Lokmat Sakhi >Gardening > बाल्कनीतल्या रोपांना फुलंच येत नाही? फक्त 'हा' पांढरा पदार्थ मिसळा, भराभर फुलं येतील

बाल्कनीतल्या रोपांना फुलंच येत नाही? फक्त 'हा' पांढरा पदार्थ मिसळा, भराभर फुलं येतील

Tips And Tricks Gardening Tips : प्लांन्ट्सना हेल्दी ठेवण्यासठी तसंच रोपांची काळजी घेण्यासाठी तुम्ही काही सोप्या टिप्स फॉलो करायला हव्यात.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2024 12:48 PM2024-03-06T12:48:59+5:302024-03-06T12:51:43+5:30

Tips And Tricks Gardening Tips : प्लांन्ट्सना हेल्दी ठेवण्यासठी तसंच रोपांची काळजी घेण्यासाठी तुम्ही काही सोप्या टिप्स फॉलो करायला हव्यात.

Tips And Tricks Gardening Tips To Make Homemade Natural Spray For Plants | बाल्कनीतल्या रोपांना फुलंच येत नाही? फक्त 'हा' पांढरा पदार्थ मिसळा, भराभर फुलं येतील

बाल्कनीतल्या रोपांना फुलंच येत नाही? फक्त 'हा' पांढरा पदार्थ मिसळा, भराभर फुलं येतील

घरातील गार्डन बहरलेलं ठेवण्यासाठी लोक वेगवगेळ्या प्रकारचे उपाय करतात तर अनेकदा मार्केटमधून महागडी खतं विकत घेतात. काहीजणं घरीच ऑर्गेनिक खत बनवतात. (Homemade Natural Spray For Plants) प्लांन्ट्सना हेल्दी ठेवण्यासठी तसंच रोपांची काळजी घेण्यासाठी तुम्ही काही सोप्या टिप्स फॉलो करायला हव्यात. काही घरगुती उपाय तुमचं काम सोपं करू शकतात (Gardening Tips) ज्यामुळे गार्डन फुलांनी बहरेल. (Tips And Tricks Gardening Tips)

1) ताक

टाईम्स ऑफ एग्रीकल्चरच्या रिपोर्टनुसार अनेकदा रोपांमध्ये बुरशी येण्याचा प्रकार दिसून येतो किंवा किड लागते अशावेळी तुम्ही ताकाचा वापर करून  रोपांची वाढ करू शकतात. यासाठी १ अर्धा कप ताक १ ग्लास पाण्यात मिसळून याचे लिक्विड तयार करा. नंतर हे द्रावण स्प्रे बॉटलमध्ये भरा आणि रोपांवर शिंपडा यामुळे रोपं हेल्दी राहण्यास मदत होईल. 

बदामापेक्षा चारपट जास्त प्रोटीन देतात ५ बिया; खर्च फक्त १० रूपये-भरपूर प्रोटीन मिळेल, हाडांना येईल ताकद

2) साबणाचे पाणी

साबणाचे पाणी रोपांसाठी फायदेशीर ठरते.  या पाण्यामुळे रोपांना लागलेले मॅली बग्स,  कॅटरपिलर, मुंग्या यांसारखे किडे येत नाहीत. हा उपाय करण्यासाठी ४ ते ५ लिटर पाण्यामध्ये लिक्विड सोप किंवा हँण्डवॉश मिसळा. त्यानंतर झाडांवर स्पे यामुळे रोपांना अजिबात किड लागणार नाही. 

3) एस्प्रिन टॅब्लेट

वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी बरेच लोक एस्प्रिनच गोळी खातात. एस्प्रिसिनच्या मदतीने फुल झाडांची चांगली वाढ होण्यासही मदत होईल. या टॅब्लेटमुळे तुम्ही  झाडांना रोगमुक्त ठेवू शकता. एस्पिरिन पाण्यात मिसळून रोपांवर स्प्रे करा आणि मातीत मिसळा. यामुळे झाडं चांगली राहतील.

कितीपण खा वजनच वाढत नाही-हडकुळे दिसता? रामदेव बाबा सांगतात १ उपाय, भरपूर ताकद येईल

4) एप्सम सॉल्ट

एप्सम सॉल्टमुळे रोपांची वाढ कमी वेळात होते. याचा वापर तुम्ही एखाद्या औषधाप्रमाणे रोपांवर  करू शकता. टोमॅटो, वांगी, मिरची आणि गुलाबाच्या फुलांच्या वाढीसाठी एप्सम सॉल्टची मदत घ्या. यासाठी  10 लिटर पाण्यात 2 चमचे एप्सम सॉल्ट घाला.  यामुळे रोपांची वाढ वेगाने होईल. 

५) कोकोनट वॉटर

रोपांना हेल्दी ठेवण्यासाठी नारळाच्या पाण्याचा वापर करू शकता. पोषक तत्वांनी परिपूर्ण कोकोनट वॉटर एखाद्या टॉनिकप्रमाणे काम करते. 100 मिली लिटर नारळाच्या पाण्यात  5 लिटर पाणी मिक्स करून  घाला. ज्यामुळे रोप हेल्दी दिसून येईल.

Web Title: Tips And Tricks Gardening Tips To Make Homemade Natural Spray For Plants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.