भारतीय घरांमध्ये तुळशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तुळशीला (Tulsi) जितके धार्मिक महत्त्व आहे, तितकेच तुळशीमध्ये असणाऱ्या गुणधर्मामुळे आरोग्याला फायदा होतो. बऱ्याच घरांमध्ये तुळशीचे रोप, झाड अथवा वृंदावन दिसून येते. मात्र, बदलत्या ऋतूनुसार तुळशीची विशेष काळजी घ्यावी लागते. सध्या सर्वत्र उन्हाच्या झळा बसू लागल्या आहेत. वाढत्या तापमानामुळे किंवा कीड लागल्यानेही सुकून जाते. अशावेळी लोक ते झाड काढून नवे तुळशीचे रोपटे घरी घेऊन येतात (Gardening Tips). बऱ्याचदा लोकं पाणी किंवा त्यात खत घालून तुळशीच्या रोपाची विशेष काळजी घेतात.
सुकलेले तुळशीचे झाड पुन्हा बहरावे असे वाटत असेल तर, मातीत मिठाचा वापर करा (Summer Special). पण मिठाच्या वापराने खरंच तुळशीला बहर येते का? तुळशीला बहर यावे यासाठी मातीत मीठ कशाप्रकारे घालावे? मिठामुळे कुंडीजवळ कीटक फिरकत नाही का? उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी? पाहूयात(Save Tulsi from dying; Check Out How To Use Salt For Tulsi Plant).
तुळशीच्या कुंडीत मीठ घातल्याने काय होते?
घराच्या बाल्कनीत लावा ३ प्रकारची झाडं; २४ तास मिळेल ऑक्सिजन-हवाही राहील खेळती..
मिठाचा वापर फक्त जेवणाची चव वाढवण्यासाठी नसून, झाडांसाठीही केली जाऊ शकते. पण तुळशीच्या कुंडीत मिठाचा वापर केल्याने काय होते? असा प्रश्न तुमच्याही मनात आला असेल. खरंतर, मिठातील सोडियम आणि इतर पौष्टीक घटक मातीसाठी फायदेशीर ठरते. शिवाय मातीतील पोषक घटक वाढवण्याचे काम करते, त्यामुळे तुळशीची वाढ चांगली होते आणि कीटकांपासून मुक्ती होते. ज्यामुळे तुळस कधीही सुकत नाही. रसायनयुक्त कीटकनाशकांचा वापर करण्यापेक्षा आपण मिठाचा वापर करू शकता.
तुळशीच्या झाडात मीठ कसे वापरावे?
लिंबाच्या झाडाला लिंबूच नाही? मातीत मिसळा फुकट मिळणाऱ्या २ गोष्ट; पिवळ्या धमक लिंबूने बहरेल रोपटं
तुळशीच्या रोपामध्ये मीठ घालण्यासाठी सर्वप्रथम, एका भांड्यात एक लिटर पाणी घ्या आणि त्यात एक चमचा मीठ घाला. नंतर, चमच्याच्या मदतीने ते चांगले मिसळा. आता तयार पाणी स्प्रे बॉटलमध्ये भरा. तयार स्प्रे तुळशीच्या पानांवर आणि मातीमध्ये फवारणी करा. यामुळे पानांवर कीटक बसणार नाही. शिवाय उत्तमरित्या डेरेदार बहरेल.