जमिनीतून वारंवार एकाच प्रकारचे पीक घेतल्यानंतर तिचा कस कमी होतो, म्हणजेच गुणवत्ता कमी होते हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळेच ठराविक काळानंतर शेतकऱ्यांना सुद्धा जमीन अधिक सुपिक होण्यासाठी प्रयत्न करावा लागतो. वेगवेगळी खतं टाकावी लागतात. असंच आपल्या छोट्याशा बागेतल्या कुंड्यांमध्ये असणाऱ्या मातीचंही आहे (terrace gardening). मातीची गुणवत्ता वाढविण्यासाठी आपण वर्षातून एकदा तरी प्रयत्न करायलाच हवा. कारण त्या मातीचा कस वाढवला नाही तर त्याचा परिणाम आपोआपच रोपांच्या वाढीवर होतो (how to improve soil fertility?). रोपांची वाढ खुंटते. फुलं येण्याचं प्रमाण कमी होतं. म्हणूनच कुंडीतल्या मातीचा कस वाढविण्यासाठी हा एक सोपा उपाय पाहा..(home remedies for fast plant growth and getting maximum flowers)
कुंडीतली माती अधिक दर्जेदार होण्यासाठी काय उपाय करावा?
कुंडीतल्या मातीची गुणवत्ता कशी वाढवावी, याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ mothernaturemellows या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.
थंडीत व्यायाम करण्याचा कंटाळा येतो? ३ टिप्स- व्यायाम न करताही भराभर उतरेल वजन
यामध्ये असं सांगण्यात आलं आहे की एक- दोन दिवस झाडांना पाणी घालू नका. यामुळे माती थोडी कोरडी होईल. अशी कोरडी झालेली माती थोडी थोडी उकरून घ्या. माती उकरत असताना रोपांच्या मुळांना धक्का लागणार नाही, याची काळजी घ्या. साधारण ८ ते १० तास माती अशीच उकरलेली राहू द्या. यामुळे रोपांच्या मुळांपर्यंत ऑक्सिजन व्यवस्थित जाईल.
यानंतर एका बादलीमध्ये थोडं शेणखत, थोडी नीम पावडर, थोडं दही आणि थोडा मस्टर्ड केक घ्या. शेणखत, नीम पावडर, मस्टर्ड केक हे सगळं साहित्य तुम्हाला ऑनलाईन शॉपिंग साईटवर किंवा तुमच्या शहरातल्या नर्सरीमध्ये मिळू शकतं.
तुपकट असतो म्हणून शिरा खाणं टाळता? घ्या थेंबभरही तूप न टाकता होणाऱ्या शिऱ्याची सोपी रेसिपी
हे सगळं साहित्य बादलील्या पाण्यात टाका. हे सगळ्या साहित्याचं आकारमान जेवढं असेल साधारण त्याच्या ७ ते ८ पट पाणी घ्या. ८ ते १० तास हे मिश्रण असंच राहू द्या आणि त्यानंतर ते थोडं थोडं प्रत्येक झाडाला द्या.
हा उपाय केल्याने कुंडीतल्या मातीत अनेक पौष्टिक पदार्थ जातील आणि त्यामुळे तिची गुणवत्ता वाढून त्याचा परिणाम झाडांच्या वाढीवर, फुलांवर दिसून येईल.