Join us  

कुंडीतल्या रोपांसाठी साखर ठरते वरदान, फवारा ४ प्रकारची मिश्रणं, मिळतील ऑर्गेनिक फुलं-भाज्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2024 9:25 AM

Use of sugar for growing plants gardening tips : साखरेचा वापर केल्यास रोपं जोमाने वाढण्यास, त्यांना फुलं येण्यास, फांद्यांना भरपूर हिरवीगार पाने येण्यास मदत होते.

साखर ही आपल्या आहारातील अतिशय महत्त्वाची आणि बदनाम गोष्ट आहे. चहा-कॉफीपासून ते गोड पदार्थ, पॅकेट फूड अशा सगळ्या गोष्टींमध्ये मोठ्या प्रमाणात साखरेचा वापर केलेला असतो. साखरेमुळे डायबिटीस, लठ्ठपणा यांसारख्या समस्या उद्भवतात हे आपल्याला माहित असल्याने अनेक जण साखर खाण्यावर नियंत्रण ठेवतात. पण जे जास्त प्रमाणात साखर खातात त्यांच्या आरोग्यावर त्याचा दुष्परीणाम झालेला दिसतो (Use of sugar for growing plants gardening tips).

साखर माणसांसाठी घातक असली तरी रोपांसाठी ती एकप्रकारचे वरदान असते. कुंडीतल्या रोपांसाठी वेगवेगळ्या प्रकारे साखरेचा वापर केल्यास रोपं जोमाने वाढण्यास, त्यांना फुलं येण्यास, फांद्यांना भरपूर हिरवीगार पाने येण्यास मदत होते. आता एरवी खाण्यासाठी वापरत असलेली ही सारख रोपांसाठी कशाप्रकारे वापरायची आणि त्याचा नेमका काय आणि कसा फायदा होतो ते पाहूया...

(Image : Google)

१. अनेकदा रोपांची वाढ विशेष काही कारण नसताना थांबलेली असते. अशावेळी साखर पाण्यामध्ये विरघळून ती रोपांवर स्प्रे केल्यास रोपांची चांगली वाढ होण्यास मदत होते. 

२. साखर, पाणी आणि बिअर एकत्र करून हे मिश्रण रोपांवर फावरायचे. त्यामुळे रोपांची मुळे मजबूत होतात आणि रोपांची चांगली वाढ होण्यास मदत होते. 

३. व्हाईट व्हिनेगर आणि व्हाईट शुगर यामध्ये नायट्रोजन हा घटक असतो. कुंडीतील रोपांची पाने गळून नुसत्या फांद्या राहिल्या असतील तर या फांद्यांना हिरवीगार पाने येण्यासाठी हे मिश्रण फावरण्याचा चांगला फायदा होतो. 

४. ब्राऊन शुगर आणि सोयाबीनचे पाणी यांचे मिश्रण केल्यास फॉस्फेट तयार होते आणि त्यामुळे रोपांना भरपूर फुले येण्यास मदत होते.

टॅग्स :बागकाम टिप्सइनडोअर प्लाण्ट्सहोम रेमेडी