घर सुशोभित दिसण्यासाठी आणि सकारात्मक वातावरण राहावं यासाठी अनेक झाडं लावली जातात. (Gardening ideas) त्यापैकीच एक मनी प्लांट. मनी प्लांटच्या वेलीची लटकणारी पानं गॅलरी, हॉलची भिंत अशा अनेक ठिकाणांची शोभा वाढवतात. (Best Tips To Grow Money Plant Faster) योग्य काळजी न घेतल्यास मनी प्लांटची वाढ व्यवस्थित होत नाही आणि पानं कोमेजतात. घरातील मनी प्लांटची चांगली वाढ व्हावी यासाठी काही बेसिक स्टेप्स पाहूया. (Gardening Tips) मनी प्लांट घरात असेल तर नकारात्मकता दूर राहते आणि पॉझिटिव्ह व्हेव्हज जास्तीत जास्त घराकडे आकर्षिक होतात. (How to grow money plant at home)
मनी प्लांटसाठी घरगुती लिक्विड कसे तयार करायचे? (How to grow money plant at home)
मनी प्लांटसाठी घरगुती खत तयार करण्यासाठी पाण्यात १ ग्लास कच्चं दूध मिसळा. चमच्याच्या साहाय्याने हे लिक्वीड ढवळून घ्या. यातून झाडाला प्रोटीन, कॅल्शियम आणि आयर्न मिळेल. हे मिश्रण स्प्रे बॉटलमध्ये भरून हा स्प्रे मनी प्लांटवर पाणी शिंपडा, आठवड्यातून एकदा किंवा पंधरा दिवसातून एकदा हा उपाय केल्यास चांगला परिणाम दिसून येईल.
मनी प्लांट लावताना अशी काळजी घ्या
1) मनी प्लांट तुम्ही हॉलमध्ये किंवा आतल्या खोलीत लावणार असाल आणि तिथे एसी असेल तर मनी प्लांट लावल्यानंतर तापमान १५C ते २४C पर्यंत ठेवा. हे तापमान मनी प्लांट लावण्यासाठी परफेक्ट आहे.
2) मनी प्लांट त्याच्या आकारानुसार छोट्या किंवा मध्यम आकाराच्या कुंडीत लावा. मनी प्लांटचा आकार इतका असावा की मूळं जास्त प्रमाणात पसरणार नाहीत.
गुलाबाला लवकर फुलं येत नाही? कांद्याची टरफलं 'या' पद्धतीने वापरा; १५ दिवसांत येतील भरपूर कळ्या
3) मनी प्लांटला नेहमी भरपूर पाणी देण्याची गरज नसते. तुम्ही झाडांवर पाण्याचा स्प्रे शिंपडा. मनी प्लांट कडक उन्हात ठेवू नका. यामुळे पानांचे नुकसान होऊ शकते.
4) मातीत मनी प्लांट लावताना मातीत एप्सम सॉल्ट घाला. ज्यामुळे पानांची चांगली वाढ होईल. मनी प्लांटमध्ये जास्त स्ट्राँग खतांचा वापर करू नका.
5) मनी प्लांटसाठी तुम्ही प्लास्टीकच्या बॉटलऐवजी काचेच्या बॉटलचा वापर करा. ज्यामुळे या रोपाची वाढ चांगली होईल. दर आढवड्याला पाणी बदलत राहा.
जास्वंदाला फुलं कमी-पानं फार येतात, मुंग्या लागतात? ३ ट्रिक्स, जास्वंदाच्या फुलांनी बहरेल बाल्कनी
6) मनी प्लांटसाठी तुम्ही जी माती वापरत आहात ती मोकळी- भुरभरीत असावी. अशा मातीत रोपाची वाढ चांगली होते. झाड लावल्यानंतर अति प्रमाणात खत घालू नये.