Join us  

दिवाळीत सजावट म्हणून वापरलेली गोंड्यांची फुलं, पणत्या फेकून न देता 'असा' करा वापर, कुंडीतील रोपांची वाढ होईल भरभर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2024 9:30 AM

Re-Use Our Diwali Diyas & Marigold Flowers For Gardening : How To Reuse Old Diyas & Marigold Flowers In Gardening : Reuse Marigold Flowers After Diwali : How To Reuse Old Diyas After Diwali : दिवाळीतील गोंड्यांची सुकलेली फुलं आणि मातीच्या पणत्या फेकून न देता गार्डनिंगसाठी कसा वापर करावा ते पाहा...

दिवाळीनिमित्त घराची सजावट करण्यासाठी आपण अनेक वेगवेगळ्या गोष्टींचा वापर करतो. यात प्रामुख्याने गोंड्यांच्या फुलांच्या माळा आणि मातीच्या पणत्यांचा फार मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. दिवाळीचे चार दिवस फुलांच्या माळा आणि पणत्यांनी सजावट केल्या नंतर शक्यतो आपण या गोष्टी फेकून देतो. फुलांच्या माळांमधील फुल सुकून गेल्याने निर्माल्य म्हणून आपण फेकतो. तसेच दिवाळी नंतर या पणत्यांचा काहीच उपयोग होत नाही, घरात अडचण वाढण्यापेक्षा फेकून देतो. परंतु असे न करता आपण या दोन्ही गोष्टींचा वापर आपल्या गार्डनिंगसाठी करु शकता(Re-Use Our Diwali Diyas & Marigold Flowers For Gardening).

सुकलेल्या गोंड्यांच्या फुलांच्या पाकळ्यांपासून आपण रोपांसाठी खत तयार करु शकतो. तसेच नवीन रोप कुंडीत लावताना आपण मातीच्या पणत्यांचा वापर करून रोपांना मोकळा श्वास घेण्यासाठी एअर स्पेस तयार करु शकता. यासाठीच दिवाळी झाल्यानंतर सुकलेल्या फुलांच्या माळा आणि पणत्या निरुपयोगी समजून फेकून देत असाल तर थांबा...आपण आपल्या बाल्कनी किंवा गार्डनमधील रोपांच्या वाढीसाठी या दोन्ही गोष्टींचा पुनर्वापर करु शकतो. यासाठी यंदाच्या दिवाळीत वापरलेल्या गोंड्यांच्या फुलांच्या सुकलेल्या माळा आणि मातीच्या पणत्या फेकून न देता त्याचा गार्डनिंगसाठी कसा वापर करावा ते पाहूयात(How To Reuse Diwali Diyas & Marigold Flowers In Gardening).

१. गोंड्यांच्या फुलांच्या माळा :- सुकलेल्या गोंड्यांच्या फुलांच्या पाकळ्यांचा (Reuse Marigold Flowers After Diwali) वापर करून आपण रोपांसाठी घरगुती खत तयार करु शकतो. यासाठी, सर्वात आधी या सुकलेल्या फुलांच्या पाकळ्या वेगळ्या करुन घ्याव्यात. आता एका मोठ्या बादलीत दोन लिटर इतके पाणी घ्यावे. या पाण्यात फुलांच्या पाकळ्या घालाव्यात. त्यानंतर या पाण्यांत एक मध्यम आकाराचा गुळाचा खडा घालूंन तो संपूर्णपणे पाण्यांत विरघळवून घ्यावा. त्यानंतर हे पाणी तीन ते चार दिवस असेच झाकून ठेवून द्यावे. चार दिवसानंतर हे पाणी एका बाटलीत भरून स्टोअर करुन ठेवावे. हे पाणी रोपांवर अधून मधून स्प्रे करावे. हे पाणी एक उत्तम खत आणि किटकनाशक म्हणून काम करते. रोपांना किड लागण्यापासून हे पाणी त्यांचे संरक्षण करते. याचबरोबर गूळ आणि फुलांच्या पाकळ्यातील गुणधर्म रोपांच्या वाढीसाठी देखील अधिक फायदेशीर ठरतात. 

कुंडीतल्या झाडांना खूप मुंग्या लागल्या? ४ सोपे उपाय-मुंग्या होतील कमी-झाडं वाढतील जोमानं...

२. मातीच्या पणत्या :- मातीच्या वापरलेल्या पणत्या (How To Reuse Old Diyas After Diwali) फेकून न देता रोपांचे चांगले आरोग्य आणि वाढीसाठी याचा उपयोग होऊ शकतो. यासाठी मातीच्या पणत्या हातोडीच्या मदतीने फोडून त्याचे लहान तुकडे करुन घ्यावेत. जेव्हा आपण एखाद्या कुंडीत नवीन रोपट लावतो तेव्हा कुंडीच्या तळाशी असणाऱ्या छिद्रांमधून रोपांना मोकळा श्वास घेता येऊ शकेल यासाठी मूळ आणि कुंडीचा पृष्ठभाग यात योग्य पद्धतीने गॅप राहावी याची विशेष काळजी घेतो. यासाठी साधारणपणे  आपण नारळाच्या करवंटीचा वापर करतो. याचप्रमाणे, आपण या मातीच्या पणत्यांच्या लहान तुकड्यांचा देखील वापर करु शकता. अशाप्रकारे दिवे न फोडता देखील कुंडीच्या पृष्ठभागावर असणाऱ्या छिद्रांवर हे दिवे उलटे ठेवून (पणत्यांचा खोलगट भागाने छिद्र झाकून जाईल अशा पद्धतीने ) द्यावेत. यामुळे रोपांची मूळ  आणि कुंडीचा पृष्ठभाग यात योग्य पद्धतीने गॅप तयार झाल्याने मुळांना श्वास घेणे सोपे जाऊन त्यांची वाढ चांगल्या पद्धतीने होते. मातीच्या पणत्यांमुळे अचूक एअर स्पेप तयार होऊन रोपांची मूळ व्यवस्थित श्वास घेऊ शकतात.

नर्सरीत हिरवीगार-फुललेली रोपं घरी आणलं की कोमेजतात? ५ चुका टाळा-पाहा फुलंच फुलं...

टॅग्स :बागकाम टिप्सइनडोअर प्लाण्ट्स