हिडिओबाबत ती खूपच जास्त एक्सायटेड दिसून आली. या व्हिडिओमध्ये प्रितीने तिची घर की खेती दाखवली आहे. तिने तिच्या बंगल्याच्या सभोवती असणाऱ्या जागेत संत्रीचं झाड लावलं असून या झाडाला आता खूपच छान संत्री आल्या आहेत, हे प्रितीने या व्हिडिओतून (gardening tips by Preity Zinta) सांगितलं आहे.. प्रिती म्हणाली या संत्रीचा रस अतिशय गोड असून नागपूरच्या संत्रीनंतर मला आता हीच संत्री आवडली आहे... 

 

काही दिवसांपुर्वीच प्रितीने असाच एक तिच्या गार्डनचा व्हिडिओ शेअर केला होता. त्या व्हिडिओमध्ये तिने घरीच सफरचंदाची झाडं कशी लावली आणि दोन- तीन वर्षातच त्या झाडाला कशी लालबुंद सफरचंद लागली, हे प्रितीनं सांगितलं होतं. केवळ संसारातच नाही, तर घरासभोवतीच्या बागेमध्येही तिने स्वत:ला चांगलंच रमवून घेतलं आहे, हेच या व्हिडिओतून दिसून येतं. 

 

संत्रीच्या झाडाचा व्हिडिओ शेअर करताना प्रितीने म्हटलं आहे की जगभरातच सध्या कोरोना केसेस खूप वाढत चालल्या आहेत. त्यात आता आमच्या घरात दोन लहान बाळंही आहेत. त्यामुळे घरीच सुरक्षित राहण्याशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय नाही. मागील दोन वर्षांपासून कोविडमुळे सतत घरी बसण्याचीच वेळ आलेली आहे. एवढा मोठा काळ घरातच राहणं, कमीतकमी बाहेर पडणं हे खरोखरंच आपल्या सगळ्यांसाठीच खूप कठीण आहे... पण तरीही या दोन कारणांमुळे माझं घरी राहणं जरा तरी सुसह्य झालं आहे... एक कारण म्हणजे माझी मुलं.. आणि दुसरं कारण म्हणजे मी लावलेली छान छान झाडं, फळं.. म्हणजेच आम्ही फुलवलेली आमची घर की खेती...  हाच तर आहे माझा विरंगुळा, असंही ती म्हणते आहे. 

 

सध्या कोविडकाळात स्वत:ला घरात गुंतवून ठेवण्याचा, मन रमविण्याचा उत्तम उपाय म्हणजे गार्डनिंग आहे असं प्रितीला वाटत आहे.. ती म्हणते की जमिनीशी ऑर्गेनिक कनेक्शन जुळविण्याचा हा सगळ्यात सोपा मार्ग आहे... प्रितीला जे वाटतं, ते आपल्या सभोवतालच्या अनेक लोकांनाही वाटतं.. म्हणूनच तर लॉकडाऊन काळात गार्डनिंग करण्यात रमणाऱ्यांची संख्या वाढली आहे. 

 

Web Title: Preity Zinta's orange kheti, said gardening keeps me strong during the tough time of this covid pandemic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.