गणेशोत्सव म्हणजे धामधूम. कुणाकडे दिड दिवसांचा गणपती तर, कुणाकडे तीन दिवसांचा असतो (Gardening Tips). गणेशोत्सवाच्या काळात गणपतीला फुलं, दुर्वा मोठ्या प्रमाणात वाहिलं जातं. दिवस संपला की दुसऱ्यादिवशी त्याचं निर्माल्य होतं. निर्माल्य टाकून देण्याची इच्छा होत नाही. निर्माल्य टाकून देण्यापेक्षा किंवा गणपती विसर्जनासोबत पाण्यात विसर्जित करण्यापेक्षा त्याचा वेगळा वापर करून पाहा.
निर्माल्य पाण्यात विसर्जित केल्याने, पाण्याची नासाडी होते. त्यापेक्षा आपण याचा वापर झाडांसाठीही करू शकता. निर्माल्याचा वापर झाडांसाठी केल्याने झाडांची योग्य वाढ होईल, आणि पानं हिरवेगार होतील. पण निर्माल्या वापर झाडांसाठी कसा करावा? याच्या वापराने झाडांची वाढ होईल?(Use of Waste flowers for Gardening).
झाडांच्या वाढीसाठी निर्माल्याचा वापर
- सर्वात आधी कुजलेली फुलं वेगळी करा. सुकलेल्या फुलांची देठं वेगळी करा, आणि पाकळ्या एका बाटलीमध्ये भरून ठेवा.
तांदुळाचं पीठ कशाला? कच्च्या तांदुळाचे करा सुबक - कळीदार मोदक; तोंडात टाकताच विरघळतील
- पाकळ्या बाटलीमध्ये भरून ठेवल्यानंतर त्यात पाणी घाला. पाण्यात पाकळ्या बुडवून ठेवा. नंतर त्यात एक प्लेट गूळ घाला. गूळ आणि फुलांच्या पाकळ्या झाडांच्या वाढीसाठी योग्य मदत करतील.
- १० दिवसांसाठी तसेच ठेवा. १० दिवसानंतर त्यात पाकळ्या गाळून पाणी दुसऱ्या बाटलीमध्ये काढून घ्या. त्यात अर्धी बाटली पाणी घालून मिक्स करा. आणि स्प्रे बाटलीमध्ये पाणी भरून घ्या.
ऐन तारुण्यात हाडं ठणठणकतात? रोज खा १ पौष्टिक लाडू; गुडघेदुखी विसराल - केसही होतील दाट
- आपण तयार पाण्याचा वापर मातीत किंवा झाडांवर फवारणी करूनही करू शकता. यामुळे झाडांच्या वाढीस मदत होईल. झाडांवर कोणतेही कीटक फिरकणार नाही. आणि पानंही हिरवेगार राहतील.