जास्वंदाची फुल प्रत्येक घरांमध्ये दिसून येतं. पूजापाठपासून स्किन केअरपर्यंत प्रत्येक गोष्टीत जास्वंदाचा वापर केला जातो. (Gardening Tips) अनेकदा जास्वंदाला व्यवस्थित फुलं येत नाहीत किंवा मिलीबग्स अटॅक येतो. अनेकदा रोपांची वाढ देखील थांबते. (How to Grow Hibiscus Plant At Home) पाहा त्यावर उपाय ज्यामुळे भरपूर फुलं येतील. जास्वंदाच्या रोपाची चांगली वाढ होण्यासाठी तुम्ही काही गोष्टींचा वापर करू शकता. (Unique Fertilizer For Flowing In Hibiscus)
जास्वंदाच्या रोपाला खत म्हणून गाईच्या शेणाचा वापर करा. गोवरी भिजवून मातीत कालवली तरी चालते. जास्वंदाला भरपूर फुलं येत नसतील फक्त झाडच वाढत असेल तर तुम्ही अर्धा चमचा म्यूरेट पॉटाश घ्या. त्यानंतर जास्वंदाच्या मुळाशी घाला.
जास्वंदाची फुलं पिवळी पडली असल्यास काय कराल (Hibiscus Plant Growth Tips)
जास्वंदाची फुलं पिवळी पडू लागली असतील तर तुम्ही त्यात एप्सम सॉल्ट घालू शकता. एप्सम सॉल्ट पाण्यात मिसळून रोपांवर स्प्रे करा. १५ दिवसांतून एकदा हा उपाय करू शकता. या पानांचा पिवळेपणा दूर होईल. बोन मिल्स, हॉर्न मील्स, लेदर मील्स, म्युरेट पोटॅश, सुपर फॉस्फेट, एनपीके सुफला, कडुलिंबाच्या काड्याचा वापर करू शकता. (पोट, मांड्याचा आकार वाढलाय? डॉ. श्रीराम नेने सांगतात 'वेटलॉस'चा खास फॉम्यूला, भराभर वजन घटेल)
हे सर्व पदार्थ व्यवस्थित मिक्स करून घ्या. त्यात हलकं पाणी घालून मिश्रण व्यवस्थित मिसळून घ्या. ७ ते ८ दिवसांनी पुन्हा ते भिजवा त्यानंतर बंद करून ठेवा. या पद्धतीने २ महिने कम्पोस्ट करू शकता. त्यानंतर २ ते ३ दिवसस उन्हात सुकवून घ्या ही पावडर रोपांच्या मुळांमध्ये घाला. हे घालण्यासाठी एक आठवड्यानंतर खूप कळ्या येतील. २ आठवड्यातून एकदा हे खत घालू शकता हे खत घातल्यानंतर पाणी घालायला विसरू नका.