Lokmat Sakhi >Gardening > कोरफडीचं रोप उन्हात ठेवणं योग्य की अयोग्य? काय केलं तर कोरफड वाढेल जोमानं...

कोरफडीचं रोप उन्हात ठेवणं योग्य की अयोग्य? काय केलं तर कोरफड वाढेल जोमानं...

Tips & Tricks Can We Keep Aloe Vera Plant In Sunlight : What is the secret to growing aloe vera : Can aloe vera be in direct sunlight : कोरफड कितीवेळ उन्हात ठेवणे गरजेचे असते...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2024 08:14 AM2024-09-28T08:14:41+5:302024-09-28T08:36:53+5:30

Tips & Tricks Can We Keep Aloe Vera Plant In Sunlight : What is the secret to growing aloe vera : Can aloe vera be in direct sunlight : कोरफड कितीवेळ उन्हात ठेवणे गरजेचे असते...

Tips & Tricks Can We Keep Aloe Vera Plant In Sunlight Can aloe vera be in direct sunlight What is the secret to growing aloe vera | कोरफडीचं रोप उन्हात ठेवणं योग्य की अयोग्य? काय केलं तर कोरफड वाढेल जोमानं...

कोरफडीचं रोप उन्हात ठेवणं योग्य की अयोग्य? काय केलं तर कोरफड वाढेल जोमानं...

छोटसं रोपटं असो किंवा मोठं झाड यांच्या वाढीसाठी पाणी, ऊन या गोष्टी खूप गरजेच्या असतात. कोणत्याही छोट्या रोपाला गरजेनुसार योग्य प्रमाणात पाणी आणि ऊन मिळाले तर रोपं भराभर वाढतात. आपल्या गार्डन किंवा बाल्कनीत असणारी सुंदर रोपं मस्त हिरवीगार आणि छान बहरलेली असावीत असं आपल्याला वाटत. आपल्या गार्डन किंवा बाल्कनीत असणाऱ्या प्रत्येक रोपांची आपण अगदी आवडीने काळजी घेतो. रोपांची काळजी घेताना आपण त्यांना नियमित पाणी घालणे, उन्हांत ठेवणे, खत देणे, छाटणी करणे, किटकनाशक फवारणे असे काही ना काही करत असतो(How to Grow and Take Care of an Aloe Plant).

रोपांच्या वाढीसाठी त्यांना उन्हांत ठेवणे गरजेचे असते हे आपल्या सगळ्यांचं माहित आहे. रोपांसाठी ऊन महत्वाचे असले तरीही गार्डनमधील प्रत्येक रोपाला वाढण्यासाठी उन्हांत ठेवण्याची गरज असतेच असे नाही. काहीवेळा काही रोपं, झाड अशी असतात की ज्यांच्या वाढीसाठी ऊनाची आवश्यकता नसते किंवा त्यांना फार कमी प्रमाणात ऊन लागते, कोरफड (Aloe Vera Plant) ही त्यापैकी एक. बहुगुणी, बहुउपयोगी गुणधर्म असलेली कोरफड आजकाल सगळ्यांच्या बाल्कनीत असते. परंतु या कोरफडीच्या रोपाच्या वाढीसाठी ऊनाची आवश्यकता असते का ? किंवा किती ऊन गरजेचे आहे ? त्याचबरोबर कोरफडीचे रोपं किती वेळ उन्हात ठेवावे असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. यासाठी कोरफडीच्या रोपांसाठी ऊन योग्य की अयोग्य ते पाहूयात(Tips & Tricks Can We Keep Aloe Vera Plant In Sunlight).

कोरफडीच्या रोपांसाठी ऊन योग्य की अयोग्य ?

कोरफडच्या रोपांमध्ये ओलावा आणि त्याचे स्वतःचे औषधी गुणधर्म टिकवून ठेवण्याची नैसर्गिक क्षमता असते. त्यामुळे तज्ज्ञांच्या मते, कोरफडीला सूर्यप्रकाशात ठेवल्याने त्यातील अनेक औषधी गुणधर्म नष्ट होत नाहीत, उलट त्याची वाढ होण्यास मदत होते. नगर बलिया येथील शासकीय आयुर्वेदिक हॉस्पिटलमध्ये सात वर्षांपासून कार्यरत असलेल्या डॉ. प्रियंका सिंग (एमडी आणि मेडिसिनमध्ये पीएचडी) यांच्या मते, कोरफड रोपाच्या चांगल्या वाढीसाठी सकाळचे कोवळे ऊन आणि संध्याकाळचा हलकासा सूर्यप्रकाश फार महत्वाचा असतो. याउलट, कोरफडीचे रोप दुपारच्या कडक उन्हांत अजिबात ठेवू नये. दुपारच्या प्रखर ऊन्हापासून कोरफडीच्या रोपाचे संरक्षण करावे.  

मनी प्लांट्ससाठी लागणारी मॉस स्टिक तयार करा घरच्याघरी, महागडी मॉस स्टिक मिळेल स्वस्तात...

भाजलेल्या शेंगदाण्याची टरफलं फेकून देण्यापेक्षा बाल्कनीतील रोपांसाठी करा खास खत, रोपं येतील बहरुन...

कोरफडीचे रोपं प्रखर उन्हांत ठेवल्यास काय होते ? 

कोरफडीमध्ये अनेक प्रकारचे औषधी गुणधर्म आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, जसे की कॅल्शियम, मॅग्नेशियम, जस्त आणि अनेक प्रकारची  जीवनसत्त्वे. कोरफडीच्या या औषधी गुणधर्मांवर सूर्यप्रकाशाचा कोणताही नकारात्मक परिणाम होत नाही. याउलट, सूर्यप्रकाशामुळे कोरफड वनस्पतीची मूळ अधिक मजबूत होतात आणि त्याची पाने ओलावा आणि त्यातील पोषक घटक टिकवून ठेवतात.

मातीच्या कुंड्यावर शेवाळ वाढलंय? ५ उपाय- कुंड्या दिसतील स्वच्छ-पावसाळ्यात रोपंही वाढतील जोमानं...

कोरफडीचे रोपं सावलीत ठेवावे का ? 

कोरफड पूर्ण सावलीत ठेवल्यास त्याची वाढ मंदावते. त्यामुळे त्याची पाने पिवळी पडून औषधी गुणधर्म कमी होऊ शकतात. म्हणून, त्याला मंद आणि हलक्या  सूर्यप्रकाशात ठेवणे खूप महत्वाचे आहे. प्रा. निशा राघव या वनस्पतीशास्त्र विभागाच्या प्रमुख म्हणतात की कोरफडीला अर्धवट सूर्यप्रकाशात ठेवणे चांगले. जर भांडे घरामध्ये असेल तर ते खिडकीजवळ ठेवा. जिथे त्याला थोडा सूर्यप्रकाश मिळू शकतो. यामुळे वनस्पती निरोगी तर राहतेच पण त्याचे औषधी गुणधर्मही  अबाधित राहतील.

Web Title: Tips & Tricks Can We Keep Aloe Vera Plant In Sunlight Can aloe vera be in direct sunlight What is the secret to growing aloe vera

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.