Join us  

घरातल्या मनी प्लांटची पानं पिवळी होतात-सुकतात? ५ उपाय, भराभर वाढेल मनी प्लांट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2024 11:34 AM

Top 5 Money Plant Indoor Growing Tips : घरा आणलेला मनी प्लांट व्यवस्थित वाढत नाही पानं लगेच पिवळी पडतात अशी अनेकांची तक्रार असते. याची कारणं वेगवेगळी असू शकतात.

घरातलं वातावरण चांगलं वातावरण पॉझिटिव्ह, आनंददायी राहावं यासाठी अनेकजण घरात मनी प्लाटं ठेवतात. मनी प्लांटची चांगली वाढ झाली तर घराची शोभा वाढते आणि गॅलरी किंवा हॉल ज्या ठिकाणी तुम्ही मनी प्लांट ठेवला असेल तिथे लूकही चांगला येतो. (How to Grow And Care For a Money Plant) पण घरातला मनी प्लांट व्यवस्थित वाढत नाही पानं लगेच पिवळी पडतात अशी अनेकांची तक्रार असते. याची कारणं वेगवेगळी असू शकतात. (How to Grow a Money Plant In Water) जर पानं ब्राऊन किंवा पिवळी होत असतील  तर तुम्ही काही सोपे उपाय करून झाडांच्या पानांमध्ये पुन्हा जिवंतपणा आणू शकता. (Follow These 5 Easy Tips to Grow And Take Care Of Money)

 १) पानांमधील बदल कसा ओळखावे? (Gardening Tips in Marathi)

ब्लुम्स कॅपच्या रिपोर्टनुसार जेव्हा पानं पिवळी होतात तेव्हा अनहेल्दी ग्रोथचे संकेत देतात. पण हा एक हेल्दी संकेतही असू सकतो.  ही पानं उगवताना मनी प्लांटमध्ये अनेक पोषक तत्व वाढतात. ज्यामुळे अतिरिक्त पानं पिवळी पडू लागतात. पानांचा खालचा रंग बदलतो आणि वरच्या भागात पानं चांगली उगवत नाहीत. म्हणूनच कटिंगची प्रोसेस करावी.

२) मॉईश्चर लेव्हल चेक करत राहा

मनी प्लांटला योग्य प्रमाणात पाणी न मिळाल्यामुळे मनी प्लांटची पानं पिवळी आणि भूरसट दिसतात. यातील मॉईश्चर वातावरणाशीही संबंधित असू शकतो.  जो अनेकदा डिहायड्रेशनही होऊ शकते. उन्हाळ्याच्या दिवसात गरम तापमानात अशी झाडं ठेवणं कॉमन आहे. यापासून बचाव करण्यासाठी हृयूमिडीफायरचा वापर करा. मातीचा कोरडेपणा तपासून पाहा.

गुलाबाला फक्त पानंच येतात-फुलं येत नाही? १० रूपयांचा 'हा' पदार्थ मिसळा, ७ दिवसांत फुलंच फुल येतील

३) योग्य प्रमाणात पाणी न मिळणं

मनी प्लांटच्या वाढीसाठी कमी उन्हाची आवश्यकता असते. म्हणूनच अनेकजण ऊन नसलेल्या अंधाऱ्या ठिकाणात मनी प्लांच ठेवतात. परिणामी ही पानं पिवळी होतात. घराच्या कोणत्याही भागात तुम्ही मनी प्लांट लावू शकता. सुर्याच्या प्रकाशामुळे पानं अधिकच पिवळी होत असतील तर त्याची जागा बदलण्याचा प्रयत्न करा.

४) मनी प्लांटच्या चांगल्या वाढीसाठी ही चूक टाळा

मनी प्लांटच्या चांगली वाढीसाठी ऊन, पाणी आणि  खत या तिन्ही गोष्टींची काळजी घ्या. या ३ पैकी १ जरी गोष्ट  जास्त प्रमाणात टाकली गेली तर रोपाचे नुकसान होऊ शकते.  रोपाची पानं  पिवळी होण्यामागची ही १ कारण असू  शकतात.

घरातली हवा कायम शुद्ध ठेवण्यासाठी ८ इन्डोर प्लान्टस; ऑक्सिजन मिळेल-आनंदी, निरोगी राहाल

५) इंन्फेक्शनमुळेही पानं पिवळी होऊ शकतात

एफिड, मिलीबग आणि कोळी यांसारखे किडे  मनी प्लांटला लागतात. हे किटन पानांना निर्जिव बनवतात. झाडांना बहरलेलं ठेवण्यासाठी संक्रमित भाग कापून  घ्या. झाडांना मुंग्या लागू नयेत यासाठी झाडांच्या मुळांमध्ये १ ते २ लवंग घाला यामुळे झाडांना पांढरी किड किंवा मुंग्या लागणार नाही.

टॅग्स :बागकाम टिप्सइनडोअर प्लाण्ट्स