बहुसंख्य घरांमध्ये असं दिसून येतं की आपल्या बाल्कनीमध्ये इतर कोणतीही रोपं असो किंवा नसो पण तुळशीचं रोप मात्र हमखास असतं. तुळशीला धार्मिक दृष्ट्याही खूप महत्त्व आहे. त्यामुळे तुळशीचं रोप आवर्जून घरासमोर लावलं जातं आणि त्याची काळजी घेतली जाते. पण बऱ्याचदा असं दिसून येतं की उन्हाळा सुरू होताच तुळशीची पानं सुकायला लागतात. किंवा मग पिवळी पडून ती गळायला सुरूवात होते. व्यवस्थित पाणी देऊनही तुळस म्हणावी तशी फुलून हिरवीगार होत नाही. असं जर तुमच्याही तुळशीच्या बाबतीत होत असेल तर हे काही घरगुती उपाय लगेचच करून पाहा (gardening tips for the fast growth of tulsi or basil plant).. यामुळे तुळस नक्कीच पुन्हा छान हिरवीगार होईल.(best homemade fertilizer for tulsi plant)
तुळस सुकत असेल तर काय उपाय करावा?
तुळशीची चांगली वाढ होत नसेल तर घरच्याघरी एक अतिशय सोपा उपाय काही दिवस करून पाहा. हा उपाय कसा करायचा याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ shiprarai2000 या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.
केस वाढणंच बंद झालं? करा 'हा' उपाय, केस वाढतील भराभर- महिनाभरातच दिसेल फरक
हा उपाय करण्यासाठी आपल्याला बेकिंग सोडा लागणार आहे. तुळशीच्या रोपाच्या मातीमध्ये १ टीस्पून बेकिंग सोडा थोडा पसरवून टाका आणि त्यानंतर त्यावर १ ग्लास पाणी घाला. बेकिंग सोड्यामधे असणारे घटक मातीला आणखी कसदार करून तुळशीची वाढ चांगली होण्यासाठी मदत करतील. हा उपाय आठवड्यातून एकदाच करा. काही दिवसांतच तुळस खूप छान वाढलेली दिसेल.
हे उपायही करून पाहा...
१. तुळशीची वाढ चांगली होण्यासाठी आणि ती डेरेदार होण्यासाठी तुळशीला येणाऱ्या मंजिरी काढून टाकाव्या. कारण तुळशीला मंजिरी यायला सुरुवात झाली की तिची वाढ खुंटते.
पारंपरिक जोडव्यांचा ट्रेण्डी थाट! ८ एकदम युनिक डिझाईन्स, पाय दिसतील सुंदर- नाजुक
२. उन्हाळ्यात तुळशीला खूप ऊन लागत असेल तर एक- दोन महिन्यांसाठी तिची जागा बदलून पाहा. तिला थोडं कमी ऊन लागेल अशा ठिकाणी ठेवून पाहा.
३. तुळशीला पाणी घालण्यासाठी अजिबात आळस करू नका. उन्हाचा कडाका सध्या खूप वाढला आहे. त्यामुळे तिला अगदी सकाळ- संध्याकाळ पाणी घातले तरी चालेल.