तुळशीचे रोप औषधी गुणांनी परीपूर्ण असते. तुळशीचे रोप बरेच पवित्र मानले जाते. लोक तुळशीची पुजा सुद्धा करतात. असं मानलं जातं की तुळशीचं झाड अंगणात लावल्यानं ऑक्सिजन मिळतो. यातील औषधी गुणांमुळे बरेच लोक चहातसुद्धा तुळशीचं पान घालतात. (Tips And Tricks Your Basil Plant Grow in Winter Season)
योग्य काळजी न घेतल्यामुळे तुळशीचं रोप कोमेजू लागतं. खासकरून हिवाळ्याच्या दिवसांत योग्य प्रमाणात सुर्यप्रकाश न मिळाल्यामुळे रोपाचं नुकसान होतं. हिवाळ्याच्या वातावरणात पानं सुकणं, कोमेजणं, कमकुवत होणं यांसारख्या समस्या उद्भवतात. जर तुम्ही हिवाळ्यात रोपाची व्यवस्थित काळजी घेतली तर ऊन्हाशिवायही रोप बहरलेलं राहील. (Basil Plant Growing Tips Gardening Tips)
रोपाला योग्य प्रमाणात पाणी द्या
हिवाळ्याच्या वातावरणात तुळशीला जास्त पाणी घालण्याची गरज नसते. पण जर तुम्ही गरजेपेक्षा जास्त पाणी दिलं रोप सडण्याची भिती असते. अशा स्थितीत कुंडीतली माती सुकू द्या, त्यानंतर खोदून त्यात पाणी घाला.
गुळाचा चहा फाटतो? फक्कड, स्वादीष्ट गुळाचा चहा करण्याची १ ट्रिक, न फाटता परफेक्ट बनेल चहा
थंड हवेपासून बचाव
थंडीच्या दिवसांत तुम्हाला कमीत कमी पाणी घालावं लागेल. पाणी जास्त थंड नसेल याची काळजी घ्या. थंडीच्या दिवसांत तुळशीच्या रोपाला थंड हवेपासून वाचवून ठेवायला हवे. जर तुम्ही रोप बाहेर ठेवलं तर रात्रीच्यावेळी घरात घ्या. जर बाहेरच तुळशीचं रोप ठेवलं तर कोणत्याही वस्तूनं ते झाकून ठेवा. थंड हवेत ठेवल्यामुळे रोपाची वाढ खुंटते.
या कालावधीत खत घालू नका
हिवाळ्याच्या दिवसांत तुळशीचं रोप हायबरनेशन मोडमध्ये जाते. यादरम्यान तुम्ही कुंडीत भरभरून खत घातल्यास रोप जळू शकते. म्हणूनच डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात खत घालू नका. जर तुम्हाला असं वाटत असेल की खरंच रोपाला खताची आवश्यकता आहे तर मोहोरीच्या खताचा वापर करू शकता.
सुकी पानं काढून टाका
तुळशीच्या पानांची वाढ व्यवस्थित होण्यासाठी सुकलेल्या पानांसोबतच मंजिरी काढून टाका. यासाठी सतत कटींग करत राहा. यामुळे रोप दाट राहील. या पद्धतीनं तुम्ही हिवाळ्याच्या दिवसांत तुळशीच्या रोपाची देखभाल करू शकता. हिवाळ्याच्या दिवसांत या गोष्टींची खास काळजी घ्या.