Join us  

घर लहान असो वा मोठे, घरात हवीच ही ७ रोपं, मिळेल भरपूर ऑक्सिजन, स्ट्रेस कमी-वाटेल फ्रेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2022 7:01 PM

Indoor Plants : लहान घरात कोणते इनडोअर -आऊटडोअर प्लांट लावावेत असा प्रश्न असेल तर ही घ्या यादी.

अनेकांना घरात रंगबिरंगी झाडे लावण्याची सवय असते. यामुळे घरातील वातवरण फ्रेश, आनंदी होते. घरासमोर किंवा अंगणात लावलेल्या झाडांमुळे घरात सकारात्मक उर्जेचा संचार होतो. काही जण घराच्या प्रवेशद्वारावर फुलांची झाडं लावून ते सजवण्याचा प्रयत्न करतात. वेलींचा देखील उपयोग करतात. घर सजवल्याने मनाला एक प्रकारचे समाधान मिळते. मात्र काही झाडं घरात असली तर भरपूर ऑक्सिजन मिळतो आणि प्रसन्नही वाटते. आपले घर लहान असो वा मोठे यापैकी काही झाडं, रोपं घरात नक्की ठेवता येतील. (Indoor Plants).

१. एन्थुरियम प्लांट - आपण कित्येकदा बाजारात पानांच्या आकारासारखी लाल रंग असणारी फुल पाहतो. या लाल फुलांच्या रोपाला फारशी देखभाल करण्याची गरज नाही लागत. एन्थुरियम प्लांट हवेतील फॉर्मलाडेहाइड, अमोनिया, टोल्यूनि, जाइलीन यांसारखे विषारी घटक दूर करून हवा शुद्ध ठेवण्यास मदत करते. 

२. चीनी सदाबहार - ज्याच्या नावातच सदाबहार आहे असे वर्षाचे बाराही महिने सदाबहार असलेलं रोप तुम्हाला सुद्धा तुमच्या आयुष्यात सदाबहार ठेवेल. सदाबहार या नावाने प्रसिद्ध असलेलं हे रोप घरात आवर्जून लावायला हवे.

३. स्पायडर प्लांट - स्पायडर प्लांट घरातील विषारी गॅस शोषून घेऊन त्याबदल्यात स्वच्छ ऑक्सिजनचा पुरवठा करतो. हे रोप आकारमानाने छोटं असल्याकारणाने घरात कुठेही तुम्ही सहज लावू शकता. विषारी गॅस शोषून घेतल्यामुळे घरातील हवा शुद्ध होते.

४. ऑर्किड प्लांट - ऑर्किडच्या फुलांचा रंग व आकार बघून आपले मन आनंदी होते. सुंदर फुलांनी घराला शोभा तर येतेच, प्रसन्नही वाटते.

५. पीस लिली प्लांट - पीस लिली हे नावच प्रेम, शांती आणि सुसंवाद दर्शवते. पीस लिली हे असे प्लांट आहे की जे अतिशय कमी सूर्य प्रकाशात देखील जिवंत राहू शकते. पीस लिली प्लांटच्या मनमोहक सुगंधाने फ्रेश वाटेल. 

६. स्नेक प्लांट - स्नेक प्लँटला खूप काळजी घेण्याची गरज लागत नाही. हे रोपं पाण्याशिवाय बरेच दिवस राहू शकते. घरामधील हवा शुद्ध ठेवण्यासाठी हे रोपं प्रामुख्याने लावले जाते. 

७. तुळस - तुळस आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. विशेषत: तुळस रोग प्रतिकारशक्ती बळकट करण्यासाठी व सर्दी खोकल्यासारख्या सामान्य आजारांवर मात करण्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. तुळशीच्या पानांमध्ये अँटी-बॅक्टेरियल, अँटी-व्हायरल, अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. त्यामुळे जिवाणू आणि विषाणूजन्य आजारांमध्ये तिचे हे औषधी गुणधर्म फार महत्वाचे ठरतात.

टॅग्स :बागकाम टिप्सइनडोअर प्लाण्ट्स