आपली टेरेसमधली, बाल्कनीतली छोटीशी बाग आपण खूप हौशीने फुलवलेली असते. आधीच उन्हामुळे रोपं सुकून गेल्यासारखी होतात. एक दिवस जरी पाणी घातलं नाही तरी लगेचच कोमेजून जातात. मग अशावेळी आपण जर मोठ्या सहलीसाठी बाहेर गेलो तर झाडांना पाणी कोण घालणार, झाडांचं काय होणार हा विचार साहजिकच मनात डोकावताे आणि टेन्शन येतं. म्हणूनच तुमचं हे टेन्शन कमी करण्यासाठी २ सोपे उपाय पाहा (self watering system for plants). या दोन्ही उपायांमुळे दररोज तुमच्या झाडांना थोडं का होईना पण नक्कीच पाणी मिळेल आणि रोपं हिरवीगार राहण्यास मदत होईल. (tricks and tips for giving water automatically to plants)
सहलीला गेल्यावर रोपांना पाणी देण्याची व्यवस्था
सहलीला गेल्यावर रोपांना पाणी कसं द्यायचं हे आपण तर पाहूच पण त्यापुर्वी काही गोष्टींची मात्र नक्की काळजी घ्या. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या कुंड्या खूप उन्हात असतील तर त्या सावलीत आणून ठेवा.
गाद्यांना पिवळट डाग पडले, कुबट वास येतो? बघा ३ उपाय, गाद्या होतील नव्यासारख्या स्वच्छ
कारण आपण व्यवस्था केली तरी त्यांना नेहमीच्या तुलनेत कमीच पाणी मिळेल. आणि तशा अवस्थेत त्यांना कडक उन्हात तग धरणं कठीण होईल. म्हणून त्यांना सावलीत आणून ठेवा. सावलीत आणून ठेवणं शक्य नसेल तर त्यांच्यावर हिरवा कपडा लावून आडोसा तयार करा. जेणेकरून कडक उन्हापासून त्यांचं संरक्षण होईल.
१. बाटल्यांचा वापर
घरातल्या प्लास्टिकच्या बाटलीच्या झाकणाला छिद्र पाडा. त्यामध्ये एक इअर बड अडकवा. इअर बड नसल्यास तर एखादी जाडसर काडीही चालेल. आता या बाटलीला एक छोटी काठी चिकटपट्टीने किंवा दोरीने गुंडाळून लावून टाका.
कमी वयातच पाठ, कंबर, गुडघे सतत ठणकतात? ५ पदार्थ खा- हाडांचं दुखणं महिनाभरातच विसराल
काठीचं एक टोक कुंडीतल्या मातीत खोचा. बाटलीचं झाकण जमिनीच्या दिशेने येईल अशा पद्धतीने बाटली ठेवा. आता तुम्ही जेव्हा बाटली भराल तेव्हा तिच्यातलं एकेक थेंब पाणी गळेल आणि ते रोपांना मिळेल.
२. दोऱ्यांचा वापर
दुसरा उपाय करण्यासाठी आपल्याला दोऱ्या किंवा सुतळ्या लागणार आहेत. यासाठी सगळ्या कुंड्या जमिनीवर जवळ आणून ठेवा. पाण्याने भरलेली बादली या कुंड्यांच्या जवळ पण त्यांच्यापासून जरा वर एखाद्या स्टूलवर ठेवा.
स्कूलबॅग खरेदी करायची? ऑनलाईन खरेदीवर मिळतोय भरपूर डिस्काऊंट, लगेचच बघा स्वस्तात मस्त पर्याय
त्यानंतर दोरी घ्या. दोरीचं एक टोक बादलीच्या अगदी तळाशी आणि दुसरं टोक कुंडीमध्ये ठेवा. असं प्रत्येक कुंडीला एकेक दोरी ठेवा. आता दोरीच्या माध्यमातून बादलीतलं पाणी आपोआप थोडं थोडं कुंडीत पडत जाईल आणि कुंडीतली माती ओलसर राहण्यास मदत होईल.