सामान्यतः लोकांना त्यांच्या बाल्कनीमध्ये रंगीबेरंगी फुलं लावण्याची आवडत असते (Gardening Tips). गुलाब, मोगरा आणि जास्वंदाचे रोप आपण आवर्जुन लावतो. पण बऱ्याचदा जास्वंदाच्या रोपाला (Hibiscus) फुलं येतच नाही. जास्वंदाच्या फुलाचे अनेक फायदे आहेत. या फुलांमुळे केस आणि त्वचेला भरपूर फायदा होतो (Plant Care).
या फुलांचा वापर विविध आयुर्वेदिक उपचारांमध्येही केला जातो. पण जास्वंदाचे फुल कुंडीत फुलवणे सोपे नाही. जास्वंदाच्या फुलाची वाढ करण्यासाठी, योग्य मातीची निवड, पाणी व्यवस्थापन, सूर्यप्रकाश, खत व्यवस्थापन, आणि रोग व कीड नियंत्रण याबद्दल माहित असणे गरजेचं आहे. जर जास्वंदाच्या रोपाला फुलं येत नसतील तर, कुंडीतल्या मातीत एक गोष्ट मिसळून पाहा. जास्वंदाचे झाड लालचुटूक फुलांनी बहरेल(Super Soil mix for HIBISCUS to get maximum flowers).
जास्वंदाच्या झाडाची योग्य काळजी कशी घ्याल
- जास्वंदाच्या रोपाची ऋतू बदलांनुसार काळजी घ्यायला हवी. अन्यथा जास्वंदाच्या रोपाला फुलं येत नाही. त्यामुळे महिन्याला खत, माती आणि वेळोवेळी पाणी देत राहा.
- जर योग्य काळजी घेऊनही जास्वंदाच्या रोपाला फुलं येत नास्तोल तर, मातीतल्या कुंडीत पिवळ्या मोहरीचा वापर करून पाहा.
- पिवळी मोहरी जास्वंदाच्या रोपासाठी अतिशय फायदेशीर आणि प्रभावी आहे. मोहरीमध्ये नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम आणि सल्फरसारखे महत्त्वाचे पोषक घटक असतात. ज्यामुळे झाडाची उत्तम वाढ होते.
लहान मुलांचेही केस गळतात? लक्षात ठेवा ६ टिप्स- मुलांच्या केसात कोंडा-केस गळणे थांबेल
- मोहरी खत म्हणून वापरण्यासाठी प्रथम एक वाटी पिवळी मोहरी ग्राइंडरमधून बारीक पावडर तयार करा. आता अर्धा कप पाणी घ्या. त्यात मोहरी पावडर घालून मिक्स करा.
नवरात्र स्पेशल : येत्या ९ दिवसांत खा ‘या’ ४ पैकी १ पदार्थ! वाढेल फिटनेस-पोटही होईल कमी
- जास्वंदाच्या कुंडीतली माती वेगळी करा, त्यात तयार खताचे पाणी घाला. आपण हे तयार खताचे पाणी महिन्यातून २ वेळा कुंडीत घालू शकता. यामुळे जास्वंदाचे रोप छान लालचुटूक फुलांनी बहरेल.