Join us  

गुलाब नुसताच वाढतो फुलं येत नाहीत? मातीत १ पदार्थ मिसळा- नर्सरीवाल्याचं खास सिक्रेट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2024 3:48 PM

Secrets To Get More Blooms From Your Roses : हळदीचा वापर तुम्ही मसाल्यांमध्ये करता त्याचप्रमाणे रोपांच्या वाढीसाठीही करू शकता.

गुलाबाचे रोप घरात लावले असेल तर घराचं सौदर्य वाढतं तसंच फुल झाडांमुळे घरातील वातावरणही चांगले राहते. गुलाबाचे रोप लावल्यानंतर अनेकदा असं दिसून येत की फक्त पानांची वाढ होत आहे फुलं वाढतच नाही. (How to Get More Rose Blooms) याची ग्रोथ होण्यासाठी तुम्ही केमिकल्सयुक्त खतांचा वापर करण्यापेक्षा काही सोपे घरगुती उपाय केले तर गार्डन बहरलेलं दिसेल. (Gardening Tips) नर्सरीतील  फुलांची काळजी घेणाऱ्या गार्डनिंग एक्सपर्ट्सनी एका हिंदी वेबपोर्टल शी बोलताना फुलं वाढवण्याचे सिक्रेट सांगितले आहे.(Secrets To Get More Blooms From Your Roses)

गुलाबाच्या रोपाला बुरशी लागते तर कधी पानांना किड  लागते अशावेळी झाडांना किड्यांपासून वाचवणंही महत्वाचं असतं. (How To Make Rose Water  Using Fresh Flower)  रोपांमध्ये तुम्ही चुन्याचे पाणी घालू शकता.  ज्यामुळे बुरशी लागणार नाही. चुना आणि पाण्याची पेस्ट मुळांमध्ये घाला. ज्यामुळे वातावरणात होणाऱ्या बदलांचाही रोपांवर परिणाम होत नाही. (How To Prepare For Rose Bloom Season)

ना कुंडी-ना जास्त जागा; प्लास्टीकच्या बाटलीत 'या' पद्धतीने लावा गुलाबाचे रोप; भरपूर येतील फुलं

गुलाबच्या रोपाची वाढ व्यवस्थित होत नसेल तर काय करावे? (Secrets To Get More Blooms From Your Roses)

गुलाबाला फक्त पानं येत असतील  रोपांची व्यवस्थित वाढ होत  नसेल तर हार्ड प्रून करा. प्रूनिंग करण्याची सगळ्यात योग्यवेळ ऑक्टोबरच्या शेवटच्या दिवसांत  आणि फेब्रुवारीच्या अखेरच्या दिवसात असते. हार्ड प्रूनिंग तेव्हाच करा जेव्हा तुमचे रोप ३ ते ४ वर्ष जुनं झालं असेल. हार्ड प्रूनिंगसाठी मुळांना सोडून सर्व फांद्या कट करू शकता ज्यामुळे रोपांची वाढ होण्यास मदत होईल. हिवाळा असो किंवा उन्हाळा रोपाला रिपॉट करत राहा. या मातीत ३० टक्के वर्मी कम्पोस्ट,  १० टक्के कडुलिंब, २० टक्के रेती आणि गार्डनच्या मातीचा वापर करा.

गुलाबाच्या रोपात किचनमधला हा पदार्थ मिसळा? (Kitchen Secrets For Rose Fertilizer)

गुलाबाचे रोप पोषक तत्वांनी परिपूर्ण असते. याला मातीची गरज असते. गुलाबाच्या रोपात पोषक तत्वांची कमतरता भासल्यास तुम्ही फर्टिलायजरचा वापर करू शकता. चहाची पानं एसिडीक असतात. गुलाबाच्या रोपांमध्ये फ्लॉवरींगसाठी तुम्ही याचा वापर करू शकता.  एक लिटर पाण्यात अर्धा चमचा चहा पावडर घाला त्यानंतर रात्रभरासाठी तसंच ठेवून द्या. सकाळी हे पाणी  रोपांना घाला. 

रोपांसाठी  हळदीचा वापर कसा करायचा? (How to Use Turmeric in Rose Plant)

हळदीचा वापर तुम्ही मसाल्यांमध्ये करता त्याचप्रमाणे रोपांच्या वाढीसाठीही करू शकता. हळद पावडर पाण्यात मिसळून रोपांना हे पाणी घातल्याने रोपांची वेगाने वाढ होते. याशिवाय हळद पावडरचा थेट वापरही तुम्ही करू शकता. किटक नाशकाप्रमाणे हळद रोपांसाठी  काम करते. हळद पावडर मिसळ्याने किटक नष्ट होतात. १० किलो मातीत २० ग्राम हळद मिसळा. हे किटकनाशकाप्रमाणे काम करते. 

टॅग्स :इनडोअर प्लाण्ट्सबागकाम टिप्स