सोशल मीडियात आपण अनेकांची बाग पाहतो. फुलंच फुलं. बहरलेली बाग. कुणी कुणी ताज्या भाज्यांचे फोटो टाकतं. कधी आपल्यालाही आता ऑर्गेनिक खाऊ असा झटका येतो आणि मग आपण ठरवतो की आपणही आपल्या गॅलरीत, खिडकीत कुंड्या ठेवू. छान छान भाजी आणि फुलझाडं लावू. मग आपण त्यासाठी नर्सरी गाठायचं ठरवतो, रोपं आणतो. मग हव्या कुंड्या. महागड्या कुंड्या आणतो. कोणत्या झाडाला कशी कुंडी लागेल याचा आपण अभ्यासही करत नाही. करतो पैसे खर्च आणि तिथंच बागकाम गडबड व्हायला लागते. कुंडीचा आकार चुकला की रोपांची गडबड होते. पैसे खर्च आणि बागकाम शून्य असं अनेकांचं होतं.
(Image : google)
मग त्यावर उपाय काय?
१. लगेच उठून बाजारात जाऊन डझनभर कुंड्या विकत आणायची काहीच गरज नाही.२. आपल्या घरातले जुने, गळके माठ, जुन्या बादल्या, तेलाचे, श्रीखंडाचे, आईस्क्रीमचे लहान मोठे डबे आपण कुंडीसारखे वापरला शिकू शकतो.३. आपल्या अंगणातच असलेली जशी असेल तशी माती आपण वापरून बघू शकतो. त्यातून मातीचा पोत आपल्याला कळू लागेल. अगदीच नसेल तर माती नर्सरीतून आणू शकतो. त्यापूर्वी अवतीभोवती बघा बांधकामं बरीच सुरु असतात. पोतंभर माती कुठंही मिळेलच.
(Image : google)४. कुंडी कशी भरायची ते आपण शिकू. त्यासाठी गल्लीत पडलेला पालापाचोळा, नारळाच्या शेंड्या आणून कुंडी भरु. लगेच खत विकतही आणायची गरज नाही.५. स्वयंपाकघरात काही बिया मिळतात का पाहा. मेथी-कोथिंबीर, आलं-लसूण लावून तर पाहू.६. रोपं विकत न आणता आपल्या परिसरात कोणाकडे रोपं असतील, तर ती मागू. लोक आनंदाने रोप देतात. काड्याही लागतात काही झाडांच्या. ७. फारही दाटी नको आधी २/४ लावू. मग बाकीची फुलझाडं आणू.
७. बागकाम म्हणजे भरमसाठ खर्च नाही तर भरपूर आनंद. आपल्या घरातला हिरवा कोपरा आपण बिनपैशात, घरातलाच कचरा वापरुन, खत करुनही करु शकतो. हौस मात्र मुळापासून हवी, तर कष्टांना खरंच बहर येतो.