Join us  

जास्वंदाचं रोपं लावलं पण फुलंच नाही? मातीत ‘ही’ एक खास आणि मोफत गोष्ट मिसळा, फुलचं फुलं येतील

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2024 2:43 PM

Secret Tonic You Will Get More Hibiscus In Plant : जास्वंदाची फुलं हिवाळा सुरू होण्याच्या आधीच फुलून येतात. पण वर्षभर फुलं येतातच असं नाही. रोपांची ग्रोथ एकदम कमी होते आणि फुलं येणं बंद होतं.

जास्वंदाच्या फुलांनी घराची अधिकच शोभा वाढते. (Hibiscus In Plant Flowers Follow These Gardening Tips) पूजापाठसाठीसुद्धा जास्वंदाच्या फुलांचा वापर केला जातो. फुलांची वाढ व्यवस्थित होत नाही. झाडाची व्यवस्थित वाढ होत नाही, झाडाला पानंच खूप येतात अशी तक्रार अनेकांची असते.  जास्वंदाची फुलं वर्षभर फुलं येतातच असं नाही. रोपांची ग्रोथ एकदम कमी होते आणि फुलं येणं बंद होतं. (Gardening Tips)

हिवाळ्याच्या आधी सुंदर फुलं येतात त्यानंतर वर्षभर फूलं येत राहतात. पण अनेकदा झाडांची ग्रोथ थांबते आणि फुलं येणं बंद होतं. अनेकदा त्यात मिलीबग्स येतात आणि रोपांची ग्रोथ थांबते. तुम्ही सिक्रेट टॉनिक  झाडांवर वापरून एक बेस्ट सोल्युशन बनवू शकता. (Secret Tonic You Will Get More Hibiscus In Plant)

पोट लटकतंय, मांड्या पसरलेल्या? किचनमधले २ पदार्थ पाण्यासोबत घ्या-भराभर कमी होईल वजन

रोपांची वाढ थांबली की फुलं येणं बंद होतं. ज्यामुळे मिलीबग्स येतात. ज्यामुळे रोपांची वाढ थांबवते. जर रोपात वेगवेगळ्या समस्या येत असतील तर तुम्ही  सिक्रेट टॉनिक बनवू शकता जे मातीत मिसळल्याने कुंडीतील रोपांची चांगली वाढ होईल. (Gardening Tips)

हे बनवण्यासाठी  एका भांड्यात केळ्यांची सालं घ्या. जमा करून  घ्या त्यानंतर सुकवून घ्या. जेव्हा व्यवस्थित सुकतील तेव्हा मिक्सरच्या भांड्यात वाटून घ्या. एक लिटर पाण्यात ५ ते ६ चमचे केळ्याच्या सालींची पावडर घ्या. ते कमीत कमी  २४ तासांसाठी तसंच ठेवून द्या. तयार आहे सिक्रेट टॉनिक म्हणजेच लिक्विड फर्टिलायजर. आता रोपांची माती खणून घ्या. त्यात हे लिक्विड फर्टिलायजर घाला. 

हे होममेड लिक्विड फर्टिलायजर रोपांच्या मुळांमध्ये घालू शकता. हवंतर तुम्ही केळ्यांच्या सालींची पावडर बनवून सुद्धा फर्टिलायजरप्रमाणे याचा वापर करू शकता. यासाठी तुम्हाला मातीत हे पदार्थ मिसळावे लागतील. रोज पाणी घालत राहा. रोप बहरलेलं राहील आणि भरपूर फुलं येतील. केळ्याच्या सालींमध्ये पोटॅशियम जास्त प्रमाणात  असते. जास्वंदाच्या फुलांसाठी ते फायदेशीर ठरते. 

टॅग्स :इनडोअर प्लाण्ट्सबागकाम टिप्स