छोटीशी बाग तयार करताना आपण विविध प्रकारच्या फुलांचे रोप लावतो (Gardening Tips). ज्यात जास्वंदाच्या रोपाचे देखील समावेश आहे. जास्वंदाचे रोप दिसायला सुंदर आणि त्याची वाढ योग्यरित्या होते. परंतु, काही निष्काळजीमुळे जास्वंदाच्या रोपाची वाढ खुंटते. ज्यामुळे झाडांना फुलंच येत नाही. फक्त पानांची वाढ होते.
जर आपल्याही जास्वंदाच्या झाडाला फक्त पानं आणि फुलं येत नसतील, तर त्यात १० रुपयाची गोष्ट घाला. ती १० रुपयाची गोष्ट कोणती, याची माहिती नोएडा सेक्टर २७ स्थित नर्सरीच्या माली नर्सरीचे माळी कमलेश कुशवाह यांनी दिली आहे(Try This 10 Rupee Hack To Get More Hibiscus Flowers on plant).
जास्वंदाच्या रोपाची काळजी घेताना ४ गोष्टींची लक्षात ठेवा
रोपांची करा छाटणी
FSSAI म्हणते 'या' पिठाच्या चपात्या खा; बीपीही नॉर्मल आणि हाडंही होतील मजबूत! पाहा कोणतं ते पीठ
जास्वंदाचे रोप पान आणि फुलांनी बहरते. पण त्याला पिवळी पानंही येतात. त्याची छाटणी करणं गरजेचं आहे. पिवळ्या पानांची छाटणी केल्याने रोपाचे सौंदर्यही टिकून राहील आणि छाटणीच्या जागेतूनच नवीन कळ्याही येतील. जास्वंद असो किंवा इतर, कुंडीतल्या रोपाची दोन महिन्यांतून एकदा छाटणी करायला हवी.
रोपाला नियमित पाणी घाला
जास्वंदाच्या रोपाला नियमित पाणी घालणं गरजेचं आहे. या रोपाला कमी पाणी घातलं तर फुलं येणार नाही. गरजेपेक्षा जास्त घातलं तर, फुलं येणं बंद होईल. कुंडीत रोप लावल्यास जमिनीतील ओलाव्यानुसार पाण्याचे प्रमाण ठरवायला लागेल. उन्हाळ्यात योग्य प्रमाणात रोपाला पाणी घालावे. जर माती ओली असेल तर त्यात पाणी घालू नका. माती पूर्णपणे कोरडे होऊ देऊ नका.
रोपाची माती बदलत राहा
जास्वंदाचे रोप लावल्यानंतर दर ६ महिन्यांनी त्याची माती बदला. शिवाय त्यात नैसर्गिक खत घालायला विसरू नका. यामुळे रोपाची व्यवस्थित वाढ होईल.
रोपाला सूर्यप्रकाशाची गरज
जास्वंदाला सूर्यप्रकाश आणि हवा या दोन्ही गोष्टींची आवशक्यता असते. त्यामुळे कुंडी नेहमी बाल्कनीमध्ये ठेवा. यासोबतच त्याची पाने दोन-तीन दिवसांतून एकदा धुवावीत. उन्हाळ्यात रोज पाने धुत राहा. यामुळे जास्वंदाच्या रोपाला कीड लागणार नाही.
मेदू वडे फसतात - क्रिस्पी होत नाही? डाळ वाटताना त्यात घाला बर्फाचे तुकडे; मेदू वडे होतील परफेक्ट
१० रुपयाच्या खतामुळे रोपाची होईल वाढ
जास्वंदाच्या रोपाची योग्यरित्या वाढ व्हावी म्हणून त्यात झाइम खत मिसळा. १०० ग्रॅम खतासाठी आपल्याला १० रुपये मोजावे लागतील. चमचाभर खत आपण कुंडीतल्या मातीत मिसळू शकता. नंतर त्यावर पाणी घाला. यामुळे रोपाची योग्य वाढ होईल. या खतामध्ये नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम असते. ज्यामुळे झाडाची पुरेपूर वाढ होते. आपण या खताचा वापर कोणत्याही रोपामध्ये करू शकता.