Lokmat Sakhi >Gardening > 'या' २ गोष्टींमुळे कुंडीतल्या झाडांची पानं पिवळी पडतात, फुलं येत नाहीत! बघा नेमकं काय चुकतं..

'या' २ गोष्टींमुळे कुंडीतल्या झाडांची पानं पिवळी पडतात, फुलं येत नाहीत! बघा नेमकं काय चुकतं..

Gardening Tips For Increasing Flowers: झाडांची पानं पिवळी पडत असतील किंवा झाडाला भरपूर फुलं येत नसतील, तर पुढे सांगितलेले २ उपाय करून पाहा... (Treating yellow leaves with home remedies)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2023 02:26 PM2023-11-17T14:26:40+5:302023-11-17T14:27:42+5:30

Gardening Tips For Increasing Flowers: झाडांची पानं पिवळी पडत असतील किंवा झाडाला भरपूर फुलं येत नसतील, तर पुढे सांगितलेले २ उपाय करून पाहा... (Treating yellow leaves with home remedies)

Treating yellow leaves with home remedies, Why green leaves becomes yellow? How to increase flowering? How To Grow Plants Faster and Bigger At Home | 'या' २ गोष्टींमुळे कुंडीतल्या झाडांची पानं पिवळी पडतात, फुलं येत नाहीत! बघा नेमकं काय चुकतं..

'या' २ गोष्टींमुळे कुंडीतल्या झाडांची पानं पिवळी पडतात, फुलं येत नाहीत! बघा नेमकं काय चुकतं..

Highlightsतुमच्या झाडांबाबत या दोन्ही तक्रारी जाणवत असतील तर मातीमध्ये लोह आणि फॉस्फरस या दोन्ही गोष्टींची कमतरता आहे. त्यावर हा एक सोपा घरगुती उपाय करून पाहा.

आपल्या शरीरात एखादा घटक जास्त झाला असेल किंवा कमी झाला असेल तर आपल्या शरीरात लगेच काही बदल दिसून येतात. तसेच बदल झाडांच्या बाबतीतही दिसून येतात. झाडांनाही पुरेपूर पोषण मिळालं की त्यांची वाढ जोमाने होते. नाहीतर मग पानं सुकायला लागणं, पानं गळणं, किंवा पानं पिवळी पडणं (Why green leaves becomes yellow?), फुलं न येणं अशा गोष्टी व्हायला लागतात (How to increase flowering?). आता आपण झाडांची पानं पिवळी का पडतात आणि त्यांना फुलं का भरपूर प्रमाणात येत नाहीत, याची कारणं पाहूया (How To Grow Plants Faster and Bigger At Home)...

 

झाडांची पानं पिवळी होण्यामागची २ कारणं 

१. झाडांना गरजेपेक्षा जास्त पाणी देणं

२. झाडाला आयर्नची कमतरता असणं

तसेच झाडांना फुलं न येण्यामागचं कारण म्हणजे मातीमध्ये फॉस्फरसची कमतरता असणं. 

शुगर आणि वजन दोन्ही राहील कंट्रोलमध्ये! काहीही खाताना- पिताना फक्त 'या' ५ गोष्टी लक्षात ठेवा....

झाडांची पानं पिवळी पडत असतील- फुलं येत नसतील तर उपाय

तुमच्या झाडांबाबत या दोन्ही तक्रारी जाणवत असतील तर मातीमध्ये लोह आणि फॉस्फरस या दोन्ही गोष्टींची कमतरता आहे. त्यावर हा एक सोपा घरगुती उपाय करून पाहा. हा उपाय इन्स्टाग्रामच्या gardening.999 या पेजवर शेअर करण्यात आला आहे.

 

हा उपाय करण्यासाठी आपल्याला २ टेबलस्पून सोयाबिन, २ टेबलस्पून तांदूळ, २० मिली व्हिनेगर, १ मध्यम आकाराचा कांदा आणि अर्धा ग्लास पाणी लागणार आहे. 

सगळ्यात आधी तर तांदूळ आणि सोयाबिन ७ ते ८ तास पाण्यात भिजवून घ्या आणि कांदा कापून घ्या.

घरात सतत झुरळं होतात? ५ गोष्टी न विसरता करा, घरात कधीच झुरळं होणार नाहीत

आता एका काचेच्या ग्लासमध्ये भिजवलेले तांदूळ, सोयाबिन, चिरलेला कांदा आणि व्हिनेगर टाका. यानंतर पाणी टाकून ग्लास भरून घ्या.

ग्लासवर प्लॅस्टिकची पिशवी टाकून तो व्यवस्थित पॅक करून घ्या आणि ३ दिवस तो उन्हामध्ये ठेवा.

त्यानंतर त्यात जे मिश्रण तयार होईल, ते झाडांसाठी अतिशय पौष्टिक ठरेल. आपण तयार केलेलं हे मिश्रण महिन्यातून एकदा झाडांना द्या. थोडं मिश्रण कुंडीमधल्या मातीत मिसळा तर थोडं मिश्रण पानांवर फवारा. यामुळे झाडांना चांगलं पोषण मिळेल आणि पानं हिरवीगार होतील, तसेच फुलंही भरपूर येतील. 

 

Web Title: Treating yellow leaves with home remedies, Why green leaves becomes yellow? How to increase flowering? How To Grow Plants Faster and Bigger At Home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.