आपण लावलेल्या रोपांना फळं, फुल येण हे बघण्यात एक वेगळाच आनंद असतो. गार्डनिंग करणे हा कित्येकजणांचा अगदी आवडीचा छंद आहे. गार्डनिंग करताना आपण आपल्या बाल्कनीत किंवा गार्डनमध्ये लावलेल्या प्रत्येक रोपांची तितकीच काळजी घेतो. काहीवेळा रोपांची पाने गळून पडतात, तर काहीवेळा रोपांना फळं, फुल येत नाही अशावेळी आपला हिरमोड होतो. रोपं लावल्यानंतर त्यांची वेळोवेळी योग्य देखभाल करणे देखील तितकेच महत्वाचे असते(How to Use Matchsticks in Plants).
रोपांकडे थोडे जरी दुर्लक्ष झाले तरी झाडं सुकतात, फुलांची वाढ होत नाही अशा एक ना अनेक समस्या उद्भवू शकतात. रोपांच्या बाबतीत सतत अशा काही लहान - मोठ्या समस्या उद्भवल्या की आपण वेगवेगळ्या प्रकारची खते, केमिकल्सयुक्त रसायन आणून रोपांच्या मातीत मिसळतो. असे केल्याने या खतांमधील केमिकल्समुळे रोपांच्या समस्या सोडवण्याऐवजी अधिकच वाढतात. यासाठीच प्रत्येकवेळी केमिकल्सयुक्त रसायन, खते वापरण्यापेक्षा आपण काही घरगुती नैसर्गिक उपाय करु शकतो. रोपांच्या वाढीसाठी माचिसच्या काड्या अनेक प्रकारे फायदेशीर ठरतात, कसे ते पाहूयात( Match sticks can be used to make your plants grow vibrant).
माचिसच्या काड्यांचा सोपा उपाय...
१. माचिसच्या काड्यांमध्ये पोटॅशियम, क्लोराईड, फॉस्फोरिक सल्फर आणि मॅग्नेशियम असते. मॅग्नेशियम आणि पोटॅशियममुळे झाडांची वाढ होण्याची क्षमता वाढते. त्यामुळे झाडांची वाढ झपाट्याने होते, तर फॉस्फरसमुळे झाडांची मुळे मजबूत होतात. अशा परिस्थितीत माचिस झाडांच्या वाढीसाठी खूप फायदेशीर ठरते.
मातीच्या कुंड्यावर शेवाळ वाढलंय? ५ उपाय- कुंड्या दिसतील स्वच्छ-पावसाळ्यात रोपंही वाढतील जोमानं...
२. अनेक प्रकारची फळं, फुलं देणाऱ्या वनस्पतींच्या कुंडीत आपण माचिसच्या काड्या खोचू शकतो. यामुळे झाडे कधीच खराब होणार नाहीत आणि त्यांना खूप चांगले उत्पादन मिळेल. तसेच त्यांची वाढही चांगली होईल. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे रोपांना येणाऱ्या फळा - फुलांवर कधीही कोणत्याही प्रकारचा रोग येण्याची समस्या निर्माण होणार नाही किंवा त्यांची वाढ थांबणार नाही.
रोपांसाठी माचिसच्या काड्या वापरण्याची योग्य पद्धत कोणती ?
१. रोपांसाठी माचिसच्या काड्या वापरण्याचा हा उपाय फारच सोपा आहे. सगळ्यात आधी कुंडीतील माती पाण्याने ओली करा. त्यानंतर ८ ते १० माचिसच्या काड्या कुंडीत घालून ठेवा.
२. माचिसच्या काड्या पूर्णपणे मातीत खोचल्या गेलेल्या असतील याची खात्री करुन घ्यावी. कुंडीत थोड्या थोड्या अंतरावर माचिसच्या काड्या खोचून घ्या. एका कुंडीत १० पेक्षा जास्त काड्यांचा वापर करु नका.
३. १० ते १५ दिवसांपेक्षा जास्त दिवस या माचिसच्या काड्या कुंडीत ठेवू नका. ही क्रिया महिन्यातून फक्त एकदाच करा. माचिसच्या काड्या कुंडीत ठेवणं ही एक उत्तम आयडिया आहे. जेव्हा आपण झाडांना पाणी देतो तेव्हा माचिसच्या काड्यांचा खालचा भाग वितळतो आणि मातीत मिसळतो. यामुळे झाडांना पोषण मिळण्यास मदत होते.