Join us  

धुंद सुगंध असलेला पनीर गुलाब! दक्षिणेतल्या विलक्षण सुगंधी फुलाची सुंदर खासियत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2022 3:48 PM

Panneer Rosa: सुगंध असणारे गावरान गुलाब आजकाल खूपच कमी बघायला मिळतात. अशाच सुगंधित गुलाबांपैकी एक आहे पनीर गुलाब...

ठळक मुद्देइतर सगळ्या गुलाबाच्या जातींपेक्षा पनीर गुलाब मात्र खूपच वेगळा ठरतो.

Rose Edouard हे पनीर गुलाबाचं शास्त्रीय नाव. भारतात आढळून येणारं हे एक खूप जुनं झाड. आपल्या बागेतल्या गुलाबाची रोपं आकाराने जेवढी असतात, साधारण तेवढ्याच आकाराचं पनीर गुलाबाचं रोप असतं. या गुलाबाच्या फुलाचा आकार मात्र बटन गुलाबपेक्षा थोडा मोठा आणि आपल्या गावरान गुलाबापेक्षा कमी असतो. पण इतर सगळ्या गुलाबाच्या जातींपेक्षा पनीर गुलाब मात्र खूपच वेगळा ठरतो. या गुलाबाला हे वेगळेपण बहाल केलं आहे, ते त्याच्या धुंद सुगंधाने. पनीर रोझा म्हणूनही हा गुलाब ओळखला जातो.

 

असं म्हणतात की पनीर गुलाबाला जो सुगंध असतो, तसा सुगंध गुलाबाच्या इतर कोणत्याही जातीला नसतो. या गुलाबाचा जन्म कोणता, याबाबतही एकमत नाही. काही अभ्यासकांच्या मते हा गुलाब फ्रेंच आईसलँडचा आहे. तर काही अभ्यासकांनी हा गुलाब मुळचा हिमालयाचा असं सांगितलं आहे. हा गुलाब चीन, पर्शिया या भागातला असून इसविसनाच्या १० शतकात तो भारतात आला असावा, असा अंदाजही याबाबत वर्तवला जातो. सध्या तरी हा गुलाब प्रामुख्याने दक्षिण भारतात (panneer rose found in south India) आढळून येतो.

 

तेथील हवामान पनीर गुलाबाला अनुकूल असल्याने या गुलाबाची वाढ त्या प्रांतात अतिशय चांगल्या पद्धतीने होते. तेथे अनेक हेक्टर जागेत पनीर गुलाबाची शेती केली जाते. राजस्थानातल्या काही भागातही पनीर गुलाब आढळून येतो. देवपुजेसाठी तर पनीर गुलाबाचा उपयाेग होतोच पण पनीर गुलाबाची शेती करण्याचा मुख्य उद्देश व्यावसायिक आहे. हे एक अतिशय सुगंधी फुलं असल्याने गुलाबाचं तेल, गुलाब पाणी, गुलाबाचं अत्तर बनविण्यासाठी पनीर गुलाब फुलवला जातो. त्यासाठी या गुलाबाला खूपच जास्त मागणी असते. त्याचप्रमाणे गुलकंद बनविण्यासाठीही पनीर गुलाब वापरला जातो. गुलाबी रंगाच्या विविध छटांमध्ये हा गुलाब जास्त प्रमाणात दिसून येतो. 

 

टॅग्स :बागकाम टिप्सइनडोअर प्लाण्ट्स