Lokmat Sakhi >Gardening > पावसाळ्यात कुंडीत भाज्या लावायच्या, पण बी नेमकं कसं पेराल? बिया नेमक्या रुजण्यासाठी १० गोष्टी विसरु नका..

पावसाळ्यात कुंडीत भाज्या लावायच्या, पण बी नेमकं कसं पेराल? बिया नेमक्या रुजण्यासाठी १० गोष्टी विसरु नका..

कुंडीतही हौशीने भाजीपाला पेरता येतो, पण त्यासाठी काही तंत्र शिकून घेणं उत्तम.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2024 04:12 PM2024-06-15T16:12:45+5:302024-06-15T16:15:19+5:30

कुंडीतही हौशीने भाजीपाला पेरता येतो, पण त्यासाठी काही तंत्र शिकून घेणं उत्तम.

What are the steps in sowing seeds? How do you plant seeds in rainy season at home? How to sow seeds in pots? | पावसाळ्यात कुंडीत भाज्या लावायच्या, पण बी नेमकं कसं पेराल? बिया नेमक्या रुजण्यासाठी १० गोष्टी विसरु नका..

पावसाळ्यात कुंडीत भाज्या लावायच्या, पण बी नेमकं कसं पेराल? बिया नेमक्या रुजण्यासाठी १० गोष्टी विसरु नका..

Highlightsनवीन बनवलेले झाडं गिफ्ट करण्यासाठी उत्तम!!

अंजना देवस्थळे (लेखिका हॉर्टिकल्चरिस्ट आहेत.)

पावसाळा हा नवनिर्मितीचा मौसम आहे. उन्हात तापलेली, राख राखलेली जमीन पावसासाठी आसुसलेली असते. पावसाची एक सर पडली की चमत्कार घडून येतो सगळीकडे उत्साह,चैतन्य पसरतं,जिवंतपणा येतो. बघता बघता मातीत दडून बसलेल्या बिया रुजून गवत आणि असंख्य प्रकारच्या वनस्पती उगवू लागतात. आपल्या बागेत, अगदी लहानशा कुंडीतून लीली, मे फ्लॉवरची फुलं अचानक डोकावतात. पावसाचं पाणी आणि वातावरणात वाढलेला दमटपणा झाडांना खूप भावतो.आणि याचकाळात आपण ठरवतो की आपणही आपल्या लहानशा बागेत काही कुंड्या लावू.

आपणही नवीन रोप तयार करूया का?

१. रोपं तयार करण्याचे सर्वात सोपा प्रकार म्हणजे बिया पेरणे. बिया रुजवायचे काही नियम पाळले की आपण ह्यात १०० % यशस्वी होवू शकतो. पहिली गोष्ट म्हणजे बिया पूर्णपणे पक्व झालेल्या फळातल्या असाव्या. म्हणजे कैरीची कोय रुजणार नाही पिकलेल्या अंब्यातली रुजेल. हिरव्या मिरचीतल्या बिया रुजणार नाहीत लाल मिरचीतल्या रुजतील. प्रत्येत बीला रुजण्याची क्षमतेची एक विशिष्ट कालावधी असते. त्याला  व्हायॉबिलटी म्हणतात. ही क्षमता कमी जास्त असते, उदाहरणार्थ आंबा,जांभूळ,फणसाच्या बिया फारतर दोन आठवडे राहू शकतात. त्या नंतर त्यांची रुजण्याची शक्यता कमी होते. कमळाच्या बिया शेकडो वर्षांनीपण रुजू शकतात!! तर जर का तुम्ही बिया विकत घेणार असाल तर बेस्ट ही तारीख बघून घ्या.
२. मग बिया रुजवायला लागणारी माती कशी असावी.नवीन नवीन आलेले मोड अगदी नाजूक असतात,त्यांना मातीत शिरायला सुलभ व्हावं यासाठी माती भुसभुशीत असावी. भुसभुशीत मातीत हवा खेळती राहते, पाणी साठून राहत नाही. बिया पेराताना माती आणि चांगलं कुजलेलं, बारीक केलेलं शेणखत घ्यावं. हे मिश्रण ओलसर असावं. ज्या कुंडीत रोपं करणार असाल त्याला पाण्याचा निचरा होण्यासाठी छिद्र असावं. बिया भिजवून ठेवल्यास लवकर रुजतात. रात्री भिजवून सकाळी पेराव्या. जास्त वेळ ठेऊ नये.
३. फुलझाडांच्या बिया,टोमॅटो,मिरची,वांगी,कोबी या बियांची रोपं करून त्यांना दुसरीकडे लावलं जातं. फळंझाडं,भेंडी, गवार, सारख्या काही बियांना एकत्र न लावता वेगवेळ्या वेगळ्या कुंडीत लावाव्यात.

