Lokmat Sakhi >Gardening > रासायनिक खत कशाला? नारळाच्या शेंड्यांचा करा 'असा' वापर; कुंडीतली रोपं वाढतील जोमाने

रासायनिक खत कशाला? नारळाच्या शेंड्यांचा करा 'असा' वापर; कुंडीतली रोपं वाढतील जोमाने

What makes coconut shell as a fertilizer? : नारळाच्या सालीमुळे झाडाची योग्य वाढ होईल..ते कसे पाहा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2024 07:34 PM2024-08-20T19:34:44+5:302024-08-20T19:36:58+5:30

What makes coconut shell as a fertilizer? : नारळाच्या सालीमुळे झाडाची योग्य वाढ होईल..ते कसे पाहा..

What makes coconut shell as a fertilizer? | रासायनिक खत कशाला? नारळाच्या शेंड्यांचा करा 'असा' वापर; कुंडीतली रोपं वाढतील जोमाने

रासायनिक खत कशाला? नारळाच्या शेंड्यांचा करा 'असा' वापर; कुंडीतली रोपं वाढतील जोमाने

नारळाचा वापर अनेक प्रकारे केला जातो (Gardening Tips). नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष म्हटले जाते. कारण नारळाचा पुरेपूर वापर होतो. सुका असो किंवा ओला, खोबऱ्याचा वापर अनेक पदार्थांमध्ये होतो (Coconut Shell). शिवाय नारळ तेलाचेही अनेक फायदे आहेत. पण नारळाच्या शेंड्यांचा वापर कुठे करावा? हे सुचत नाही.

नारळाच्या शेंड्याचा वापर झाडांच्या वाढीसाठीही करू शकता. नारळाच्या शेंड्यात अनेक पोषक तत्व असतात. ज्यामुळे झाडांची वाढ चांगली होते. बाजारात अनेक प्रकारची रासायनिक खतं उपलब्ध आहेत. ज्यामुळे झाडांची वाढ नसून, लवकर खराब होतात. घरात नैसर्गिक खत तयार करायचं असेल तर, नारळाच्या शेंड्याचा वापर करून पाहा. झाडांची योग्य वाढ होईल(What makes coconut shell as a fertilizer?).

भरपूर चालूनही वजन घटेना? 'या' पद्धतीने - 'या' वेळी चाला, वेट लॉस होणारच; फक्त चालताना..

नारळाच्या सालीच्या खताचे फायदे

बाजारात अनेक प्रकारची रासायनिक खते उपलब्ध आहेत. पण नारळाच्या सालीपासून बनवलेले हे खत झाडांसाठी फायदेशीर ठरते. नारळाच्या खतामध्ये नायट्रोजन, फॉस्फरस, तांबे, जस्त आणि पोटॅशियम आढळते. त्यामुळे झाडांना पोषण मिळते. याशिवाय माती भुसभुशीत होण्यास मदत होते. ज्यामुळे झाडांची योग्य वाढ होते.

नारळाच्या शेंड्यापासून खत तयार कसे करावे?

वजन वाढतं म्हणून चपाती बंद केली? कणकेत घाला ३ गोष्टी; वजन वाढणारच नाही; उलट..

नारळाच्या सालीचा खत तयार करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात नारळाची साल घ्या. त्यात त्याची पावडर तयार करा. नंतर एका बाऊलमध्ये पाणी घ्या. त्यात नारळाच्या शेंड्याची पावडर घालून मिक्स करा, व थोड्या वेळासाठी तसेच ठेवा. नंतर उन्हात वाळवण्यासाठी ठेवा. अशा प्रकारे कंपोस्ट खत तयार. आपण तयार खत मातीत मिसळू शकता. यामुळे झाडांची योग्य वाढ होईल. यातील पौष्टीक घटकांमुळे पानं कायम हिरवीगार राहतील.

Web Title: What makes coconut shell as a fertilizer?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.