उन्हाळ्याची चाहूल लागताच आपल्याला थंड पेय पिण्याची चटक लागते. अलीकडच्या काळात अनेक प्रकारचे थंड पेय बाजारात सहज मिळतात. मात्र, लिंबू पाण्याचे महत्व आजही कायम आहे. फक्त लिंबू पाणी नसून, लिंबाचा वापर अनेक कारणांसाठी होतो, शिवाय आरोग्यासाठीही फायदेशीर ठरते. पण उन्हाळ्यात लिंबू फार महाग मिळतात. त्याचा चढता भाव पाहता, आपण लिंबू कमी प्रमाणात खरेदी करतो.
शिवाय लिंबू लवकर सुकून जातात. उन्हाळा सुरु होण्यापूर्वी आपण बाल्कनीच्या कुंडीत लिंबूचे झाड लावू शकता (Lemon Tree). बऱ्याचदा आपण लिंबूचे झाड लावतो, पण त्याला लिंबू लागत नाही. लिंबाच्या झाडाला भरपूर लिंबू लागावे असे वाटत असेल तर, मातीत दोन वस्तू मिसळा (Gardening Tips). यामुळे झाड भरभर वाढेल. शिवाय रसरशीत लिंबूने बहरेल(Reasons For A Lemon Tree Not Blooming).
ताजी-हिरवीगार कोथिंबीर हवी? कुंडीतही येईल भरपूर कोथिंबीर- लक्षात ठेवा फक्त ५ टिप्स
लिंबूचे झाड लावताना लक्षात ठेवा काही टिप्स
- लिंबूचे झाड लावल्यानंतर रोपाला जास्त पाणी देऊ नका. मातीत जास्त पाणी गेल्याने झाडाची मुळं कुजतात.
- दर १५ ते २० दिवसानंतर मातीत खत मिसळा. यासाठी वरची माती काढा, मधल्या मातीत २५० ग्रॅम पानांचे आणि लाकडाची राख घेऊन मिक्स करा. त्यावर माती भरा, आणि पाणी शिंपडा.
- नैसर्गिक खत मातीत मिसळल्याने झाडाची योग्य वाढेल होईल, शिवाय त्यावर भरपूर लिंबू लागतील.
मातीत मिसळा फक्त ३ गोष्टी, कुंडीत लावलेले कडीपत्त्याचे झाडही होईल मोठे-पानं होतील सुगंधी
- याव्यतिरिक्त झाडाची पिवळी पानं छाटून काढा. नाहीतर हळूहळू झाड सुकेल. त्यामुळे दररोज झाडाकडे लक्ष ठेवा. नियमित पाणी घाला.
- कुंडी काही वेळ उन्हामध्ये ठेवा. यामुळे मातीतील ओलावा कमी होईल. शिवाय लिंबूची योग्यरित्या वाढ होईल.