बिया किती खोल पेराव्या?

१. जेवढी मोठी बी तितके खोल पेरावे. बारीक बिया असतील तर त्या वरच्यावर पेराव्या. बिया पेरून त्यावर खतमातीचं मिश्रण घालून झारीच्या मदतीने पाणी घालावे. पाणी ओतू नये,ओतले तर पेरलेल्या बिया  विस्कटतील.
२. वर्तमान पत्राने दोन दिवस झाकून ठेवल्यास बिया रुजण्याच्या प्रक्रियेला मदत होईल, कारण बियांना रुजायला अंधार आवडतो.
३. साधारणपणे बिया तीन ते चार दिवसात रुजतात. धण्यासारख्या काही बिया मात्र आपल्या पेशंसची परीक्षा घेतात! दोन दोन आठवडे घेतात रुजायला .नवीन रोपं कोवळी असली तरी उन्हात ठेवायला काही हरकत नाही. वेळच्या वेळी पाणी देणे महत्त्वाचे. रोपं थोडी मोठी झाली की त्यांना त्यांच्या नियोजित ठिकाणी लावावे .

 

गुलाब,जास्वंद,मोगरा ,शेवगा यासारखी काही झाडं फांदी लावूनही रुजवता येतात. त्यासाठी पेन्सिलच्या जाडीची जून फांदी निवडावी. त्याला कमीत कमी चार पेर असावे. खालच्या पेराच्या जवळून धारदार कात्रीने तिरक कापून घ्यावं. पानं काढून घ्यावी.(सहज शक्य असेल तर रुटिंग पावडरमधे खालचा भाग बुडवल्यास उत्तम) व तयार केलेली फांदी ओलसर भुसभुशीत खत माती भरलेल्या ट्रे किंवा छोट्या कुंडीत लावावी. अशी तयार केलेल्या कुंड्या सुरक्षित ठकाणी ठेवावी जिथे पावसाचा मारा होणार नाही. 
४. माती ओलसर ठेवावी ओळी चिंब नव्हे. तीन आठवड्यात मुळ फुटून पालवी देखील फुटू लागते. जास्वंदीच्या फांद्या पाण्यात बुडवून ठेवल्या तरी त्यांना मुळ फुटतात. अश्या फांद्या कुंडीत लावून पहिल्यांदा जराश्या सावलीत ठेवाव्या आणि नंतर सूर्यप्रकाशात आणाव्या.

५. कर्दळ,सोनटक्का,शतावरी, हेलिकानिया सारख्या झाडांची गर्दी झाली असेल तर ती देखील उपटून त्याचे दोन तीन नवीन झाडं बनवता येतील .
६. कॅक्टस, सकलंटसारख्या झाडांना मात्र ह्या काळात जपावं.
७. झाडांची अभिवृद्धी करायचे हे काही सोपे प्रकार जे आपण सहज करू शकतो. नवीन बनवलेले झाडं गिफ्ट करण्यासाठी उत्तम!!

https://www.instagram.com/anjana_dewasthale/

Web Title: What are the steps in sowing seeds? How do you plant seeds in rainy season at home? How to sow seeds in pots?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.