Join us  

झाडं झोपतात कधी, सकाळी उठतात कधी; माणसांसारखंच असतं का त्यांचं रुटीन? पाहा व्हिडिओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2022 2:18 PM

Plants Also Sleeps: आपल्याप्रमाणेच झाडंही झोपतात, असं तुम्ही आजवर ऐकलं असेल... पण कधी बघितलं आहे का? झाडांची तिच तर खास गंमत सांगतोय हा व्हिडिओ..(viral video: have you seen how plants sleeps?)

ठळक मुद्देखरंच झाडं झोपतात का आणि झोपत असतील तर कशी बरं? तेच तर सांगितलं आहे या एका व्हिडिओमध्ये. 

झाडांच्या बाबतीतल्या काही काही गोष्टी खूपच रंजक असतात.. पण यासगळ्या गोष्टी, त्यांच्यात होणारा बदल अतिशय हळूवार असतो. झाडांच्या (plants) बाबतीत असं सगळंच काही झटपट होत नाही. ते अनुभवायचं असेल, बदल कसा होतो हे टिपायचं असेल तर त्यासाठी खूप वेळ द्यावा लागतो आणि नेमका तोच तर आपल्याकडे नसतो. त्यासाठीच तर बघा हा एक मस्त व्हिडिओ (video about plants growth).. झाडांची खास माहिती देणारा हा व्हिडिओ सोशल मिडियावर (viral video on social media) सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे.

 

आपण हे खूप वेळा ऐकलेलं असतं की झाडंही झोपतात.. संध्याकाळी लहान मुलांनी झाडांना हात लावल्यावर त्यांना घरातली मोठी मंडळी हमखास हे वाक्य ऐकवतात की ''आता झाडांना हात लावू नका, झाडं झोपली आहेत..'', लहानपणी हे वाक्य ऐकून गंमत वाटते, पण मोठेपणी मात्र त्याबाबत फार उत्सूकता वाटते की खरंच झाडं झोपतात का आणि झोपत असतील तर कशी बरं? तेच तर सांगितलं आहे या एका व्हिडिओमध्ये. 

कुंडीत लावा आलं, ५ सोप्या गोष्टी- छोट्याशा कुंडीतही येईल भरपूर आलं! प्या गरमागरम आल्याचा चहा.. 

@TansuYegen या ट्विटर हॅण्डलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

 

अवघ्या २०- २५ सेकंदांचा हा व्हिडिओ आहे. पण त्यासाठी झाडांचं मात्र किती तरी दिवसांचं शुटींग घेण्यात आलं आहे. झाडांवर कॅमेरा सेट करून तो अजिबात हलू न देता हा व्हिडिओ तयार करण्यात आला आणि त्यानंतर फास्ट फाॅरवर्ड करून तो सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे.  पेटता बाण ‘तिनं’ पायानं मारला, केला अचूक लक्ष्यभेद! पाहा व्हिडिओ- खाली डोकं-वर पाय

''Plants sleep and wake up just like us humans…'', अशी कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आली आहे. या व्हिडिओमध्ये सुर्यप्रकाश कमी झाल्यावर झाडं हळूवारपणे त्यांची पानं आकसून घेतात, मलूल झाल्यासारखी वाटतात. तर सुर्यप्रकाश आल्यानंतर पुन्हा त्यांच्यात नवी टवटवी आल्यासारखी दिसते. 

 

टॅग्स :बागकाम टिप्सइनडोअर प्लाण्ट्ससोशल व्हायरलसोशल मीडियाट्विटर