कोणताही रोपं लावताना त्यासाठी माती हा आवश्यक घटक असतो. रोपं लावताना मातीची विशेष काळजी घेतली पाहिजे. माती जर चांगल्या दर्जाची असेल तर रोपांची वाढ देखील चांगली होते, याउलट जर माती निकृष्ट दर्जाची असेल तर रोपांच्या वाढीत अडथळा येतो. पाणी, खत यासोबतच रोपांच्या वाढीसाठी मातीची देखील तितकीच गरज असते. रोपांच्या चांगल्या वाढीसाठी, रोपांना फळं, फुलं येण्यासाठी त्यांची माती वेळोवेळी बदलणे आवश्यक असते(How do you change the soil in a potted plant).
रोपांच्या चांगल्या वाढीसाठी आपण कुंडीतील माती बदलतो खरे. पण ही माती नेमकी किती दिवसांनी आणि कशी बदलावी याची योग्य पद्धत आपल्याला माहित नसते. अशावेळी आपण चुकीच्या पद्धतीने कुंडीतील रोपांची माती बदलतो. अशा चुकीच्या पद्धतीचा वापर केल्याने रोपांबरोबरच रोपांच्या मुळांना देखील इजा होते. यामुळे त्यांच्या वाढीत अनेक अडथळे निर्माण होतात. असे होऊ नये यासाठी कुंडीतील रोपांची माती कधी बदलावी आणि ती बदलण्याची योग्य पद्धत कोणती याकडे लक्ष देणे फार गरजेचे असते. रोपांच्या कुंडीतील माती कधी आणि कशी बदलावी याबद्दल अधिक माहित घेऊयात( Tips & Tricks Right Method Of Changing Soil In Plants At Home).
१. रोपांच्या कुंडीतील माती बदलावी का ?
आपण आपल्या गार्डन किंवा बाल्कनीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची रोपं, झाड लावतो. याचबरोबर या रोपांची आपण तितक्याच काळजीने देखभाल देखील करतो. बाल्कनीत लावलेल्या रोपांची व त्यातील मातीची विशेष काळजी घेतली पाहिजे. रोपांच्या चांगल्या वाढीसाठी कुंडीतील माती वेळोवेळी बदलण्याचा सल्ला दिला जातो. परंतु ही कुंडीतील रोपांची माती नेमकी कधी बदलावी हे आपल्याला माहित नसते. आपण कुंडीतील माती बदलतो खरे पण किती वेळाने ही माती बदलावी, जेणेकरून रोपांची चांगली वाढ होईल याचा अंदाज आपल्याला नसतो.
कोरफडीचं रोप उन्हात ठेवणं योग्य की अयोग्य? काय केलं तर कोरफड वाढेल जोमानं...
रोपांच्या चांगल्या वाढीसाठी आणि त्यांना मातीतील पोषक घटक योग्य प्रमाणात मिळावेत यासाठी कुंडीतील माती दर दोन वर्षांनी बदलावी. एका ठराविक काळानंतर मातीतील पोषक घटकांची गुणवत्ता कमी होऊ लागते. मातीची गुणवत्ता कमी होऊ लागली की, रोपांना योग्य प्रमाणात आवश्यक ते पोषक घटक मातीतून मिळत नाहीत. परिणामी, रोप सुकतात, फळं - फुलं येणं बंद होत, वाढ खुंटते, पानं गळतात असे अनेक परिणाम रोपांवर दिसून येतात. यासाठीच रोपांना चांगली फळं - फुलं येण्यासाठी दर २ वर्षांनी माती बदलली पाहिजे. त्यामुळे झाडाची वाढ चांगली होते.
२. कुंडीतील रोपांची माती बदलताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात ?
कुंडीतील रोपांची - झाडांची माती बदलताना विशेष काळजी घेतली पाहिजे. रोपांची माती बदलताना त्यांच्या मुळांना इजा होणार नाही या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे. कुंडीतील माती बदलण्यापूर्वी, जी नवीन माती आपण कुंडीत घालणार आहोत ती माती २ ते ३ दिवसांपूर्वी पाणी घालून भिजवून घ्यावी. त्यानंतर खुरप्याच्या मदतीने हळुहळु कुंडीतील रोपं काढून घ्यावे. हे रोपं काढताना मुळांना इजा होऊ नये याकडे विशेष लक्ष द्यावे. कुंडीतील जुनी झालेली माती काढल्यानंतर त्यात भिजवून घेतलेली नवीन माती घालावी. या मातीमध्ये थोडीशी रेती आणि कंपोस्ट खत देखील मिक्स करुन घ्यावे. त्यामुळे रोपांवर कोणत्याही प्रकारचा रोग किंवा किड लागणार नाही.
मनी प्लांट्ससाठी लागणारी मॉस स्टिक तयार करा घरच्याघरी, महागडी मॉस स्टिक मिळेल स्वस्तात...
याचबरोबर रोपांच्या कुंडीत नवीन माती घातल्यानंतर त्याला पुरेसे पाणी घालून ते रोप थोड्या वेळासाठी सावलीत ठेवावे. रोपांसाठी माती निवडताना माती नेहमी स्वच्छ आणि दगड किंवा खडे नसलेली असावी. यासोबतच झाडांचा प्रकार किंवा गरजेनुसार माती निवडणेही खूप महत्त्वाचे असते. प्रत्येक रोपांच्या वेगवेगळ्या गरजा असतात, या गरजांकडे दुर्लक्ष न करता रोपांना योग्य त्या प्रकारची माती योग्य त्या प्रमाणात देणे आवश्यक असते.