Lokmat Sakhi >Gardening > कुंडीतल्या मातीत खोचा माचीसच्या काड्या, फुलझाडांच्या येईल बहर, पाहा ही युक्ती

कुंडीतल्या मातीत खोचा माचीसच्या काड्या, फुलझाडांच्या येईल बहर, पाहा ही युक्ती

Use MATCHSTICKS For Your Plants And See Magic : रोपामध्ये माचीसची काडी लावण्याचे हे फायदे तुम्हाला ठाऊक आहे का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2024 01:32 PM2024-02-10T13:32:19+5:302024-02-10T13:33:19+5:30

Use MATCHSTICKS For Your Plants And See Magic : रोपामध्ये माचीसची काडी लावण्याचे हे फायदे तुम्हाला ठाऊक आहे का?

Use MATCHSTICKS For Your Plants And See Magic | कुंडीतल्या मातीत खोचा माचीसच्या काड्या, फुलझाडांच्या येईल बहर, पाहा ही युक्ती

कुंडीतल्या मातीत खोचा माचीसच्या काड्या, फुलझाडांच्या येईल बहर, पाहा ही युक्ती

आपल्यापैकी अनेकांना गार्डनिंग करण्याची आवड असते. छोट्याशा बाल्कनीमध्ये आपण विविध प्रकारचे रोपटे लावतो. भारतीय घरांमध्ये तुळस, गुलाब किंवा मोगऱ्याचं रोपटे आपण लावतोच. या रोपट्यांमुळे बाल्कनीची शोभा वाढते, यासह घर प्रसन्न राहते. पण बदलत्या हवामानानुसार झाडांमध्ये अनेक बदल घडतात. कधी पानं गळतात, तर कधी झाडांना फुलं येत नाही. शिवाय कीटकांमुळेही रोपट्याची वाढ खुंटते.

झाड कायम हिरवेगार राहावे यासाठी बाजारात विविध प्रकारचे खते मिळतात. पण या व्यतिरिक्तही फक्त एका माचिसच्या काडीमुळेही झाड कायम हिरवेगार राहू शकते (Gardening Tips). पण माचिसच्या काडीचा कुंडीत वापर कसा करावा? माचिसच्या काडीचा वापर केल्याने झाड कसे हिरवेगार राहू शकते? पाहूयात(Use MATCHSTICKS For Your Plants And See Magic).

माचिसच्या काड्यांमध्ये आढळतात रासायनिक घटक

मॅच स्टिक्सच्या वरील भागात फॉस्फरस, सल्फर, मॅग्नेशियम आणि क्लोरोफिल यांचे मिश्रण असते. हे घटक रोपासाठी फायदेशीर ठरते. मॅच स्टिकवरील मसाल्यामध्ये असलेले फॉस्फरस रोपट्याची मुळे मजबूत करण्यास मदत करतात. यासोबतच त्यात सल्फर, मॅग्नेशियम क्लोरोफिल असते. ज्यामुळे रोपटे कायम हिरवेगार राहते.

मातीत मिसळा फक्त ३ गोष्टी, कुंडीत लावलेले कडीपत्त्याचे झाडही होईल मोठे-पानं होतील सुगंधी

अशाप्रकारे करा मॅच स्टिक्सचा वापर

- बऱ्याचदा नकळत घडणाऱ्या चुकांमुळे रोपट्याची पानं पिवळी पडतात किंवा गळतात. त्यामुळे मातीत खत घालायला विसरू नका. कुंडीत रोपटे लावण्यापूर्वी एक तृतीयांश मातीत शेणखत मिसळा. यामुळे रोपट्याच्या वाढीस मदत होईल.

- रोप लावताना कुंडीत माती दाबून भरू नका. हलक्या हाताने माती भरा.

तुळस सतत सुकते, पानांवर काळी बुरशी पडते? तुळशीला पाणी घालताना तुम्ही करता ६ चुका

- रोपट्याच्या वाढीसाठी माचिसची काडी उपयुक्त ठरू शकते. याचा वापर करण्यासाठी आधी कुंडीत पाणी घाला. माती ओलसर झाल्यानंतर माचिसचा वरचा भाग मातीत दाबून भरा. काड्या लावताना त्यांच्यात अंतर ठेवा.

- माचिसच्या काड्यांचा वापर आपण महिन्यातून एकदा करू शकता. अधिक वेळ करणे टाळा. पण जर आपण प्लांट ट्रान्सप्लांट करत असाल तर, त्याच मातीचा वापर पुन्हा करणे टाळा.

Web Title: Use MATCHSTICKS For Your Plants And See Magic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.