Lokmat Sakhi >Gardening > हिरव्या कोवळ्या पौष्टिक भाजीची ताजी गोष्ट! घरच्याघरी ताजेताजे मायक्रोग्रीन्स, ते वाढवायचे कसे-खायचे कसे?

हिरव्या कोवळ्या पौष्टिक भाजीची ताजी गोष्ट! घरच्याघरी ताजेताजे मायक्रोग्रीन्स, ते वाढवायचे कसे-खायचे कसे?

मायक्रोग्रीन्सची सध्या खूप चर्चा आहे, ते घरच्याघरी कसे आहारात समाविष्ट करायचे? (benefits of microgreens)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2024 05:22 PM2024-07-03T17:22:47+5:302024-07-03T17:29:37+5:30

मायक्रोग्रीन्सची सध्या खूप चर्चा आहे, ते घरच्याघरी कसे आहारात समाविष्ट करायचे? (benefits of microgreens)

what is microgreens, how to grow it at home? benefits of microgreens | हिरव्या कोवळ्या पौष्टिक भाजीची ताजी गोष्ट! घरच्याघरी ताजेताजे मायक्रोग्रीन्स, ते वाढवायचे कसे-खायचे कसे?

हिरव्या कोवळ्या पौष्टिक भाजीची ताजी गोष्ट! घरच्याघरी ताजेताजे मायक्रोग्रीन्स, ते वाढवायचे कसे-खायचे कसे?

Highlightsआपल्या शेतातली, आपल्या कष्टाची आगदी ताजी, चविष्ट, लुसलुशीत भाजी सॅलेड, स्मुदी पराठे करायला तयार आहे.

अंजना देवस्थळे (लेखिका हॉर्टिकल्चरिस्ट आहेत.)

प्रथिनांसाठी कडधान्याला आपल्या आहारात खूप महत्त्व आहे. अंकुरित केलेले, मोड आलेले कडधान्य पचायला हलके असतं हेही माहिती आहे. पालेभाज्यातून आपल्याला भरपूर प्रमाणात क्षार आणि तंतुमय मिळतात हेही माहीत आहे, तर आपण आज मोड आलेले कडधान्य आणि पालेभाज्या यांच्या मधल्या अवस्थेबद्दल बोलणार आहोत. म्हणजे बियांना मोड आले आहेत आणि त्यांची नुकतीच वाढ सुरू झाली आहे, पूर्ण वाढ नाही. अशा अवस्थेतल्या झाडांना मायक्रोग्रीन्स, असे म्हणतात.
हे मायक्रोग्रीन्स म्हणजे नेमकं कसं दिसतं?
मोड आल्यानंतर बाल्यावस्थेतली रोपं म्हणजे फार तर सात ते दहा दिवशी कोवळी, लुसलुशीत, कुरकुरीत आणि अत्यंत चविष्ट.
आपल्या परिचयातील एक मायक्रोग्रीन म्हणजे वाळूतली मेथी !
शेंड्याला हिरवे गार दोन दल आणि बोट भर लांब मूळ.
वाळूतली मेथी आपल्या रोजच्या मेथीपेक्षा कित्येकपटीने कडू असते, तिचा स्वाद अधिक त्यामुळे एवढीशी पुरते.
तर मायक्राेग्रीन्सची हीच गंमत आहे. अधिक स्वाद, अधिक चव आणि असंख्य पौष्टिक घटक.
काही ठिकाणी हे मायक्रोग्रीन्स विकत मिळतात पण त्यासाठी अव्वाच्या सवा किंमत मोजावी लागते. पण आनंदाची बातमी अशी की असंख्य प्रकारचे मायक्रोग्रीन्सची इवलीशी शेती आपण आपल्या खिडकीतही करू शकतो. त्यासाठी फार काही लागणार नाही कारण सर्व साहित्य आपल्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असतात.

काय करायचं?

१. नवरात्रीत नवधान्य पेरायला कशी तयारी करतो तशीच जमवा-जमव करायची.
२. कोणत्याही बागकामाला सुरुवात करायची म्हटले तर सर्वांत पहिले येते ती कुंडी कोणती घेऊ? स्वयंपाकघरात जुने प्लॅस्टिकचे आइस्क्रीम, मिठाईचे डबे, मुलांचे वापरत नसलेले चपटे डबे, खोल डबे नको. त्यातला एक घ्या. त्याला छान पैकी चार छिद्र पाडा.
३. मातीपेक्षा कोकोपीट सर्वांत उत्तम, पाणी घालून ओलसर केलेलं. वाळू असेल तर चालेल (समुद्रातली वाळू असेल तर ती ३/४ वेळा धुवून घ्यावी लागेल, मीठ काढून द्यायला) काहीच नाही तर ओलसर माती चालेल, चिखल नको.
४. छिद्र पडलेल्या डब्यात कोकोपीट / माती भरून घ्या हाताने छान दाबा. आता आपलं हे डबा पेरणीला तयार आहे.

५. स्वयंपाकघरात डबे हुडकायचे. मेथी, मोहोरी, वाल, हरभरे, चवळी, पावटे, मूग, सब्जा...
६. ज्या बिया मोठ्या आहे म्हणजे मेथी, चवळी, मूग, हरभरे ४/५ तास भिजवून घेता येतील. (सब्जा मुळीच भिजवायची नाही, चिकट गोळा होईल)
बारीक बिया भिजवायची गरज नाही.
७. आता बिया पेरुया. आपल्याला या अगदी दाटीने पेरायच्या आहेत. शेजारी शेजारी, चिकटून चिकटून, एकावर एक नाही. बिया झाकायला हलकंस कोकोपीट घालायचे.

८. कोकोपीट / माती दमट करायची. अती पाणी घालायचे नाही. पाणी जास्त झालं की हे कोवळे अंकुर कुजून जातील.
९. वर्तमान कागदाच्या घडीने झाकून हे हवेशीर, जिथे सूर्यप्रकाश येतो अशा ठिकाणी ठेवायचे. दोनच दिवसांत दल बाहेर डोकावतील आणि भरभर मोठे होतील.
साधारण पाच-सहा दिवसांत दोन इंचाचे झाले की आपलं शेत कापणीला येतं.
१०. आपल्या शेतातली, आपल्या कष्टाची आगदी ताजी, चविष्ट, लुसलुशीत भाजी सॅलेड, स्मुदी पराठे करायला तयार आहे.

anjanahorticulture@gmail.com

Web Title: what is microgreens, how to grow it at home? benefits of microgreens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.