Join us

मोगऱ्याचं रोप वाढतं पण फुलंच येत नाहीत? मातीत 'हे' घरगुती खत घाला, फुलांनी बहरेल रोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 17:43 IST

Tips And Tricks How To Get More Flowers In Mogra : अधिकाधिक लोकांची अशी तक्रार असते की मोगऱ्याचं रोप घरात आहे पण फुलंच येत नाही.

मोगऱ्याचं फुल (Mogra Plant) अशा सुंदर फुलांपैकी एक आहे जे दिसायला तर सुंदर असतेच याशिवाय याचा सुगंधही खूप आकर्षक असतो. या कारणामुळे लोक आपल्या गार्डनमध्ये किंवा बाल्कनीमध्ये मोगऱ्याचं रोप लावणं पसंत करतात ज्यामुळे गार्डनची सुंदरता वाढते. अधिकाधिक लोकांची अशी तक्रार असते की मोगऱ्याचं रोप घरात आहे पण फुलंच येत नाही. मोगऱ्याची देखभाल कशी करायची ते समजून घेऊ.(How To Grow Mogra Plant At Home)

मोगऱ्याच्या रोपासाठी ऊन गरजेचं

मोगऱ्याच्या रोपाला योग्य प्रमाणात उन्हाची आवश्यकता असते. यासाठी मोगऱ्याच्या रोपाला कमीत कमी ५ ते ६ तास उन्हात ठेवा. मोगऱ्याच्या रोपाला जितकं जास्त ऊन मिळेल तितकेच ते हेल्दी राहतील आणि रोपाचा विकासही होईल.

हिवाळ्यात तुळस सुकते-पानं गळतात? ४ टिप्स, कायम बहरलेली राहील घरातली तुळस, हिरवीगार दिसेल

पाणी कसं, किती टाकता ते महत्वाचं

मोगऱ्याच्या रोपाला उन्हाप्रमाणेच पाण्याचीही गरज असते. या रोपाची माती  सहज सुकते. जेव्हाही मातीत मॉईश्चर कमी होते तेव्हा  पानं सुकू लागतात आणि फुलांची वाढही खुंटते. म्हणून जेव्हाही माती कोरडी असेल तेव्हा पाणी द्यायला विसरू नका. 

वातावरण कसे आहे ते महत्वाचे

मोगऱ्याच्या रोपाला १५ ते ३५ डिग्री सेल्सियस तापमान परफेक्ट असते. याच कारणामुळे उन्हाळ्याच्या दिवसांचं वातावरण परफेक्ट असतं. योग्य पद्धतीनं देखभाल केल्यास हिवाळ्याच्या दिवसांतही फुलं येऊ शकतात.

मोगऱ्याच्या रोपाच्या मुळाशी ओल्या गवताचा थर लावा. असं केल्यानं ऊन आणि थंडीचा कमीत कमी परिणाम रोपावर होतो. यासाठी ओली पानं किंवा नारळाची सालं तुम्ही वापरू शकता. वेळोवेळी ट्रिमिंग करणंही आवश्यक आहे. यामुळे रोपावर भरपूर फुलं येतील.

मोगऱ्याच्या रोपासाठी खत

मोगऱ्याच्या रोपात खत म्हणून  १ चमचा खडूची पावडर घालू शकता. हे मोगऱ्यासाठी उत्तम खत आहे. यासाठी बाजारातून खडू विकत आणून बारीक पावडर बनवा. नंतर रोपाची माती थोडी फार खणून घ्या. त्यात खडूची पावडर घाला. यामुळे मातीची गुणवत्ता वाढेल. फुलाला नवीन कळ्या येणं सुरू होईल. याशिवाय चहा पावडर आणि हळद मातीत मिसळून मोगऱ्याच्या रोपासाठी उत्तम खत देऊ शकता. 

टॅग्स :बागकाम टिप्सइनडोअर प्लाण्ट्स