बऱ्याच लोकांना घरात मनी प्लांट ठेवायला आवडतं. (Gardening Tricks) पण अनेकदा हे रोप सुकतं किंवा वेलीची व्यवस्थित वाढ होत नाही. मनी प्लांटची व्यवस्थित काळजी घेतली तर ते वर्षानुवर्ष चांगले राहते. (Gardening Tips For Home) नवीन वर्षात जर तुम्ही मनी प्लांट लावणार असाल तर काही उपाय करून हिरवंगार मनी प्लांट वाढवू शकता. मनी प्लांट घरी लावणं शुभं मानलं जातं. मनी प्लांट घरात लावल्याने सकारात्मक वातावरण राहण्यास मदत होते. जर मनी प्लांट घरात नसेल तर तुम्ही बााजाारातून लहान रोप आणू शकता किंवा काचेच्या पाण्याच्या बाटलीतही उगवू शकता. (How To Grow Money Plant Faster)
1) मनी प्लांटच्या वाढीसाठी काय करावे? (Top 5 Tips For Money Plant Growth)
फ्लॉवर ओरा. कॉमच्या माहितीनुसार मनी प्लांट हे फुल झाड नसल्यामुळे यात नायट्रेट बेस्ड खताचा वापर करा. वॉटर सोल्यूबल फर्टिलायजरचा वापर केल्यास मनी प्लांट चांगला वाढेल. महिन्यातून एकदा फक्त नैसर्गिक खताचा वापर करा. हिवाळ्याच्या दिवसांत खत न घालताही या झाडाची वाढ वेगाने होईल.
ना माती ना कुंडीचा पसारा; घरात ठेवा पाण्यात वाढणाऱ्या ७ औषधी वनस्पती, आरोग्य राहील उत्तम
2) मनी प्लांट कुठे ठेवताय हे फार महत्वाचे (Where should money be kept in the house)
अनेकांचे असे मत आहे की, मनी प्लांट घरात लावल्यानं सकारात्मक उर्जा येते. अनेकजण गार्डनमध्ये मनी प्लांट लावतात पण उन्हामुळे ते झाड सुकू लागते आणि पानं पिवळी पडतात. जास्त पाण्यामुळे मूळं सडू लागतात ज्यामुळे झाडांची पानं सुद्धा गळू लागतात. मनी प्लांट शेड असलेल्या ठिकाणी ठेवा ज्यामुळे ऊन जास्त लागणार नाही. जर मनी प्लांट शेडमध्ये ठेवणं पॉसिबल नसेल तर कॉटनच्या कापडाने झाकून ठेवू शकता.
3) पाणी बदल राहा (How to take Care Of Money Plant)
मनी प्लांट डेकोरेशनसाठी लावणं अनेकांना आवडतं यासाठी कोणी हे झाड बॉटलमध्ये लावतं तर कोणी कुंडीत लावतं. मनी प्लांट काचेच्याच बाटलीत लावा तर तुम्ही प्लास्टीकच्या बाटलीत लावले तर त्याला दुर्गंध येऊ शकतो आणि दिसायलाही फार चांगले दिसत नाही. दर २ दिवसांनी पाणी बदलत राहा. यामुळे मनी प्लांटला किडे लागत नाहीत आणि झाड व्यवस्थित ग्रो होते.
बांबू प्लांट वाढवण्यासाठी ३ सोप्या टिप्स, एकही पान पिवळं पडणार नाही- प्लांट राहील हिरवेगार
4) कटिंग करणं आवश्यक (Follow These 10 Easy Tips to Grow Money Plant)
मनी प्लांट बहारदार होण्यासाठी आणि चांगल्या वाढीसाठी प्लांटची कटिंग फार महत्वाची आहे. यासाठी प्लांटची पिवळी आणि सुकलेली पानं काढून टाका. याशिवाय फांद्यासुद्धा कट करा. यामुळे गळालेल्या आणि खराब झालेल्या पानांवर जास्त एनर्जी खर्च करावी लागणार नाही आणि झाडाची चांगली वाढ होईल.
५) भांड्याची निवड (Thing To Remember Before Planting Money Plant)
घरात मनी प्लांट लावायचा असेल तर तुम्ही लहान भांड्याची निवड करा. वनस्पतींची वाढ भांड्याच्या आकारावर वाढीवर अवलंबून असते. तुम्ही थेट जमिनीवरही लावू शकता किंवा यासाठी एखादं खोलगटं काचेचं भांडे निवडू शकता.