Lokmat Sakhi >Gardening > झाडांना फुलंच येत नाहीत? मातीत मिसळा ५ रुपयांचा ‘हा’ पदार्थ; गुलाब-जास्वंदाला लागतील फुलंच फुलं

झाडांना फुलंच येत नाहीत? मातीत मिसळा ५ रुपयांचा ‘हा’ पदार्थ; गुलाब-जास्वंदाला लागतील फुलंच फुलं

Tips for Longer Lasting Rose and Hibiscus Blooms (Gardening Tips) : फुलांच्या चांगल्या वाढीसाठी काही सोपे उपाय पाहूया.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2023 01:35 PM2023-10-25T13:35:41+5:302023-10-25T20:16:27+5:30

Tips for Longer Lasting Rose and Hibiscus Blooms (Gardening Tips) : फुलांच्या चांगल्या वाढीसाठी काही सोपे उपाय पाहूया.

Tips for Longer Lasting Rose and Hibiscus Blooms : 5 Rupee Hack To Get More Hibiscus & Rose Flowers On Plant | झाडांना फुलंच येत नाहीत? मातीत मिसळा ५ रुपयांचा ‘हा’ पदार्थ; गुलाब-जास्वंदाला लागतील फुलंच फुलं

झाडांना फुलंच येत नाहीत? मातीत मिसळा ५ रुपयांचा ‘हा’ पदार्थ; गुलाब-जास्वंदाला लागतील फुलंच फुलं

अनेक घरांमध्ये गुलाबाची आणि जास्वंदाची फुलं झाडं लावली जातात. या झाडांना जास्त जागा लागत नाही.  याशिवाय या झाडांमुळे बाल्कनीसुद्धा बहरलेली दिसते. (Tips for Longer Lasting Rose and Hibiscus Blooms) कुंडीत झाडं लावल्यानंतर खत-पाणी घातल्यानंतरही झाडांना फुलं येत नाहीत, मुंग्या लागतात अशी तक्रार अनेकांची असते. फुलांच्या चांगल्या वाढीसाठी काही सोपे उपाय पाहूया. (Secrets to get big sized flowers in rose and hibiscus with care tips)  

कळ्या यायला सुरूवात झाल्यानंतर जास्त पाणी घालू नका

जेव्हाही फुल झाडांना कळ्या यायला सुरूवात होईल तेव्हा झाडांमध्ये जास्त पाणी घालू नका. कारण जास्त पाण्यामुळे पानांना जास्त पोषण मिळेल. फुलं उगवण्याऐवजी झाड आपली एनर्जी पानं वाढवण्यात लावतात.   म्हणूनच पावसाळ्याच्या दिवसांत झाडं भरपूर वाढतात पण फुलं येत नाहीत. पण अजिबात पाणी न घालण्याची चूक करू नका. मातीमध्ये थोडं मॉईश्चर राहण्यासाठी  थोड्याफार प्रमाणात पाणी घालायलाच हवं पण जास्त पाणी घालू नका.

घरात झुरळं-बारीक पिल्लांचा सुळसुळाट झालाय? फक्त १ उपाय, झुरळं कायमची घराबाहेर पळतील

गुलाब आणि जास्वंद दोन्ही झाडं उन्हात ठेवा

उन्हाळ्याचे दिवस वगळता बाकी इतरवेळी हलकं ऊन पडलेलं असताना जास्वंद आणि गुलाब ही दोन्ही झाडं उन्हात ठेवू शकता. या झाडांचा खुराक जास्त असल्यामुळे त्यांच्या योग्य फंक्शनसाठी उन्हाची आवश्यकता असते. म्हणून या झाडांना सावलीत ठेवणं टाळा.

गुलाब-जास्वंदाच्या झाडासाठी ५ रूपयांचा उपाय

गुलाब आणि जास्वंदासाठी चहा पावडरचे फर्टिलायजर परिणामकारक ठरते. चहाच्या पानांमध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे फुलांची चांगली वाढते आणि त्यांचा रंगही दाट होतो. चहाचं पाणी उकळून चहा पावडर एका जागी साठवून ठेवा. चहाचे पाणी थंड झाल्यानंतर तुम्ही झाडांसाठी वापरू शकता. चहा पावडर थंड झाल्यानंतर झाडांमध्ये वापरा.

जर तुम्ही फार गोड चहा बनवत असाल तर पावडर पूर्ण धुवून २ ते ३ दिवसांनी झाडांसाठी वापरा. हे उपाय करून ही झाडांना फुलं येत नसतील तर झाडाची कुंडी बदलण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर काही दिवसांनी प्रूनिंग करा. हार्ड प्रूनिंग करू नका.  २० ते २५ दिवसांच्या अंतराने झाडांमध्ये खत  न विसरता घाला.

Web Title: Tips for Longer Lasting Rose and Hibiscus Blooms : 5 Rupee Hack To Get More Hibiscus & Rose Flowers On Plant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.